..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
1 Nov 2009 - 1:33 am

..

हे ठिकाण

प्रतिक्रिया

लवंगी's picture

1 Nov 2009 - 1:56 am | लवंगी

मस्त कथा..

मस्तानी's picture

1 Nov 2009 - 2:42 am | मस्तानी

एका दमात चारही भाग वाचले ... विचारणारच होते हॅलोवीन स्पेश्श् ल का म्हणुन ?

गोगोल's picture

1 Nov 2009 - 3:17 am | गोगोल

जोरदार पुनरागमन...बरेच दिवसानी मेजवानी मिळाली.

सन्जोप राव's picture

1 Nov 2009 - 6:01 am | सन्जोप राव

याच कल्पनेवर आधारित धारपांच्या अनेक कथा आहेत. कथा ठीक वाटली. शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते.
इतर वर्णने बाकी छान आहेत. भिंतीवरील डागांकडे (इथे 'धब्बा' हा शब्द का वापरावासा वाटला असावा?) बोट दाखवून 'राक्षस, राक्षस' म्हणणारा अक्षय अगदी परिचित वाटला.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

भडकमकर मास्तर's picture

1 Nov 2009 - 9:49 am | भडकमकर मास्तर

शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते.>>>>>
हेच मन्तो.
भिंतीवरील डागांमध्ये एका लहान मुलाला मृत व्यक्ती दिसण्याचे , त्यांनी बोलावण्यचे प्रसंग मतकरींच्याही एका कथेत होते, ते आठवले...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

श्रावण मोडक's picture

1 Nov 2009 - 2:12 pm | श्रावण मोडक

सहमत. पहिले तीन भाग चढत गेले, शेवटचा म्हणजे 'पडदा पडला'!

मतकरी, धारप आणि रामू कशाला? एक्झॉर्सिस्टपासून हाँटेड मँशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत घरात असेच प्रसंग घडतात कारण असे प्रसंग काही सत्यघटनांवरून घेतलेले असतात. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा लवकर अशा गोष्टींची जाणीव होते असे अनेक अनुभव सांगतात. प्राण्यांचेही असेच कारण मोठ्यांसारखे त्यांचे मन प्रपंचात गुंतलेले नसते. त्यामुळे, रामू, धारप, मतकरी, स्टीफन किंग, ओमेन, एक्झॉर्सिस्ट आणि जगातील तत्सम भयकथांत लेखक यापेक्षा वेगळी थिअरी सहसा दाखवणार नाहीत.

अशाप्रकारची एक प्रसिद्ध सत्यकथा माझ्या वाचनात आली होती. त्या कुटुंबाने वर्णन केलेली. तसा खुलासा गोष्टीत आहेच.

शेवट प्रभावी करणे म्हणजे त्याला अधिक खुलवणे तर तसे प्रयोजन नाही. कथा ट्विस्ट झाल्यावर त्या क्षणी थांबवणे मला आवडते. गेल्यावर्षी वळणावर ती येतेमध्येही असेच केलेले आहे. शेवट वाचल्यावर पहिल्यावेळेतच त्याचा गर्भितार्थ समजू नये हाच उद्देश आहे.

मला वाटते खाली बेसनलाडवाला तो अचूक समजला आहे.

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

प्रियाली's picture

1 Nov 2009 - 5:19 pm | प्रियाली

भिंतीवरील डाग इतर अन्य कथांत आले असतील किंवा प्रत्यक्ष अनुभवाचेही असतील. :) असाच काहीसा अनुभव माझ्या घरातील लाकडी फरशीवरचा...

trial

लवंगी's picture

1 Nov 2009 - 7:10 pm | लवंगी

:S बदल ती फरशी..

प्रियाली's picture

1 Nov 2009 - 9:07 pm | प्रियाली

:) नाही नाही. मस्त आहे तो लाकडाचा प्लँक. घाबरण्यासारखं तर काहीच नाही.

असो, सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

स्वाती२'s picture

1 Nov 2009 - 6:03 am | स्वाती२

मस्त घाबरगुंडी! पटापट चारही भाग टंकलेत त्याबद्दल धन्यवाद.

एकलव्य's picture

1 Nov 2009 - 7:01 am | एकलव्य

पटापट चारही भाग टंकलेत त्याबद्दल धन्यवाद.

छान रंगत आणि कलाटणी! आवडली गोष्ट!!

पिवळा डांबिस's picture

1 Nov 2009 - 7:40 am | पिवळा डांबिस

हालोवीनची चेटकीण आली!!!! (ह. घ्या)
:)
मस्त कथा!!!!
इथे पैसे द्यावे लागत नाहीत म्हणून,
नाहीतर म्हटलं असतं की, "पैसा वसूल!!!!"
:)

बाकी "तथाकथित सत्यघटना" म्हणजे काय ते समजलं नाही!!
:)
आयदर इट इज अ सत्यघटना ऑर देन ऐकीव माहिती...
इट डजन्ट मॅटर....
बिकॉज द "मॅटर" इज टेरिफिक!!!

-यल्लो ड्रॅक्यूला

प्रियाली's picture

1 Nov 2009 - 5:16 pm | प्रियाली

आयदर इट इज अ सत्यघटना ऑर देन ऐकीव माहिती...

म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे, स्मट नावाच्या एका कुटुंबाची ही कथा आहे. या घटनेत याहीपेक्षा अधिक प्रसंग आहेत. त्यातील काही प्रसंगांवर माझा विश्वास नाही. किंबहुना, भुताखेतांच्या अस्तित्वाबद्दल मी नेहमीच साशंक असते कारण सत्य म्हणण्यासाठी मी काहीही अनुभवलेले नाही. ;)

म्हणून तथाकथित अशी जोडणी दिली. :)

ड्रॅक्युला पिवळ्या वेशात कसा दिसेल अशी कल्पना करते आहे. आमच्याकडचा ड्रॅक्युला हा असा होता.

धनंजय's picture

1 Nov 2009 - 8:01 am | धनंजय

हॅपी हॅलोवीन!

माझ्या सोयीसाठी येथे देत आहे :

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Nov 2009 - 9:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियालीताई, ख त र ना क!

आणि दणदणीत चौकाराबद्दल अभिनंदन/धन्यवाद.

(विक्षिप्त हडळ) अदिती

बेसनलाडू's picture

1 Nov 2009 - 9:45 am | बेसनलाडू

हॅलोविनच्या निमित्ताने लेखिकेचे पुनरागमन अपेक्षित होते; चारही भाग एका दमात वाचले. कथा चौथ्या भागाच्या शेवटापर्यंत काहीशी टिपिकल, 'भूत' आणि 'वास्तुशास्त्र' सारख्या चित्रपटांच्या अंगाने जाणारी वाटली. शेवटचे वाक्य मात्र मस्त वाटले..आणि त्यातली गूढता व (मला लागलेला) गर्भितार्थ या गोष्टी भावल्या.
(वाचक)बेसनलाडू

चेतन's picture

1 Nov 2009 - 12:08 pm | चेतन

भयालीताई
हॅप्पी हॅलोविन

(मुंजा) चेतन

चित्रा's picture

1 Nov 2009 - 10:17 am | चित्रा

छान, कथा आवडली!

क्रान्ति's picture

1 Nov 2009 - 10:44 am | क्रान्ति

ठेवणारी कथा आवडली. रत्नाकर मतकरींच्या "गहिरे पाणी" मधली घर कथा आठवली.

क्रान्ति
अग्निसखा

अवलिया's picture

1 Nov 2009 - 11:34 am | अवलिया

छान ! कथा आवडली !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2009 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भयकथा आवडली.

शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.'

स्सही !!!

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

1 Nov 2009 - 6:55 pm | चतुरंग

अप्रतिम भयकथा.

प्रियालीताई, हॅलोवीन आला तेव्हाच 'गाठ तुमच्याशी आहे' ह्याची भयप्रद जाणीव झालीच होती ती अशी सत्यात उतरली! :SS

(लाकशश)चतुरंग

प्राजु's picture

1 Nov 2009 - 7:39 pm | प्राजु

जोरदार कथा!!
मस्त एकदम. आवडली.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Nov 2009 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे अगदी शॉल्लेटच. कथेचा साधारण प्रवास अगोदरच लक्षात आला होता. (ते अपरिहार्यच आहे म्हणा !!!). पण शैली, वर्णनं इ. मुळे अगदी शेवटपर्यंत भराभर वाचत गेलो. शेवट अगदी मस्त!!! पर्फेक्ट. ट्विस्ट अगदी असा सुमडीत सायलेंटली केला गेलाय... पटकन समजत नाही. शेवट आवडलाच.

फक्त, गुलाबरावाला जर का घर सोडायचे होतेच तर आधीचे घर सोडा म्हणून कशाला मागे लागला होता? चूपचाप त्रास द्यायचा... उगाच या लोकांना नवीन घर शोधा, शिफ्टिंग करा वगैरे त्रास कशाला द्यायचा. भूत परवडले पण घर शिफ्टिंग नको अशी स्थिती असते. :)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2009 - 9:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भूत परवडले पण घर शिफ्टिंग नको अशी स्थिती असते.

+१

अगदी मान्य!

(वारंवार शिफ्टींगमुळे त्रस्त) अदिती

सहज's picture

2 Nov 2009 - 6:44 am | सहज

हॅलोवीनची भेट आवडली!!!

धन्यु!

हर्षद आनंदी's picture

2 Nov 2009 - 7:14 am | हर्षद आनंदी

१-४ एकदम वाचले, कथेने पकड छानच घेतली होती.
पहीले ३ भाग मस्त, शेवटच्या भागात कथा ओढुन ताणुन संपविली असे वाटते.

विसुनाना's picture

2 Nov 2009 - 12:16 pm | विसुनाना

कथा आवडली.
शांतीपाठाने गुलबराव 'मोकळा' झाला काय?

sneharani's picture

2 Nov 2009 - 12:26 pm | sneharani

आवडली भयकथा...
४ ही भाग मस्तच....

ऍडीजोशी's picture

2 Nov 2009 - 3:22 pm | ऍडीजोशी (not verified)

:SS :SS :SS :SS :SS :SS

रेवती's picture

2 Nov 2009 - 7:46 pm | रेवती

सगळे भाग वाचले कथा छान आहे. शेवट काय असेल याचा थोडा अंदाज असूनही लेखनशैलीसाठी दाद द्यावीशी वाटली.

रेवती

ऋषिकेश's picture

3 Nov 2009 - 4:52 pm | ऋषिकेश

छान.. शेवट छानच!

(घाबरट)ऋषिकेश

प्रभो's picture

3 Nov 2009 - 5:19 pm | प्रभो

मस्त....आज सगळे भाग एकत्र वाचले.........छान झालीय भयकथा
शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे मलाही वाटते.....पण मस्तच.....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

संताजी धनाजी's picture

9 Sep 2010 - 9:57 am | संताजी धनाजी

मस्त कथा! अश्याच आम्हाला घाबरवत रहा :)

नगरीनिरंजन's picture

9 Sep 2010 - 10:34 am | नगरीनिरंजन

शेवट फार आवडला! सगळं खुलवून न सांगता फक्त एका वाक्यात जो अर्थनिर्देश केला आहे त्याला तोड नाही.
या हॅलोवीनची कथा वाचायला उत्सुक.

संकेत's picture

9 Sep 2010 - 3:03 pm | संकेत

मलाहि एका ओळीतला शेवट आवडला.

विलासराव's picture

9 Sep 2010 - 3:46 pm | विलासराव

आवडली.
आत्ताच चारही भाग वाचले.

प्रियाली's picture

9 Sep 2010 - 6:40 pm | प्रियाली

नववाचकांना आणि ज्यांना आधी दिले नव्हते त्या सर्व वाचकांना धन्यवाद. ;)