अफ्रिकेतलं निसर्ग सौंदर्य बघायला नक्किच आवडेल. मस्त झालाय हा लेख पण!
ईथे लोक १०-१० वर्षे सुद्धा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकत्र रहातात.
अमेरिकेत आल्यावर सुरवातीला मीपण चाट पडलो होतो. एक मजेशीर गोष्ट आठवतेय - मझ्या एका मित्रा बरोबर मी एका पार्टीला गेलो असता एका अमेरिकन माणसाने त्याला विचारले "तुला मुलं आहेत का?"... हा म्हणाला हो म्हणून. ... त्यावर त्या माणसाचा पुढचा प्रश्न - "तुझं लग्न झालय का?".... मित्र एकदम चाट... !!
अवांतर...
चिमणरावांची एक गोष्ट आठवली...
एकदा चिमणराव खानेसुमारीला (जनगनणा करायला) जातात. एका घरात घुसतात. तिथे एक तरूण मुलगी असते. तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मग एक प्रश्न येतो, 'तुमचं लग्न झालंय?' ती बिचारी लाजून बिजून म्हणते, 'नाही'. पुढचा प्रश्न, 'तुम्हाला मुलं किती?' उत्तर, 'फट्याक, तुझा मुडदा बशिवला मेल्या. ^%#$*(&^' चिमणराव गुल.
:))
बिपिन.
पहिल्या भागाप्रमाणेच हा ही भाग मस्तच. पण अजुन क्रमशः करता आलं नसत का? ६ महिन्याच्या अनुभवावरती किमान ६ लेख तरी लिही. बाकी प्रवास वर्णन आणि छाया चित्रे छान. तुझी लिहायची स्टाइल मला आवडली.
इंग्लंड-अमेरिकेला जाणार्या लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव खूप वाचायला मिळतात! कधी कधी तर वीट येण्याजोगे!!
पण अफ्रिकेत गेलेल्या माणसाचे अनुभव इंटरेस्टिंग वाटले.....
यामुळे झालं काय की मी रोज ३०,००० - ५०,०००शिलींगचं एकटा खातो हे मला पचायला जड जात होतं. पण चलन भिकार असलं तरी महागाई फार आहे.
हा, हा, हा!!!! अरे चलन भिकार आहे म्हणुनच महागाई फार आहे.......
त्यातही मी सेंट-सेंटचा विचार करणारा अट्टल पुणेकर असल्याने ऑर्डर करण्याआधी मोबाईल वर ते किती रूपयांत पडतं याचा विचार करत असे. ५०,०००शिलींग म्हणजे बापरे १२०० रुपयांच जेवण? अबब !!!
आता तरी तुझा भारतीयपणा (पुणेरीपणा असं म्हणायचंय पण त्या जाज्वल्य पुणेकरांशी व्यनिची मारामारी नको!!!) आता जरा सोड!! अरे मस्त खाना खिलाना/खाना इज मोस्ट इंपॉर्टंट! कितना पैसा खर्चा किया ये तो बादकी बात है!!!!
ईथल्या जंगली लोकांना (जे शेती करतात, पशुपालन करतात) त्यांना मसाई म्हणतात.
जरा सांभाळून रे बाबा!! ते लोक फार अभिमानी असतात म्हणे! ज्या गोष्टी ऐकल्यात त्यावरून ते कोणाचाही क्षुल्लक कारणावरून कोथळा बाहेर काढतात असं ऐकलंय!! (आमचा अब्दुलखान तरी काय वेगळा होता म्हणा!!!!:))
या आमची अफ्रिका बघायला , मला विश्वास आहे तुम्हाला अफ्रिका निराश नाही करणार
जरूर! पण ते एडसचं जरा थोडं सांभाळायला हवं!!:)
ह.घ्या....
असो,
उत्तम चित्रण, अजून येऊ दे!!
कुबड्या खविसा.. मस्त लिहिलं आहेस. दोन्ही भाग आवडले. वर्णन अगदी सुंदर. माझे बाबा होते काही महिने टांझानिया मध्ये त्यांच्या तोंडूनही बरीच माहिती ऐकली आहे.
लेखन आवडलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी त्याचा अपमान करून पण त्याला वाईट वाटलं नसावं. कारण जाताना मला म्हणाला "थिंक ओव्हर ईट अगेन !!" माझा पारा आधिच चढलेला, मी मराठीतल्या चतुर्थ श्रेणीतली स्तुतीसुमनं बिंधास्त हासडली.
बाप रे बाप ... :०
आई-बापाचे लग्न लावणारा तो ईवलासा शाहिद कपूर पाहून मी धन्य झालो......म्हंटलं भिषी बिशी लावत असतील,,...खायला नसलं चालेलं यांच्या बुडाला कार हवी.
=)) =))
ऐकीव माहीतीच्या आधारे, काही लोक आयुष्यभर काहीही ऊद्योग न करता जगतात.
हे तर लै आवडलं....
__________________
अवांतर : तो अनेक माणसं मारणारा इदि अमिन नामक प्रशासक / हुकुमशाहा युगांडाचाच ना ? युगांडाच्या एकूणच इतिहासाबद्दल लिहिलं तरी वाचायला आवडेल...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
दोन्ही भाग मस्त झालेत...
आधी वाचलेला एक आफ्रिकेवरचा लेख आठवला (लिखिकेचे नाव विसरलो) - त्यांना म्हणे तिथल्या स्थानिक कामवाल्या विचारायच्या त्यांच्या मुलांकडे बघून - "सेम फादर, सेम मदर?" -- त्यांना असाच जोरदार कल्चरल शॉक बसला होता! :)
अरे, तू तर म्हणाला होतास की हे कंटाळवाणं होईल का काय... अजिबात नाही रे... छानच लिहिलं आहेस. मुद्देसूद आणि नीटनेटकं. (शेवटी सॉफ्टवेअर वाला ना तू) फोटू पण छानच. आता पुढे आफ्रिकेतल्या वन्यजीवनावर पण होऊन जाऊ दे एखादा लेख.
कीप इट अप.
बिपिन.
खविसमहाराज, मस्तच लिहिले आहेत. मला आफ्रिका पाहावयाची खूप इच्छा आहे. बघू कधी जमत॑य ते.
जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर 'लेक बाईकाल' रशियात आहे. दुसर्या क्रमा॑कावर आफ्रिकेतले 'लेक टा॑गानिका' आहे. लेक व्हिक्टोरिया (उजीजीचा समुद्र) हे ब्ल्यू नाईलचे उगमस्थान एकोणिसाव्या शतकात कॅप्टन जॉन स्पेक व रीचर्ड बर्टन ह्या दोन धाडसी प्रवाश्या॑नी शोधले. ह्या शोधाची रोमा॑चकारी कहाणी बाळ साम॑त लिखित 'शापित यक्ष' (परचुरे प्रकाशन) ह्या बर्टन चरित्रात वाचावयास मिळेल.
छायाचित्रे, वर्णन, उपमा, विचार वाचायला खूप मजा आली.
असेच अजुन लिहीत जा.
अफ्रिकन डायरी असे एक नियमीत सदर होऊन जाऊ दे तुझे.
अजुन किती दिवस मुक्काम असणार आहे? एन्जॉय!!!!
कुबड्या, ( नाव बदल रे :))
आफ्रिकन टूर मस्त, लेखनाची भाषा आवडली त्यामुळे प्रवासवर्णन वाचायचा कंटाळा आला नाही.
फोटोही छानच, क्रमश लिहावे यासाठी शुभेच्छा !!!
काही जेनेटिक बदल होऊन अफ्रिकन डांबर झाले
ह. ह. पु. वा . झाली !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा भाग पण एकदम झकास जमलाय!
ते फार हुषार आहेत. अगदी रूमक्लिनर पण ईंग्लिश मधे बोलतो
हाहा
पाचवी फ विनोद आठवला...अमेरिकेतले लोक फार हुशार असतात. तिथले लहान मुलं पण फाडफाड इंग्रजी बोलतात म्हणे!
एकद्म बढीया!!
बेट्या मजा करतोयेस तर !!!!
आणी सहा महीन्यात जे पाह्यलस ते
२ लेखात सम्पवलयस!!!
बाकीचे फोटो काय लोणच घालायला ठेवलेत ?
टाक सगळे पूढच्या भागात !!
वाट बघतोये !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
युगांडा आणि एथिओपियाची सफर आवडली रे!
तू लेका धत्तिंग लिहितोस एकदम! मस्त वाटतं वाचायला.
(एक शंका - माझ्या माहितीप्रमाणे केनया आणि टांझानियात राहणार्या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात. तू इथे युगांडा आणि एथिओपियन लोकांनाही तोच शब्द वापरला आहेस. त्यामुळे मी थोडा गोंधळलो आहे.)
चतुरंग
सहमत. वेगळ्या जगाची ओळख झाली. नेहमीच्या इंग्लंड-अमेरिका वार्यांनी वात आणला होता. आणखी अफ्रिकन किस्सेही वाचायला आवडतील.
आता थोडा छिद्रान्वेशीपणा आणि त्याबद्दल आगाऊ माफी :)
केनया आणि टांझानियात राहणार्या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर
जगातले सर्वात मोठे सरोवर/तलाव -
१. कॅस्पियन समुद्र
२. लेक सुपिरिअर
३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित.
युगांडा च्या एका बाजुला टांझानिया आणि एका बाजुला केनिया आहे. जिंजा केनियाच्याच बॉर्डर वर आहे. मी चित्रीत केलेल्या कलाकृती मसाई आहेत एवढ नक्की .. युगांडात मसाई रहातात का नाही ते नाही माहीत.
केनया आणि टांझानियात राहणार्या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर
शक्य आहे .. मी एकटाच भटकतो आहे ... कोणी खास माहीती देणारं नाही...त्यामुळे त्रुटी असू शकते. मी काही दिवस केनियात पण होतो.. तिथे मसाई समाज वेगळा, जंगला जवळ रहातो .ते शेती करतात आणि गायी (जनावरे) पाळतात.त्यामुळे त्यांना मसाई म्हणतात. आणि त्यामुळे मसाईमारा नावाचे एक मोठे नॅशनल पार्क आहे केनिया मधे. मसाई चा अर्श ' गाय ' असा पण होतो बहूतेक .
१. कॅस्पियन समुद्र
२. लेक सुपिरिअर
३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित.
चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद ... ईथे आल्या पासून लोक सांगत .. लेक व्हिक्टोरिया बघुन ये .. ते दोन नंबरचं लेक आहे. त्या आधारे दिली माहिती ...
यात आगाऊ पणा नाही हो .. प्रतिक्रिये बद्दल पुनःश्च आभार !!!
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
अतिशय मस्त.. दोन्ही भाग एकदम एकामागोमाग वाचले.. प्रचंड आवडले.. एका नव्या देशाची अनोखी सफर!..
इथल्या माणसांविषयीही येऊ देत.. तुम्ही एकटे फिरता पण लोक भेटत असतीलच की.. अशाच खास आफ्रिअकन वल्लीबद्द्ल वाचायला आवडेल.
जागतिक मॅरेथॉन मध्ये यांच्या स्टॅमिन्याचा हात(पाय) कोणी धरू शकत नाही
हसून दमलो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
ओळखीचे असून एक तर वाट बदलतात एक तर त्यांचा मोबाईल तुम्ही दिसले की मगच वाजतो.
ही भानगड आमी एखाद्या कार्यक्रमातुन कल्टी मारायची अस्ली मंग वापर्तो.
बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस.
आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात.
प्रकाश घाटपांडे
बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस.
काय सांगता ? अजुन तरी भेटली नसावी .. नाय तर मी लेख कसा लिहीला असता ? थ्यांक्स फॉर सांगिंग आ ? सो नाऊ मी जपुन राहिंग...
त्से त्से तर जपानी कोरियन नाव वाटतय!! आमच्या अफ्रिकेत कुठून आली मग ही ?
आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात.
ते घड्याळाच नाय माहीत .. पण आपल्या सारखा मिस कॉल नाही देत पाऊस ईथे. एक नंबर पाऊस. ढग आले की पडणारच .. आणि ऊन पण लगेच पडत ...
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
कुबड्या (आम्ही काही लोकं तुला कुबड्या नाहितर खवीसच म्हणणार),
लेका भारी लिहितोस ... यवढे भारी विनोद लिहितोस तर शौचकूप हा शब्द रे कसा विसरलास?
यमी / अदिती/ संहिता / दीदी
संहिताताई,
आता शौचकूप हा शब्द विसरा. कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे. तोच आपण वापरूयात.
उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.
- सर्किट
कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे.
थ्यांक्स ... मी पण सायंटिस्ट लोकांसारखे चुकून लागलेल्या शोधांच क्रेडिट घेतो ... हाहाहा ....
उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.
=)) =)) =)) जबरा हाणलाय ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
अगदी छान वर्णन केलयस. अजुन येऊ देत. येतांना एकटाच आणी अखंड ये एवढीच अपेक्षा.
१२ वर्षापूर्वी मी दक्षिण अफ्रिकेत गेलो तेव्हा असाच अनुभव आला होता. अर्थात काही फरक असणारच. केपटाऊन आणि जोहान्सबर्ग येथे सुमारे दोन वर्ष काढलित. केपटाऊन, क्रिकेट, रग्बी, क्रुगर नॅशनल पार्क, वाईन फार्मस, सन सिटी सगळेच अविस्मरणीय. आता अमेरिकेत अगदी विट आलाय तेच तेच बघुन; पण साहेब मनावर घेईल तर शपथ.
टारझन यांचे मिपावरचे लेखन प्रथम वाचले असावे. मध्य आफ्रीकेतल्या लोकांबाबत व निसर्गाबाबतची निरीक्षणे उत्तमपणे मांडली आहे. लेखन वाचून मध्य आफ्रीकेला भेट द्यावीशी वाटत आहे.
प्रतिक्रिया
दोन्ही भाग आवडले
अगदी असेच...
अफ्रिकेतल
अवांतर... चि
मिष्किल
मस्तच
+१
आवडला
छान,
छान!
वा...
कु.ख.
मस्त!
मस्त लेख आहे...
छान
दोन्ही भाग मस्त
दोनही भाग
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे, तू तर
मस्त...
खूप छान
मस्त रे कु. ख.!!!
लेख आवडला.
तुमची आफ्रिका आवडली.
आवडले...
आफ्रिकेची सफारी
मस्त रे !!!
मस्त रे
मस्तच
मस्त
मस्त !!!!!!!
दोन्ही भाग
एकद्म
सही
कु.ख. उर्फ टारझन!
सफर आवडली - सहमत
चुक झाली ..
वर्णन आवडले.
मस्त
दोन्ही लेख!
बेश्ट
हाहाहा
लय भारी
कंपू
कंपूमध्ये
ह ह मे
छान वर्णन
दोन्ही भाग मस्त झालेत.
छानच
ये की जाऊन