३३ कोटी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
29 Sep 2009 - 12:56 pm
गाभा: 

परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत.
सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून?
जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार.
गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत.
अज्ञातांची शिरगणती करण्याची पद्धत प्रचलीत नसावी. तरीसुद्धा ३३ कोटीबद्दलचे कुतुहल जात नव्हते.
मी लहानपणी एका पुराणीक बुवाना हा प्रश्न विचारला होता. त्यानी जमीन पशुपक्षी असे मिळून ३३ कोटी होतात असे तात्पुरते उत्तर दिले होते. मुद्देसूद उत्तरादाखल पाठीत एक धपाट्या सोबत आगाव कार्टे ही पदवी घरपोच प्रदान करण्यात आली आणि माझे आजीसोबत पुराणाला जाणे बंद करण्यात आले होते.
काही अनुत्तरीत बालसुलभ प्रश्न या फोल्डरमध्ये हा प्रश्न गुंडाळून टाकला.
सहज कुठेतरी वाचनात आले की ३३ कोटी मधल्या "कोटी "चा अर्थ प्रकार्/प्रत असा होतो.
म्हणजे एखाद्याला आपण म्हनतो ना की तुझे विचार उच्च कोटीचे आहेत तसेच.
तसे; देव हे एकूण ३३ प्रकारचे/प्रतीचे आहेत. असा अर्थ ध्वनीत होतो.
हे प्रकार कोणी सांगु शकेल का ? ३३ प्रकारचे देव देवता कोणत्या?
अजून एक शंका?
दिव्या दिव्या दीपत्कार. कानी कुंडल मोतीहार.....
या प्रार्थनेतील "कानी कुंडल मोतीहार" हे शब्द नक्की कोणासाठी लिहिले आहेत?

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

29 Sep 2009 - 1:08 pm | युयुत्सु

poetic license हा शब्द्प्रयोग आपणास ठाऊक नाही का?
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

शैलेन्द्र's picture

29 Sep 2009 - 1:11 pm | शैलेन्द्र

कपील देव, यशवंत देव, प्रमोद देव, आणि बाकीचे साधेसूधे देव मिळून ३३ प्रकारचे होतात.

"या प्रार्थनेतील "कानी कुंडल मोतीहार" हे शब्द नक्की कोणासाठी लिहिले आहेत?"

म्हणनार्‍यासाठी लीहीले असावेत.

__________________________________________________

आम्ही प्रतिसादाचे विरजण लावलेय, दही खायचं असेल तर दूध टाका.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 1:17 pm | मिसळभोक्ता

स्पष्ट आहे !

तेहत्तीस कोटी देव, अणि एक आगाऊ कार्टे. वय वर्षे ४०+.

मिलार्ड, केस टू बी डिसमिस्ड.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सूहास's picture

29 Sep 2009 - 4:48 pm | सूहास (not verified)

परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत.>>>
एक कामी येत असेल तर शपथ !!!

सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून?>>>>
देव कुठुन आले ते माहीत नाही पण "लोकसंख्या" कशी वाढीस लागली ह्याचे विवेचन मात्र नक्की करु शकतो...

जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार.>>>
दिवसभर लोकांच्या खरडीतुन फालतु प्रश्न आणी पुचाट जोक मारल्यावर काय लक्षात रहाणार, असो, बाकी विकीभाउंना विचारा, ताबडतोब दुवे मिळतील (फक्त मी मागविले सांगु नकोस, नाहीतर यायचे धाग्याच्या रुपात, आजकाल लिंका धाग्यात चिकटवायची फॅशना आहे)

गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत.>>>

आमचे गणीत कच्चे आहे ...

अज्ञातांची शिरगणती करण्याची पद्धत प्रचलीत नसावी. तरीसुद्धा ३३ कोटीबद्दलचे कुतुहल जात नव्हते.>>>

तुझे तर कशाविषयी कुतुहल नाही असा प्रश्न सगळंयाना पडला आहे...

मी लहानपणी एका पुराणीक बुवाना हा प्रश्न विचारला होता.>>>
अरे , त्यापेक्षा आता युयुत्स्यु ला विचार

त्यानी जमीन पशुपक्षी असे मिळून ३३ कोटी होतात असे तात्पुरते उत्तर दिले होते. मुद्देसूद उत्तरादाखल पाठीत एक धपाट्या सोबत आगाव कार्टे ही पदवी घरपोच प्रदान करण्यात आली आणि माझे आजीसोबत पुराणाला जाणे बंद करण्यात आले होते.>>>
तेव्हा आलेली अक्कल नाहीशी झाली याचा मला खेद वाटतो...

काही अनुत्तरीत बालसुलभ प्रश्न या फोल्डरमध्ये हा प्रश्न गुंडाळून टाकला.>>>
आता का आला हा प्रश्न..हिमालयावर निघालास का वय झाल ??

सहज कुठेतरी वाचनात आले की ३३ कोटी मधल्या "कोटी "चा अर्थ प्रकार्/प्रत असा होतो.
म्हणजे एखाद्याला आपण म्हनतो ना की तुझे विचार उच्च कोटीचे आहेत तसेच.>>>

तुझे तर नक्कीच आहेत याबाबत मला शंका नाही...

तसे; देव हे एकूण ३३ प्रकारचे/प्रतीचे आहेत. असा अर्थ ध्वनीत होतो.
हे प्रकार कोणी सांगु शकेल का ? ३३ प्रकारचे देव देवता कोणत्या?>>>>

ना$$$$$$ही
अजून एक शंका?>>>

बाकी आहेच का अजुन

दिव्या दिव्या दीपत्कार. कानी कुंडल मोतीहार.....
या प्रार्थनेतील "कानी कुंडल मोतीहार" हे शब्द नक्की कोणासाठी लिहिले आहेत?>>>>

ह्या साठी "संपादका ला विचारुन नवीन काकु काढणे ...

कृपया हटकेच घेणे...

सू हा स...

स्वप्निल..'s picture

30 Sep 2009 - 12:13 am | स्वप्निल..

परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत.>>>
एक कामी येत असेल तर शपथ !!! :)
एक्झाक्टली...मला पण हेच म्हणायचे होते..

बाकी ३३ कोटी बद्दल काही माहिती नाही ..

स्वप्निल..

अवलिया's picture

29 Sep 2009 - 1:44 pm | अवलिया

विजुभाउ महिन्यातले तीनचार दिवस उगाचच देवाच्या धर्माच्या मागे लागतात

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 1:52 pm | विजुभाऊ

तीनचार दिवस उगाचच देवाच्या धर्माच्या मागे लागतात
अजूनतरी कोणत्याच धर्माच्या मागे लागलेलो नाही.

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 2:11 pm | विजुभाऊ

देव एकूण किती आहेत हे हिंदू म्हणविणारानाच ठाऊक नाहिय्ये.
शाक्तपंथात एकूण देव्या किती ते अजून नक्की करता येत नाही.
गौरी ,दुर्गा, चंडी , चामुंडी , महिशासूरमर्दीनी , कालीका ही आदीमायेची रुपे.
मग लक्ष्मी ,सरस्वती या नक्की कोण?
ब्रम्हदेव, कुबेर , विश्वकर्मा , धूतपापेश्वर यांची मंदीरे असतात. चित्रगुप्ताचे मंदीर कोठेच नाही. त्याची स्वतंत्र उपासना नाही.
गणेश पुराणात विनायक नावाच्या पिशाच्चाचे निर्दालन केले म्हणून गणपतीचे नाव विनायक पडले. त्याच्या अकरा नावात विघ्नराजेंद्र हे नावही आहे. या नावाची उत्पत्ती कोणी साम्गेल काय?

इकडे कोणीच उत्तर द्यायचा प्रयत्न करत नहिय्ये :(

"आसेतू हिमाचल..... आब्रम्हकंदहार हिंदू तितुका मेळवावा"
( धाग्याचा खफ होतोय बहुतेक.... ;) )

अवलिया's picture

29 Sep 2009 - 2:14 pm | अवलिया

>>>>इकडे कोणीच उत्तर द्यायचा प्रयत्न करत नहिय्ये
तिकडे टाकुन पहा.. ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 2:16 pm | मिसळभोक्ता

विनायक नावाच्या पिशाच्चाचे निर्दालन केले

अरे, विजू, पण ही पुराणातली वांगी पुराणात !

विनायक नावाच्या पिशाच्चाचे निर्दालन खरेच झाले आहे का ?

मला नाही वाटत बॉ !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 2:19 pm | अवलिया

हिंदू धर्मातील पुनर्जन्म पिशाच्चांमधे पण असावा.. पुनःपुन्हा जन्म घेतात नव्या रुपाने, नव्या नावाने.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Sep 2009 - 2:34 pm | ब्रिटिश टिंग्या

हे पुनर्जन्मित ना'ना रुपाचे, ना'ना नावाचे अवलिया असतात हे मात्र खरे!

विकास's picture

30 Sep 2009 - 10:34 pm | विकास

हिंदू धर्मातील पुनर्जन्म पिशाच्चांमधे पण असावा.. पुनःपुन्हा जन्म घेतात नव्या रुपाने, नव्या नावाने.

हिंदू धर्मातील माहीत नाही पण मिपाधर्मात काही पुनर्जन्म झालेले पाहीले आहेत. मात्र त्याबाबतीत आधी अंगात (अथवा त्या विशिष्ठ, "वापरलेल्या नावाच्या" भुमिकेत) एकदम पिशाच्च अथवा भूत येते आणि मग ते अचानक अंतर्धान पावते आणि मग पुनरपी जननम म्हणत वेगळ्या नावाने परत अवतरते. ;)

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2009 - 9:10 am | मिसळभोक्ता

तथा अस्तु..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

असा कस म्हणता?
श्री गणराया ने गॉड प्रॉमिस केल आहे की जेव्हा जेव्हा या भूतलावर या पिशाच्चाचे
आगमन होईल त्या त्या वेळी मी किंवा माझा एखादा दूत - त्याला ठेचून, जाळून, नाहीस करून किंवा विडंबन करून, माझ्या भक्ताना त्राही माम करणार्‍या या दुष्टात्म्याचा मी संहार करीन.

गणेश(टारोबा) भक्त

त्याच्या अकरा नावात विघ्नराजेंद्र हे नावही आहे. या नावाची उत्पत्ती कोणी साम्गेल काय?

उत्तर मला ठाउक आहे. पण ते जाहिरपणे व लेखी दिले तर लोक मला दगड मारतील आणि भावना दूखावल्या म्हणून माझ्यावर इथे बंदी येईल.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

नितीनमहाजन's picture

29 Sep 2009 - 2:16 pm | नितीनमहाजन

कोटी म्हणजे प्रकार किंवा टोके.
हिंदू धर्माच्या संकल्पने प्रमाणे, आपण दहा दिशा मानतो.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार मुख्य दिशा, अग्नेय, नैऋत्य, वायचव्य, इशान्य या चार उपदिशा व ऊर्ध्व व अधो या दोन दिशा.
या प्रत्येक दिशेसाठी प्रत्येकी एक अश्या दहा देवता आणी पृथ्वीच्या मध्य ठिकाणाची एक अशी अकरावी देवता.
हिंदू धर्माप्रमाणे स्वर्ग, पॄथ्वी व पाताल असे तीन लोक आहेत. या प्रत्येक लोकासाठी दिशांसंबधी व देवतांसंबंधी वरील विवेचन लागू होते. म्हणजे एका लोकासाठी अकरा देवता म्हणून स्वर्ग, पॄथ्वी व पाताल या सर्वांसाठी ३३ देवता. ३३ कोटी ही संख्या नव्हे.
जाणकारांनी अधिक खुलासा करावा.

नितीन

JAGOMOHANPYARE's picture

29 Sep 2009 - 2:42 pm | JAGOMOHANPYARE

कोटी म्हणजे प्रकार.. हा अर्थ मराठीत आहे... संस्कृतात आहे काय?

JAGOMOHANPYARE's picture

29 Sep 2009 - 2:30 pm | JAGOMOHANPYARE

ऋग्वेदातही फार देव नाहीत... १०० च्या आतच असावेत.... व्यासानी जेंव्हा सगळे संप्रदाय मिसळून पुराणे संकलीत केली, त्यातून ही काल्पनिक संख्या आली असावी.....

अवलिया's picture

29 Sep 2009 - 2:34 pm | अवलिया

व्यासांचे नाव घेतलेत? भोगा कर्माची फळं
तुमचं सदस्यत्व लवकरच रद्द होईल.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2009 - 4:42 pm | विसोबा खेचर

व्यासानी जेंव्हा सगळे संप्रदाय मिसळून पुराणे संकलीत केली,

हम्म! व्यासाने स्वत:बद्दल पिकवलेली आणखीन एक कंडी वजा लोणकढी! :)

आपला,
(कृष्णद्वैपायन) तात्या.

JAGOMOHANPYARE's picture

29 Sep 2009 - 5:40 pm | JAGOMOHANPYARE

तात्या, काय भानगड आहे ? बापरे, वर म्हटल्याप्रमाने आता माझे सदस्यत्व खरोखर जाणार काय? :)

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 3:00 pm | सुधीर काळे

माझी एक थेअरी आहे, पण पब्लिकमध्ये सांगू इच्छित नाहीं. अश्लील नाहीं, विनोदीच आहे पण पब्लिकमध्ये सांगण्यासारखे नाहीं. का ते वाचल्यावरच कळेल.
ज्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी सांगावे. मी खासगीत पाठवून देईन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अवलिया's picture

29 Sep 2009 - 3:02 pm | अवलिया

लगेच पाठवा..... :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE's picture

29 Sep 2009 - 3:15 pm | JAGOMOHANPYARE

मलाही पाठवा.......

Nile's picture

29 Sep 2009 - 3:18 pm | Nile

नानासाहेबांना पाठवली म्हणजे ती खाजगीत राहीली का? आता इथेच टाका काळे साहेब. अमेरीका बुडेपर्यंत जकार्तावर बोंब कोणी मारत नाही घाबरु नका. टाका.

अवलिया's picture

29 Sep 2009 - 3:30 pm | अवलिया

वैयक्तिक आकसाने परिपुर्ण प्रतिसादाच्या प्रित्यर्थ नाईल यांना हिणकस मंडळातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जात आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

शैलेन्द्र's picture

29 Sep 2009 - 4:16 pm | शैलेन्द्र

मलाही पाठवा

___________________________________________________

आम्ही प्रतिसादाचे विरजण लावलेय, दही खायचं असेल तर दूध टाका.

हर्षद आनंदी's picture

30 Sep 2009 - 8:09 am | हर्षद आनंदी

मला पण पाठवा न राव...

नरेशकुमार's picture

1 Dec 2010 - 3:38 pm | नरेशकुमार

मला बी धाडा.

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 3:08 pm | विजुभाऊ

व्यासानी जेंव्हा पुराणे संकलीत केली त्यातही बहुतेक देव हे विष्णूचे अवतार आहेत.
अवतार हा स्वतंत्र देव मानायचा ठरला तर मग मूळ देवाचे काय?
मूळ देव हाच खरा देव असेल तर अवतार नक्की काय मानायचा?
बोधीसत्व हे बुद्धाचे सत्व (अंश) असणारे निरनिराळे व्यक्ती/प्राणी होते.
तद्वत विष्णूचे अवतार हे विष्णूचे सत्व होते काय?
विष्णूच्या अवतारात त्याच्या इतर आयुधांचेही अवतार निर्माण झाले होते.
उदा : लक्ष्मण आणि बलराम हे शेषाचे अवतार होते.

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 3:23 pm | विजुभाऊ

यः पठे वेदः स: देवः
जो अभ्यास करून ज्ञानार्जन करतो तो देव.
वेद आणि देव हे दोन्ही शब्द काही प्रकाश टाकु शकतील ?

वेद आणि देव हे दोन्ही शब्द काही प्रकाश टाकु शकतील ?

या आडनावांच्या व्यक्तींकडून तुम्हाला "प्रकाश" टाकून हवाय का??

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 3:49 pm | विजुभाऊ

हिंदु असण्याचा गर्व करणारे तरी सांगतील.

( शाळेत गर्वाचे घर खाली अशा अर्थाचा एक धडा चौथीच्या वर्गात होता त्यात ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्टहोती)

छोटा डॉन's picture

29 Sep 2009 - 3:59 pm | छोटा डॉन

>>हिंदु असण्याचा गर्व करणारे तरी सांगतील.
+१, असेच म्हणतो.

अवांतर : आम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे, पण आम्ही ते फक्त "हिंदु असल्याचा अभिमान आहे" असे कबुल करणार्‍यांनाच सांगु, इच्छुकांनी संपर्क साधावा.

अभिमान नसुनही संपर्क करताल तर ३३ कोटीवेळा शास्त्रोक्त पद्धतीने फाट्यावर मारले जाईल हे वेगळे सांगायला नको.

------
धर्ममार्तंड छोटा डॉनशास्त्री
... करू नका एवढ्यात चर्चा देवांच्या संख्येची, रणात आहेत अभिमान असणारे अजून काही !

>>>>अभिमान नसुनही संपर्क करताल तर ३३ कोटीवेळा शास्त्रोक्त पद्धतीने फाट्यावर मारले जाईल हे वेगळे सांगायला नको.

डॉन्या, ३३ कोटीवेळा आणी दाही दिशा का ?????

(छोट्या डॉनशास्त्र्यांचा अनुयायी) प्रभो

शैलेन्द्र's picture

29 Sep 2009 - 4:26 pm | शैलेन्द्र

"डॉन्या, ३३ कोटीवेळा आणी दाही दिशा का ?????"

फाटा फूटेल...

___________________________________________________

आम्ही प्रतिसादाचे विरजण लावलेय, दही खायचं असेल तर दूध टाका.

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 4:37 pm | सुधीर काळे

बालपणी आजी-आजोबांनी सांगितले होते कीं हिंदुधर्मात नुसते ३३ कोटि देव असणे एवढाच चमत्कार नसून ते सगळे गाईच्या (गोमातेच्या) पोटात असतात. खरं-खोटं कुणास ठाऊक!
म्हणून तर हिंदू मंडळी गोमांस खात नाहींत!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

30 Sep 2009 - 10:40 pm | विकास

ते सगळे गाईच्या (गोमातेच्या) पोटात असतात

तशी चित्र असलेली कॅलेंडरे मला आठवते त्याप्रमाणे भय्यांच्या दुकानात लटकवलेली पाहीली आहेत...

Nile's picture

30 Sep 2009 - 11:43 pm | Nile

चित्रांमध्ये फक्त पोटात देव दाखवलेले नसतात तर सर्वांगावर असतात.

कोटी हा एक देवांचा प्रकार आहे (जरी चित्रात सुर्य चंद्र इ. दाखवलेलं असलं तरी :) ) ३३ हा आकडा आहे. आता नविन धागा सुरु करुया का? ;)

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 4:49 pm | विजुभाऊ

सगळेच हिंदु गोमांस खात नाहीत असे नाही.
काहीजातींत खात नाहीत.
लहानपणापासून आपण गाइच्या दुधावर वाढलेलो असतो म्हनून गाईला गोमाता म्हंटले जाते.
पूर्वी गाय ही अ‍ॅसेट समजली जात असे. त्यामुळे गाय मारण्यापेक्षा पळवणे फायद्याचे ठरत असे
मुनींच्या गाई पणीनी पळवून नेल्या होत्या त्यावेळच्या युद्धा वरून गोमाता हा शब्द रूढ झाला

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 5:13 pm | धमाल मुलगा

अहो भाऊऽऽ...
तुम्हाला ३३ कोटी देव हवेत की गाय पळवायचीये???
नक्की प्रॉब्लेम काय्ये???

अवांतरः काका*, तुमचा थोडा द्राक्षासव भाऊंना पार्सल करा ना प्लीऽऽऽज....

*आमचे काका एकच!!! मिभोकाका :D

एकच बांका...मिभोकाका....
आर्रेऽऽऽऽ आव्वाज कुण्णाऽऽच्चा....
(इधानसभा विलेक्षन इफेक्ट हाय...समजुन घ्या राव सगळे :) )

विनायक प्रभू's picture

29 Sep 2009 - 5:14 pm | विनायक प्रभू

विनायक नावाच्या पिशाच्चाचे खरेच का निर्दालन झाले?

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 5:19 pm | धमाल मुलगा

प्रभुबाबा,
फार मोठा गैरसमज आहे तुमचा.

(*अधिक माहितीसाठी मिभोकाकांना व्यनि करा)
(पळा तिच्यायला!! आता काका काय मला सोडत नाय....गारदीच घालतील ;) )

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 5:42 pm | विजुभाऊ

पणीनी ऋषींच्या गाई पळवल्या. त्यात तेहेत्तीस कोटी देव कसे आले याची माहिती ठाऊक असल्यास सांगावी.

अवांतर : प्रभु मास्तरांचे पाळण्यातले नाव विनायक आहे हे विसरलास का रे धम्या? ( त्यांच्या पाळण्याची साईझ किती होती ते विचारू नकोस आता)

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 5:47 pm | धमाल मुलगा

म्हणजे तुम्ही प्रभुमास्तरांना पिशाच्च म्हणताय आडुन आडुन? :D

(आज तिच्यायला माझा मार खायचाच दिवस दिसतोय! जिथं तिथं काडयाच करणं होतंय राव)

सूहास's picture

29 Sep 2009 - 5:56 pm | सूहास (not verified)

त्यांच्या पाळण्याची साईझ किती होती ते विचारू नकोस आता>>>

पाळण्याची आणी बाळुत्याची ???

सू हा स...

निखिल देशपांडे's picture

29 Sep 2009 - 6:54 pm | निखिल देशपांडे

विजुभाउ....
कालच ३३ आकड्याचा महिम्याचा साक्षात्कार झाला...
अधिक माहीती साठी डॅन ब्राऊन चे द लॉस्ट सिम्बॉल वाचा....
त्या वरुन आम्ही पण अ‍ॅनलॉजी लावतो ३३ कोटी देव कसे काय आहेत ते.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 7:00 pm | धमाल मुलगा

लै लै भारी :)

निख्याशी सहमत!

अवांतरः देशपांडे, पुढच्या रविवारी कॅपिटॉलच्या तळाघरात या, कवटीतून लाल वाईन पिऊन मॅसॉनरीची शपथ घ्यायला ;)

निखिल देशपांडे's picture

29 Sep 2009 - 7:13 pm | निखिल देशपांडे

अवांतरः देशपांडे, पुढच्या रविवारी कॅपिटॉलच्या तळाघरात या, कवटीतून लाल वाईन पिऊन मॅसॉनरीची शपथ घ्यायला

मालक.... आम्ही तिकडे नाही हो... हाउस ऑफ टेम्पल मधे!!!!;)

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 7:18 pm | धमाल मुलगा

अंमळ घोळ झाला!
असो, आता ठरवलंच आहे तर या कॅपिटॉललाच ;)

निखिल देशपांडे's picture

29 Sep 2009 - 7:25 pm | निखिल देशपांडे

निमंत्रण मिळाले आहे...
एखादा शोल्क द्या ना अ‍ॅक्सेस कोड म्हणुन;)

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 7:27 pm | धमाल मुलगा

गोंदवून घेतलं नाहीयेस काहीच?

सूहास's picture

29 Sep 2009 - 7:54 pm | सूहास (not verified)

झ्क्ष्द्द्फ्ग्द्फ्ग

अवलिया's picture

29 Sep 2009 - 7:21 pm | अवलिया

४७

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

29 Sep 2009 - 7:22 pm | अवलिया

४८

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

29 Sep 2009 - 7:23 pm | अवलिया

४९

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

29 Sep 2009 - 7:23 pm | अवलिया

५० पुरे
विजुभाउ खुश

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

धमाल मुलगा's picture

29 Sep 2009 - 7:25 pm | धमाल मुलगा

=)) =))

असं करु नये नानु... ११,२१,५१ अशा पटीत असतं की नाही हिंदूधर्मात? मग??

घ्या माझा प्रतिसाद क्र. ५१ :)

हर्षद आनंदी's picture

30 Sep 2009 - 8:21 am | हर्षद आनंदी

चालु देत... या चर्चेने देवांना पण काही फरक पडत नाही.. मग आम्हाला का पडावा?

विजुभाऊ's picture

30 Sep 2009 - 2:29 pm | विजुभाऊ

अशा रितीने राजमान्य राजेश्री ठाणेराजवटीच्या श्रीमंत अदितीराजे दुर्बेटणै बैंच्या शिकवणीकीनुसार धाग्याचा संपूर्ण खफ झालेला आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Dec 2010 - 5:46 pm | अविनाशकुलकर्णी

३३ कोटी देव म्हणजे संख्येने ३३ कोटी नव्हेच. या त्यांच्या श्रेणी ज्या ठरवल्या गेल्या त्या आहेत ३३ कोटी. कोटी म्हणजे श्रेणी.

अष्ट वसु, ११.... रुद्र ( श्री शंकराची रुपे), १२.... आदित्य (सूर्य), असे एकुण ३१ कोटी. ३२ वे देवगुरु बृहस्पती अन ३३ वा इंद्र. असे सर्व मिळुन ते ३३ कोटी झालेत

मायबोलीगुगळ
=======================
११ रुद्र
१२ आदित्य
८ दिक्पाल
२ अश्विनी कुमार

डावखुरा's picture

1 Dec 2010 - 6:50 pm | डावखुरा

जम्मु काश्मीरला ३३ कोटी देवांचे मंदिर आहे.....
त्यात अनेक पायर्‍या आहेत आणि प्रत्येक देवाच्या नावाने एक शाळीग्राम विराज्मान आहे...
तिथे विचारल्यास कदाचित याचे उत्तर मिळु शकेल...


शाळीग्राम