आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
16 Oct 2009 - 7:10 pm

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

आपण बोलूया एकमेकांशी
शब्दानं शब्द वाढू दे.
आपण लिहूया एकमेकाला
आपण वाचूया एकमेकाला
शिष्ठ शांततेच्या कोषातून
आपण बाहेर येऊया...
आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

आपण ओळख दाखवत नाही एकमेकाला
आपल्याला विश्वास नाही एकमेकांबद्दल
आपल्याला भीती वाटते एकमेकांची
एका प्रचंड ताणाखाली वावरत असतो आपण
आणि मग अंधारच अंधार दाटत राहतो सभोवताली...

सहज आपुलकीनं बोललो दोन शब्द एकमेकांशी
तर विरुन जाईल अंधार
लख्ख उजाडेल सारीकडं...
`स्नेहा'च्या प्रकाशात आपण आनंदानं राहूया...
आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

-अविनाश ओगले

कविता

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

16 Oct 2009 - 7:50 pm | पर्नल नेने मराठे

शिष्ठ कोणाला म्हण्ताय ...मी स्वतहुन बोल्ते कित्येक जणान्शी
जाउ दे ते तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!
आम्ही दिवे लाव्तो ;)

चुचु

ओगलेसाहेब, लाख मोलाची गोष्ट बोललात! तथास्तू!!

खर्‍या ओळखीचे दिवे चेतवू या | खुले बोलू या, अन् खुले राहू या ||
प्रकाशापरी उजळू दे अंतरे ही | न भीती, न क्षिती, खुले नांदू या ||