एक आकाश माझही

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जे न देखे रवी...
28 Sep 2009 - 5:59 pm

माझ आकाश कायम माझच असत
तसही कोणी मागायला नाही येणार ते
हसू नकोस.....माहीतीय मला
खरच नाही येणार..........कोणीसुध्दा
का याव?? अस काय विशेष
तो एक तुकडा........
म्हणल तर फाटकातुटका
माझ्या मनात कायमचा विसावलेला
पावसाला आणणारा
विजांना चमकवणारा
शुभ्र धुक पाखरणारा
आणि हळूच त्या तेजोगोलाच
दर्शन घडवणारा
म्हण म्हण पुरे त्याच कौतुक
जेलस झालास ना???
नाहीच कळणार तुला
आमच स्पेशल नात
ए........रूसू नको ना.....
लहानपणी आजी मग आई-बाबा
सरतेशेवटी तू ...............
सर्वांनाच घर दिलय ना??
...........त्या आभाळात...........

- सोनाली घाटपांडे

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

28 Sep 2009 - 9:43 pm | मदनबाण

छान... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

गणपा's picture

28 Sep 2009 - 9:57 pm | गणपा

शेवटच्या दोन ओळींनी संपुर्ण कवितेचा अर्थ उलगडला.
आवडली.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश

क्रान्ति's picture

29 Sep 2009 - 7:59 am | क्रान्ति

कविता आवडली, शेवट अस्वस्थ करून गेला!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

लवंगी's picture

29 Sep 2009 - 8:05 am | लवंगी

शेवट अस्वस्थ करुन गेला. :(

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

29 Sep 2009 - 10:35 am | अमित बेधुन्द मन...

सरतेशेवटी तू ...............
सर्वांनाच घर दिलय ना??
...........त्या आभाळात...........