काल रात्री
मो. क. गांधी भेटले होते
महात्मा गांधींना पाहिलंस का?
म्हणुन विचारत होते
त्यांनी म्हणे कधीकाळी
रामराज्याचा संकल्प सोडला होता
काल सांगत होते
त्यांच्या रामराज्यातला
रामच हरवला होता
त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं
पोरा..
आजकाल सगळेच
गांधीवादी झालेत
बहुतांशी खादी(?)वादी झालेत
आज समाजात
खादीला(?) मोठा मान आहे
मनात गांधी नसला तरी
डोईवर गांधीटोपीची शान आहे
गांधीवादातला वाद राहिलाय
गांधी कुठेतरी हरवलाय....!
कुणी येताय का शोधायला..
हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय..
काल रात्री
मोहनदास करमचंद गांधी भेटले होते
हरवलेल्या महात्म्याला..
एकटेच शोधत होते...!
विशाल
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 11:37 am | हर्षद आनंदी
तेव्हा महात्म्याला हा प्रश्न पडला असता तर कदाचित भारत आज वेगळा असता..
माणसातला महात्मा जेव्हा माणसावर आरूढ होतो, तेव्हा गांधी बनतो.
22 Sep 2009 - 3:04 am | पाषाणभेद
अरे चाललय काय? तिकडे कुणाला प्रतिबींब दिसतेय ईकडे यांना महात्मा गांधी दिसतायेत.
कुणाकडे म. गांधी गांधी टोपी घातलेले आहेत असा फोटो आहे का?
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
22 Sep 2009 - 10:23 am | विशाल कुलकर्णी
हाये की नाय गंमत ! बापुंनी कधीच गांधी टोपीसहीत फटु नाय काडला. खरेतर त्यांनी टोपीसारख्या चैनी कधीच केल्या न्हायीत. पन आज मातुर गांधी टोपी हा महत्वाचा मुद्दा बनलाय. दुर्दैव एवढंच की डोइवर गांधी टोपी घालणारे गांधीजींना मात्र विसरुन गेलेत. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
22 Sep 2009 - 3:05 am | पाषाणभेद
प्रकाटाआ.