मुजरा

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
29 Sep 2009 - 11:16 am

स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही
वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही

हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो
पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही

सगळे दिवस काळ्या आमावस्याच
माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही

सगळ्या वरवरच्या मलमपट्या
अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही

सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच
गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Sep 2009 - 12:05 pm | अवलिया

चांगला प्रयत्न.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
साप्ताहिक सकाळ नियमित वाचत चला, फायदा होईल.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 1:14 pm | मिसळभोक्ता

मै अकेला, मै अलबेला...

ह्या गीताचे भाषांतर ना ?

मी जिंकलो !

नान्या, मला जिंकल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षिस दे रे !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

फ्रॅक्चर बंड्या's picture

29 Sep 2009 - 2:24 pm | फ्रॅक्चर बंड्या

कशाचेही भाषांतर नाहीये..
मनात आले ते लिहलय...