म.टा.ची पत्रकारिता...?

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
10 Oct 2009 - 4:25 pm
गाभा: 

महाराष्‍ट्र टाईम्‍स सारखे प्रतिष्‍ठीत वृत्तपत्रही चो-या-मा-यांवर चालते यावर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.
खाली दिलेल्‍या दुव्‍यांवरून कदाचित ते तुम्हाला स्‍पष्‍टपणे जाणवेल.

http://marathi.webdunia.com/newsworld/news/international/0910/10/1091010...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5109532.cms

वेबदुनियाने ही बातमी सकाळी 9.30 च्‍या सुमारास टाकली आहे. तर म.टाने दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी.

प्रतिक्रिया

दशानन's picture

10 Oct 2009 - 4:30 pm | दशानन

शक्यतो तुम्हाला माहीत नसावे PTI / BBC व अजून अनेक अश्या संस्था आहेत ज्या सर्वांना बातम्या व लेख देतात काही चार्ज घेऊन व त्यामुळेच कित्येकदा एकच लेख / एकच बातमी सर्व मजकुरासह वेगवेगळ्या बातमीपत्रावर दिसते !

श्रावण मोडक's picture

10 Oct 2009 - 4:33 pm | श्रावण मोडक

अज्ञानातील "आनंद आहे" हा.

दशानन's picture

10 Oct 2009 - 4:34 pm | दशानन

ते बेचारे पैसे देऊन बातमी खरेदी करतात व मॅडम सारखे लोग त्यांना चोर म्हणतात काय म्हणावे ह्याला =))

श्रावण मोडक's picture

10 Oct 2009 - 4:39 pm | श्रावण मोडक

तसे नाहीये. मड्डमच्या म्हणण्यात एक प्वाईंट आहे. वेबदुनिया आणि मटाची बातमी शब्दशः तशीच आहे. तेव्हा मड्डम म्हणतात तशी वेबदुनियाची सकाळी आणि मटाची दुपारी असेल तर हे कॉपी पेस्ट आहे.
मूळ बातमीत काहीही दम नाहीये हा भाग वेगळा. सांगोवांगी बातमी आहे ती. कुणाला कोट केलेलं नाहीये. ओबामा अध्यक्ष झाल्यानंतरच्या कामगिरीवरच नोबेलचा पुरस्कार असलं एक गृहितक त्यात आहे.
एकूण सारंच निरर्थक. मटाची चोरी म्हणजे घरफोडी-भुरटी चोरी. मूळ तर बोलूच नये.

तुमच्‍या माहितीसाठी सांगतो पत्रकार असल्‍याने पीटीआय आणि तत्‍सम अनेक संस्‍थांशी माझा चांगला परिचय आहे. वर उल्‍लेख केलेली बातमी सकाळी मी स्‍वतःच (कुठल्‍याही वृत्तसंस्‍थेची कॉपी ट्रान्‍सलेट न करता) तयार करून टाकली आहे. असो म.टा.चे हे चोरी प्रकरण नवे नाही. वेबदुनियाच्‍या अशा अनेक बातम्या त्यांनी जशाच्‍या तशा कॉपी पेस्‍ट केल्‍या आहेत.

दशानन's picture

10 Oct 2009 - 4:37 pm | दशानन

मग तुम्ही केस करा ना मग !

इकडे दंगा करुन / लेख / बातमी देऊन काही फायदा नाही.... कॉपी राईटचा कायदा भारतात लागू आहे ... अजून तालिबानचे राज्य नाही आले आहे आपल्या येथे ;)

त्‍याबाबतची प्रकरणे चालली आहेतच.

दशानन's picture

10 Oct 2009 - 4:43 pm | दशानन

वेब दुनिया काही छोटी मोठी कंपनी नाही आहे ती देईल ना फाईट... तुमच्यावतीने... बीबीसीला न्युज द्या... चांगले फाडलतील त्यांना... ऑनलाईन वाचकांसाठी दोघांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर चालू आहेच.. !

बाय द वे,

लेख तुमचा म्हणत आहात तर तुमचे नाव का नाही बॉ लेखाला ?

8|

मड्डम's picture

10 Oct 2009 - 4:47 pm | मड्डम

राजे अहो तो लेख नाही, बातमीयं... आणि प्रत्येक बातमीला नाव नसते....

दशानन's picture

10 Oct 2009 - 4:51 pm | दशानन

हेच म्हणतो मी बातमीला नाव नाही आहे...

;)

त्यामुळेच तर न्युजसर्विसकडून घेतली असावी असा माझा समज झाला आहे... :)

कारण ह्या फोटोवर क्लिक केल्यावर त्या बातमीवर जाता येतं तो फोटो पीटीआय कडून सभार आहे ;)

जरा माहिती दिली तर बर होईल.

वेताळ

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 4:39 pm | भडकमकर मास्तर

वाक्ये बदलायचेही कष्ट घेऊ नयेत ?

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अन्वय's picture

10 Oct 2009 - 6:27 pm | अन्वय

कशासाठी बुवा हा वाद घातला जातोय
आपल्याला काय कळत नाही.
उगा टाइम बरबाद करताय

पत्रकार मड्डम यांच्या माहितीबद्दल धन्यवाद.

भोचक's picture

14 Oct 2009 - 4:59 pm | भोचक

आजही तेच घडलेले दिसतेय.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0910/14/1091014023_1...

मटाने घेतलेली बातमी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5123749.cms

(भोचक)

मी पत्रकार आहे. कारण जगातील यच्चयावत ज्ञान 'फक्त' मलाच आहे, याची मला खात्री आहे.
हा आहे आमचा स्वभाव