पाळणाघरात

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
17 Oct 2009 - 1:48 pm

नको आई नको आज पाळणाघरात
नको जाऊ कामाला तू राहुया घारात

छान खाऊ मिळे तिथे चॉकलेट गोळी
जेवायला असते तूप साखर पोळी
चव तुझ्या हताची पण नसते कशात
डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात

खेळायला खेळन्या काऊ आन चिऊ
निजायला असते उशी मऊ मऊ

ऊब तुझ्या कुशीची पण नसते कशात
डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात

गोष्टी राजा-राणीच्या असतात छान
पावसाच्या गान्यात हारवते भान
गोडी त तुझ्या अंगाईची पण नसते कशात
डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात

नाही आई तुला मी त्रास देनार
सांगशील ते सारे ऐकनार
दंगा केला तर रागव तू मला
खोडी केली तर सांग बाबाला

नको आई नको आज पाळणाघरात
नको जाऊ कामाला तू राहुया घारात

करुणकविता

प्रतिक्रिया

शेखर's picture

20 Oct 2009 - 8:42 am | शेखर

....

शेखर

पाषाणभेद's picture

20 Oct 2009 - 9:24 am | पाषाणभेद

लई भारी म्हणावे तर मनाला वेदना झाल्यात.
वरीलप्रमाणेच.
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)