जागरण....

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
11 Jun 2019 - 12:25 pm

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.

अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!

बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.

मेली झोप, मोडून अंगं!
मीच दिली मग, कोंबड्यासारखी बांगं!

अश्या अवस्थेत, उठून आवरायला,
झुलतच मी गेलो, टॉवेल धरायला!

धरला टॉवेल ओ-रडली ही,
मला म्हणते, "गाऊन सोडा...शीSssssss!"

मी म्हटलं, "अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र तुझा आला का गाऊन???"
ती म्हणाली, "चपाती ऐवजी पोस्टकार्ड बघाल का खाऊन?"

आता माझी झोप, पुरती उडाली.
शिल्लक असलेली, बादलीच्या तळाशी बुडाली.

घेतले चार तांबे, उरकली अंघोळ.
पण मग सुरू झाला, पुढचा खरा घोळ.

अंगात शर्ट का शर्टात आंग?
डोकं अस पिसल जणू प्यायली भांग

अंग ओढतच मग, मी कामाला गेलो.
बी आकारा ऐवजी, बी बारा'त पोहोचलो.

तिथले यजमान, डोळे चोळतच उठले.
मला भटजीला बघून, भसकन फुटले.

आत विचारतात "अगं ...,आज पूजा आहे का गं!????"
आतून आला आवाज,"नाही हो!झाली की मागं!!!"

मग आम्ही झटकन, उघडली डायरी.
बी आकरा वाचलं ,म्हटलं-"चुकलीच पायरी!"

मग आम्ही फ्लॅट नंबर बी आकारात गेलो.
आतली पूजेची तयारी पाहून अंमळ सुखावलो!

तोपर्यंत तिथे बी 12, पेपर घ्यायला आला.
आणि बी 11च्या कानात, कुजबुजायच तेच कुजबुजला! (दुष्ट दुष्ट! )

बी आकरा मग पूजा होईपर्यंत, आमच्याकडे बघून हसत राहिले.
त्यांचे हसणे आम्हाला, काम संपेपर्यंत टोचत राहिले.

निघालो तिथून दक्षिणा घेऊन,म्हटलं बी 11 नामी आहे.
पण मनात विचार आला,आपल्या
नशिबात 'एकंदरच' बी-12 कमी आहे!!!

ठरवलं मनात पुढच्या वेळी, या बी बारा ला 'खायचं!'
पण मनात आला विचार, आपल्याला तेव्हढं कुठून जमायचं?

सोडून दिला नाद मनातून ,म्हटल लवकर घरी जाऊ.
बालक मोठं होईपर्यंत ,दहीभातच खाऊ!

बालक जागरणं संपायची , तेव्हा ती संपू दे!
हे रहाट गाडगं देवा, असच मला ओढू दे!

शेवटी बी आकरा किंवा बी 12 ला, खाल्लं काय?न खाल्लं काय!???
तुझ्या कृपा छत्रा शिवाय, खरी शक्ती यायची नाय!

आमच्याच मनाचा खेळ आहेस तू, हे जसं सत्य आहे..
तसच..,आमचंही 'त्याशिवाय' होत नाही काही,ह्यातही तथ्य आहे!

चला..,गेला थकवा मनाचा,दोन्ही(ही!) डोळे उघडले!
रात्र चालली होती जागरणात,पण आज खरे उजाडले!
=====०=====०=====०=====०=====०=====०
अतृप्त..

आगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यमाझी कवितामुक्त कविताभयानकसंस्कृतीसमाजओली चटणीऔषधी पाककृतीकालवणडावी बाजूपौष्टिक पदार्थमौजमजा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

11 Jun 2019 - 12:44 pm | संजय पाटिल

बुवा बर्‍याच दिवसांनी परतले....

खिलजि's picture

11 Jun 2019 - 12:58 pm | खिलजि

ओहो बुवांचे अभंग

मन करी दंग

खरा तोचि पांडुरंग

इथे ओळखावा

झक्कास खल्लास

फुल्ल गिल्लास

लस्सीवाणी झालंय

खिलजि's picture

11 Jun 2019 - 12:59 pm | खिलजि

येकदम बी फॉर बाराच्या भावात करून टाकलीय राव ...

जॉनविक्क's picture

11 Jun 2019 - 1:00 pm | जॉनविक्क

अजून लिहा

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2019 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

नक्कीच! फक्त...
तांब्या भरू दे! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2019 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा

नक्कीच! फक्त...
तांब्या भरू दे! ;)

अभ्या..'s picture

11 Jun 2019 - 1:02 pm | अभ्या..

गुरुजी ह्याला पोवाड्याची किंवा भारुडाची चाल झक्कास बसेल.
करायचा का जाहिर कारेक्रम?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2019 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

लै वेळा करू! फक्त डफ वाजवायला आगोबा आणि ढोलकीला ढनाजीराव हवे!

अभ्या..'s picture

11 Jun 2019 - 1:20 pm | अभ्या..

तुणतुण्याला मी येऊ शकेन हे दोघे आल्यास. ;)
=))

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2019 - 1:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling.gif

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 1:11 pm | जेम्स वांड

नव-पालक गुरुजी आणि सौ गुरुजींचे अभिनंदन अन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.

मी म्हटलं, "अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र तुझा आला का गाऊन???"
ती म्हणाली, "चपाती ऐवजी पोस्टकार्ड बघाल का खाऊन?"

ह्या ओळी तर प्रचंडच खास, तुमच्या टंकत्या बोटांवर सरस्वती तांडव करतेय गुरुजी, झकास जमवून आणलेत सगळे एकदम.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2019 - 1:34 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

राघव's picture

11 Jun 2019 - 2:26 pm | राघव

भारीच!

पद्मावति's picture

11 Jun 2019 - 2:39 pm | पद्मावति

:) मस्तंच

श्वेता२४'s picture

11 Jun 2019 - 3:38 pm | श्वेता२४

ती म्हणाली, "चपाती ऐवजी पोस्टकार्ड बघाल का खाऊन?"
हे फार आवडलं

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2019 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वेषाम् धण्य वादम्! :)

नाखु's picture

16 Jun 2019 - 10:36 am | नाखु

सांसारिक जीवनात अशीच फुलबाग (फुलबाज्या. ) सहित उमलत राहो हीच सदिच्छा

आपले नम्र हिरवे आणि पारवे मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड ं