आता काही लिहीन म्हणतो.

उग्रसेन's picture
उग्रसेन in जे न देखे रवी...
20 Oct 2009 - 11:43 am

[मास्तर चतुरंग यांची प्रेरणा आणि मुळ लेखकाची क्षमा मागून]

वाचन खूप झाले, आता लिहीन म्हणतो.
आडून प्रतिसादाच्या गंभीर लिहीन म्हणतो

पेन खिशातला हा मी काढणार आहे
जे जे दिसेल ते ते सारे लिहीन म्हणतो.

बरेच प्रतिसाद आहे मी उधळलेले या जागी
आहेत विचार डोक्यात जे इथे लिहीन म्हणतो

दिवाळी अंकातून मी निर्दोष आज सुटलो ?
(लेख लिहिण्याचा कोणीच आग्रह केला नाही :( )
शब्द शब्द जमा करुन काही लिहीन म्हणतो

सारेच सिद्धहस्त लेखक, ना साधा इथे कोणी
नसलो मोठा तरिही आता लिहीन म्हणतो.

ती टीका नव्हती सदस्यांची कधीच खोटी
समजून गेलो इशारे सारे, तरी लिहीन म्हणतो

माझ्याच लेखनाची आता मलाच हाव आहे
विषय द्या दोस्तांनो, काही जबरा लिहीन म्हणतो

(वृत्त आणि मात्रांचा कवी पूर्ण आदर करतो )

विडंबन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

20 Oct 2009 - 11:46 am | प्रमोद देव

बाबुराव...मस्त झालंय इडंबन!

हा हा

>विषय द्या दोस्तांनो, काही जबरा लिहीन म्हणतो

हे खासच!

बाबूराव २२ तारखेला निवडणूक अंदाज भाग २ येउ दे!!

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 11:55 am | अमृतांजन

मस्त! :-)

मदनबाण's picture

20 Oct 2009 - 1:07 pm | मदनबाण

माझ्याच लेखनाची आता मलाच हाव आहे
विषय द्या दोस्तांनो, काही जबरा लिहीन म्हणतो
नक्कीच लिहा... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

अहिरावण's picture

17 Apr 2024 - 7:58 pm | अहिरावण

चांगलं लिहिता हो तुम्ही.. मग का लिहित नाही?

चित्रगुप्त's picture

17 Apr 2024 - 11:04 pm | चित्रगुप्त

हा घ्या विषय, कहीतरी 'जबरा' लिहायला:
भारतात 'गोरे' (इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे सगळे) कधी 'आलेच नसते' तर आजचा भारत कसा असता ?
(अतिशय रोचक विषय आहे माझामते)

रामचंद्र's picture

17 Apr 2024 - 11:23 pm | रामचंद्र

हे विडंबन, मूळ काव्य, त्यावरचे रेवती आणि बहुगुणी यांचे प्रतिसाद भन्नाटच! मस्त मिसळीवर चरचरीत सोडा!