नमस्कार,
मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच.
तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच...
माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत.
मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य. नाही का?
ही माझी मैत्रिण तिच्या व्यावसायीक आणि व्यक्तीगत जीवनात खुप यशस्वी आहे.
आणि असे असुनही हिला गर्व मात्र अजिबात नाही.
हिच्या यजमानांचा व्यवसाय असुन ते सदैव व्यस्त असतात.
हिची दोनही मुले उच्चशिक्षण घेत आहेत.
एवढे व्यस्त जीवन असुनही ही माझी मैत्रिण अनेक छंद जोपासत असते.
त्यातला एका छंदाचा नमुना म्हणुन मी त्यांनी केलेल्या विणकामाचे दोन फोटो अपलोड करत आहे.
ह्या माझ्या मैत्रिणीतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 3:06 pm | प्रभो
आहाहाहा ...काय छान दिसतयं !!!
माझ्या मातोश्री आणी आजी पण छान विणकाम करतात ....मला माझ्या लहानपणी माझ्यासाठी शिवलेल्या महाराजा टोपी ची आठवण झाली...माझी आई माझ्या आजी कडे गीता आणी विणकाम शिकायला यायची...तिथेच त्यांचं जमलं......
(देव करो..आणी माझ्या होणार्या बायकोला विणकाम येवो) =))
चुचे, मस्त गं....
--प्रभो
14 Oct 2009 - 3:07 pm | अवलिया
तु स्वयंपाक करत रहा.. ती वीणकाम करत राहिल.
हरे राम.. .किती आणि कसे कसे फोटो पहावे लागतील प्रभो जाणे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 8:16 pm | अनिल हटेला
काय रे हे नान्या !!
:S
चुचु चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
14 Oct 2009 - 3:06 pm | श्रावण मोडक
आवडली. छान.
14 Oct 2009 - 3:06 pm | चिरोटा
आहे. ह्या धाग्यातले विणकाम आवडले.
आपणास,आपल्या मैत्रिणीला,त्यांच्या व्यस्त यजमानांना,उच्च शिक्षण घेणार्या दोन्ही मुलांना माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
14 Oct 2009 - 3:08 pm | अवलिया
छान आहेत फोटो... मस्त.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 3:40 pm | भाग्यश्री कुलकर्णी
चुचु फारच सुरेख आहेत ग .
14 Oct 2009 - 3:51 pm | वेदश्री
मस्त! शेडेड दोर्याचा वापर एकदम कलात्मक.. खूपच सुंदर झाले आहे.
पहिल्या चित्रातले ते छोटे फुलपाखरू कसे विणले ते तुमच्या मैत्रिणीला विचारून सांगू शकाल का? तसे बघूनही प्रयत्न करता येईल म्हणा पण तरीही ओरीजिनल माहिती मिळाल्यास जास्त छान होईल असे वाटते.
छंद जोपासायला मोकळ्या वेळेपेक्षा मनापासून इच्छेची गरज जास्त असते, हेच परत एकदा अधोरेखित केले तुमच्या या मैत्रिणीने. माझ्या त्यांना या छंदजोपासनेबद्दल अनेकोत्तम शुभेच्छा.
14 Oct 2009 - 3:54 pm | स्वाती२
खूप सुरेख. माझी आई करायची असे नाजूक विणकाम. तेव्हा कधी शिकले नाही. इथे आल्यावर शिकले. पण असे नाजूक नाही, लोकरीचे.
14 Oct 2009 - 3:58 pm | सुबक ठेंगणी
रंगसंगती, डिझाईन...सगळंच अप्रतिम!
हौशी नाही अगदी प्रोफेशनल वाटतंय!
14 Oct 2009 - 4:03 pm | sneharani
;;) एकदम मस्त झालयं विणकाम..
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
ती फुलपाखरं ... छानच!!!
14 Oct 2009 - 4:45 pm | मदनबाण
मस्त फोटो... :)
च्यामारी इतकं सपष्ट कसं काय लिवलं ??? लयं टंकन कष्ट झालाले असावेत !!! ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
14 Oct 2009 - 5:14 pm | नरेंद्र गोळे
विणकाम बेहद्द आवडले!
सुरेख रंगसंगती आणि चित्ताकर्षक रचना!!
14 Oct 2009 - 6:13 pm | विसोबा खेचर
अगदी हेच!
'सुरेख' हा एकच शब्द!
(कलाप्रेमी) तात्या.
14 Oct 2009 - 5:16 pm | विमुक्त
फारच सुंदर!!!
14 Oct 2009 - 5:35 pm | प्रशांत उदय मनोहर
मस्त. तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि तुमच्या मैत्रिणीला व त्यांच्या परिवारालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
14 Oct 2009 - 5:41 pm | सूहास (not verified)
तु स्वयंपाक करत रहा.. ती वीणकाम करत राहिल.
हरे राम.. .किती आणि कसे कसे फोटो पहावे लागतील प्रभो जाणे. >>>
=)) =)) =)) =))
बाकी ते विणकाम वगैरैतील अजिबात काही कळत नाही पण फोटो छान आलेत ....
लवकरच विडंबन पाडण्यात येईल...
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
14 Oct 2009 - 6:14 pm | बाकरवडी
;;) ;;) ;;) ;;) ;;)
=D> =D> =D> =D> =D>
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
14 Oct 2009 - 10:02 pm | रामदास
अभिनंदन ,विणकामात लक्ष घातलेलं दिसतं आहे.
भारतात आईकडे कधी येणार. ?
14 Oct 2009 - 10:39 pm | अवलिया
पौष्टीक लाडवाची कृती विचारल्यावर विमानाचं बुकींग झालं असं समजा.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 12:33 am | वैशू
खूपच सुंदर आणि कलात्मक!
15 Oct 2009 - 10:06 am | पिवळा डांबिस
एक सुलट दोन उलट...
एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट...
एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट...
एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट....
एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट, एक सुलट दोन उलट
इत्यादि इत्यादि.....
माझे बाबा याला दुष्काळी काम म्हणायचे...
:)
15 Oct 2009 - 10:21 am | वेदश्री
हाहाहाहा!
पिडा, चुकून चुकलात हो तुम्ही! हे क्रोशा विणकाम आहे, दोन सुयांचे विणकाम नाही. यात सुलट-उलट-सुलट नाही तर खांब-साखळ्या-खांब असतात. आता याला काय म्हणायचे तुमचे बाबा ते सांगा पाहू! :-)
15 Oct 2009 - 10:31 am | पिवळा डांबिस
ते तर आणखीन बेकार....
उगाच हॉकी सुईने खाली पडलेले दोरे उचलून घ्यायचे!!!!!
खाली पडलेल्यांना सुखात पडू द्यां ना!! उगाच त्यांच्यावर न पेलणार्या जबाबदारीचं ओझं कशासाठी द्यायचं?
:)
15 Oct 2009 - 10:28 am | विजुभाऊ
बहुतेक दुश्काळी कामात हे असेच असते
नाहीतरी पूर्वी राजे लोक दुष्काळी काम म्हणून लोकांकडून तलाव खोदुन घ्यायचे किंवा महालाचे /किल्ल्यांचे बांधकाम करायला घ्यायचे.
त्यात खांब,साखळ्या वगैरे असायचे ना.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
15 Oct 2009 - 10:52 am | प्रमोद देव
उत्तम रंगसंगती आणि आकार.
आवडलं.