आयुष्य म्हटले हा माणुस कधीच रडला नाही
नाहीच रडणार न झेपणारा राग कधीच गायला नाही
आयुष्य सजवले मी प्रेमाच्या फुलांनी
आयुष्यात प्रेमाचा मोगरा कधी फुलला नाही
जोडले मित्र जसे माळेमधे मणी
अजुनतरी एकही मणी निसटला नाही
कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही
आयुष्यभर गायली पावसाचीच गाणी
ह्रदयात दुष्काळ माझ्या कधीच टिकला नाही
कितीक घाव , कितीक दु:खे सोसली
माझ्यासाठी माझाच एकही शब्द रडला नाही
दैवानेही केले कित्येक वार अन घाव
असा कुठलाच घाव नव्हता जो सोसला नाही
हार-जीतची चिंताच नव्हती मनाला
खेळ असा मांडलाच नाही जो रंगला नाही
प्रश्न्च नव्हता कुणाचे पाय धराण्याचा
कुठल्याही दगडाला देव कधी मानला नाही
यम म्हटला आता तरी रड की बाबा
काय करणार मिशीचा पिळ अजुन उतरला नाही
प्रतिक्रिया
15 Sep 2009 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अय फ्रॅक्चर बंड्या, मिशीचा पीळ भारी रे.
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
15 Sep 2009 - 8:38 pm | अनिल हटेला
कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही
दैवानेही केले कित्येक वार अन घाव
असा कुठलाच घाव नव्हता जो सोसला नाही
यम म्हटला आता तरी रड की बाबा
काय करणार मिशीचा पिळ अजुन उतरला नाही
हे खासच आवडले....:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
16 Sep 2009 - 9:24 am | अमित बेधुन्द मन...
जोडले मित्र जसे माळेमधे मणी
अजुनतरी एकही मणी निसटला नाही
कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही
या ओळि खुपच मस्त
16 Sep 2009 - 2:55 pm | मदनबाण
झकास्स्स्स्स्स... :)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms
16 Sep 2009 - 6:57 pm | नाना बेरके
कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही
. . . बर्याच कवितेंच्या बाबतीत हे होत अस्तं.