वार - प्रतिवार...
शह - काटशह...,
अरे ला कारे....
नुसतेच सारे...,
शब्दांचे पसारे....!
नखं गळालेला जर्जर वनराज,
त्याच नखांनी परस्परांशी...,
झुंझताहेत छावे...!
सामर्थ्य, सत्ता ...
अनुत्तरित...? प्रश्न अस्मितेचा (?)
विखुरलेले सारे कळप मेंढरांचे!
बलाबलावरुन भांडताहेत ...
अनियंत्रित...,मेंढपाळ भरकटलेले!
त्यांचे राजकारण, फरफट कुणाची?
कुणीही यावे टिकली मारुन जावे
नियती आमची कधी बदलणार?
संतप्त, विव्हल ...
गांधारीचे शाप ...
आम्हालाही कायम भोवणार...!
आमच्याच भांडणात...
सत्तापिपासु लांडगे...
नेहमीच ...,मेजवान्या झोडणार!
आम्ही तसेच उपाशी....
ते मात्र सुखाचा ढेकर देणार !
विशाल
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 3:17 pm | टारझन
व्वा !! व्वा !!!
-- टारोबा ढेकर
27 Oct 2009 - 3:50 pm | नेहमी आनंदी
मस्त ढेकर आहे.
27 Oct 2009 - 5:28 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्त
27 Oct 2009 - 5:46 pm | आशिष सुर्वे
अप्रतिम काव्य!
पण माफ करा, मी ह्या कडव्यांशी सहमत नाही:
त्याच नखांनी परस्परांशी...,
झुंझताहेत छावे...!
ह्याला झुंज म्हणणे योग्य नाही ठरणार.. ही तर सगळी लुटीपुटीची लढाई आहे..
ढेकर तर सर्वच देत आहेत..
-
कोकणी फणस
27 Oct 2009 - 6:17 pm | विशाल कुलकर्णी
ही तर सगळी लुटीपुटीची लढाई आहे..>>
तसे असेल तर आनंदच आहे मित्रा. पण तसे दिसत नाहीये.
असो, काळच यावर उत्तर देइल. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"