अजून

अजिंक्य's picture
अजिंक्य in जे न देखे रवी...
18 Sep 2009 - 2:24 pm

काळचक्र काळ ओढतो अजून,
का मनुष्य व्यास मोजतो अजून ||१||

मात्र रात्र झोपण्या मिळे तयास,
का उगाच स्वप्न पाहतो अजून ||२||

पाहतो जगात तो हिरे अनेक,
कोळसे उगाच वेचतो अजून ||३||

लागते जमीन फक्त चार हात,
वाटणीवरून भांडतो अजून ||४||

का स्वत:तला न सापडे प्रकाश,
देवळात देव शोधतो अजून ||५||

गझल

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2009 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडली कविता.

अदिती