ग्रील वरचे तंदुरी चिकन

लवंगी's picture
लवंगी in पाककृती
15 Sep 2009 - 8:22 am

प्रेरणा - प्रभोच चुलीवरच तंदुरी चि़कन

गेल्या आठवड्यात मिपा-मिपा खेळताना प्रभोच चुलीवरच तंदुरी चि़कन पहात होते.
बाजुलाच बसलेल्या नवरोबांची नजर फोटोवर गेली आणि "अरे वा, छान दिसतय. कधी करायच. मी सगळी मदत करतो" अशी फरमाइश सुरु झाली.
याची मदत म्हणजे मला धडकिच भरते. स्वयंपाकघराला अगदि युद्धशाळेच रूप येत.

त्यामुळे 'अरे, हे चिकन किनै जंगलात चुलीवरच छान लागत. आपण पुढल्या कॅम्पिंग ट्रिपला नक्की करुया' वगैरे टाळम् टाळ करायचा मी दुबळा प्रयत्न केला.
पण थंडीला सुरवात होत असल्याने कॅम्पिंग आता ७-८ महिने तरी होणार नाहि आणि कुठल्या गडावर चढून चुलीवर चिकन करायला आम्हाला बहुदा
पुढचा जन्मच घ्यावा लागेल हे पक्क ठाऊक असल्याने नवरोबांनी चिकाटी काहि सोडली नाहि. शेवटी गनिमी काव्याने बच्चे कंपनीला आपल्या गोटात सामिल करून
घेतल्याने मला तह करावाच लागला. तहाच्या अटीनुसार नवरोबांनी आठवडाभर भांडी घासणे ( डिशवाशर लावणे) , केर काढणे ( वॅक्युम क्लिनर ) , कपडे धुणे ( वॉशर-ड्रायर लावणे ), पोरांचा अभ्यास घेणे इत्यादि किरकोळ अटी आणी स्वयंपाक्घरात पाय टाकायचा नाहि या मुख्य अटीवर मांडवली झाली.

नवर्‍याकडून आठवडाभर व्यवस्थीत काम करून घेऊन शुक्रवारी मायरमध्ये जाऊन मी कॉर्निश हेन ( छोट्या कोंबड्या ) घेऊन आले. त्यांना लिंबू, मीठ आणि हळदीने आंघोळ घातली. तंदुरी मसाला, बचकभर दही आणी आलं-लसूण पेस्ट लावून नवर्‍याचा अंत बघत फ्रिजमध्ये २४ तास मुरवत ठेवल्या. 'घरची मुर्गी दाल बराबर नाही' हे माहित
असल्याने गपचुप काम करत अजुन एक दिवस वाट पहाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

दुसरे दिवशी सगळी काम नीट आटोपली गेली आहेत याची खात्री करुन मगच कोंबड्या बाहेर काढल्या. तेलाचा हलका स्प्रे मारला.
अव्हनला हाय वर गरम केल. कोंबडी ग्रील वर ठेवली. १५ मिनीटांनी उलट करून अजुन १५ मिनीट ठेवली. आतापर्यंत वासाने सगळ्यांच्या पोटात कावळे कोकलायला लागले होते. ३० मिनीटांनी गरमा गरम तंदुरी कोंबडी तयार!!

तर मंडळी पेश आहे ग्रील तंदुरी कोंबडी.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Sep 2009 - 8:46 am | विसोबा खेचर

काय बोलू?

शब्दच संपले! :)

तात्या.

शाहरुख's picture

15 Sep 2009 - 9:11 am | शाहरुख

काय बोलू?

शब्दच नाहीत! :-)

-शाकाहारी शाहरुख

विंजिनेर's picture

15 Sep 2009 - 9:16 am | विंजिनेर

कोंबडी छान...
एक शंका: ३० मि. मधे ग्रिल होते का चांगली (आतून)

आणि हो, तुमच्या नवरोबांना म्हणाव - "एक घासभर कोंबडीसाठी आठवडाभर जे काबाड कष्ट उपसावे लागले, हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या ते सर्व मी समजू शकतो पण क्विन ऑफ किचन समोर अशी शरणागतीच आरोग्यासाठी उत्तम असते - त्यामुळे फार वाईट वाटून घेऊ नका :D

(स्वयंपाकघरातून वारंवार पिटाळून लावला जाणारा बिचारा) विंजिनेर नवरोबा :(

लवंगी's picture

15 Sep 2009 - 6:00 pm | लवंगी

कॉर्निश हेन हे खूप लहान चिकन असत. त्यामुळे ३० मिनिटात एकदम छान होत. मी सुरीने आत छेद करून पाहिला आणी मगच बाहेर काढले.
जास्त वेळ ठेवल तर ड्राय होईल. पण करताना निट शिजलय हे पाहुनच बाहेर काढा.

आणी नवरोबांनी १ चिकन एकट्याने मटकवलय. त्यामुळे घासभर कोंबडी वगैरे काहि नाही !!

दिपक's picture

15 Sep 2009 - 9:23 am | दिपक

पाषाणभेद's picture

15 Sep 2009 - 9:48 am | पाषाणभेद

दिपकशेठ, तुम्ही कधीपासून आमच्या लाईनीत आले? आँ ?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

दिपाली पाटिल's picture

15 Sep 2009 - 9:51 am | दिपाली पाटिल

=)) हे एक्दम भारी

हो गं लवंगी, ३० मिनीटात झाली कां? बाकी कोंबडी एकदम भारी दिसतेय, आमचा थॅन्क्सगिविंगला प्लॅन आहे... :D

दिपाली :)

दशानन's picture

15 Sep 2009 - 9:26 am | दशानन

:|

गचकलो !

सूर्य's picture

15 Sep 2009 - 10:39 am | सूर्य

असेच म्हणतो ;)

- सूर्य

अवलिया's picture

15 Sep 2009 - 9:49 am | अवलिया

मेलो ..... जागच्या जागी ठार झालो...
अरे कुणी तरी कावळ्यासमोर ठेवा रे बनवुन...
नाही तर मी असाच भटकत राहील...
सुटका करा रे लवकर माझी ...
अरे आहे का कुणी ?
का सगळे गेले लवंगीकाकुच्या घरी !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

लवंगी's picture

15 Sep 2009 - 6:02 pm | लवंगी

नाना आता तुम्ही खरच मेलात!! >:P

अवलिया's picture

15 Sep 2009 - 6:09 pm | अवलिया

सॉरी ... आज्जी ! :$

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

लवंगी's picture

15 Sep 2009 - 6:44 pm | लवंगी

8|

सहज's picture

15 Sep 2009 - 9:55 am | सहज

आवडले.

नीलकांत's picture

15 Sep 2009 - 10:17 am | नीलकांत

मी सुध्दा ठार संपलो ! शब्द तर केव्हाच पाझरून गेले. आता फक्त पोटातील कावळे ओरडताहेत. :)

- नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2009 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

चिकन खास फोटोसेशनसाठी, उशा-पायथ्याशी काकडीचे काप घेऊन, उताणं झोपलं आहे. मस्त. अभिनंदन.

एक शंका. चिकनचा गंजीफ्रॉक(कातडे {स्किन}) काढला नाही का?
त्याखाली भरपूर चरबी, पर्यायाने कॅलरीज असतात.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

लवंगी's picture

15 Sep 2009 - 6:09 pm | लवंगी

मी नेहेमीचे चिकन असेल तर स्किन काढते. कॉर्निश हेनला अगदि कमी चरबी असते. त्यामुळे स्किन काढली तर हे चिकन खूप ड्राय होते. खाताना मात्र काढून टाकावी.

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2009 - 9:27 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

प्रभो's picture

15 Sep 2009 - 11:42 am | प्रभो

आईशपथ....१ नंबर झालंय ग बाई....

मला इथेच ढेकर आली.. :)

अवांतर : माझी royaltee कधी??

गणपा's picture

15 Sep 2009 - 12:38 pm | गणपा

एकदम फंडु..
बादलीभर लाळ गळली.. =P~

गणपा's picture

15 Sep 2009 - 12:40 pm | गणपा

प्रकाटाआ

मसक्कली's picture

15 Sep 2009 - 3:55 pm | मसक्कली

=P~ बादलीभर लाळ गळली...

आगदि बरोबर..... ;)

संदीप चित्रे's picture

15 Sep 2009 - 7:09 pm | संदीप चित्रे

शेवटच्या दोन फोटोंनी तर पूर्ण संपलो !!!
मस्त जमलेली दिसतेय.

श्रीयुत संतोष जोशी's picture

15 Sep 2009 - 7:18 pm | श्रीयुत संतोष जोशी

एकदम झक्कास झालेलं दिसतय.
खायला कधी मिळणार ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

लवंगी's picture

15 Sep 2009 - 7:35 pm | लवंगी

:)

सूहास's picture

15 Sep 2009 - 7:36 pm | सूहास (not verified)

सू हा स...

स्वाती२'s picture

15 Sep 2009 - 8:41 pm | स्वाती२

मस्त फोटो!
मी फोटोचं प्रिंट फ्रिजवर लाऊन ठेवलय. बघायचे आता नवरा आणि लेक यांच्यापैकी कोण उत्साहाने करतयं ते.

चित्रा's picture

16 Sep 2009 - 8:45 am | चित्रा

मी फोटोचं प्रिंट फ्रिजवर लाऊन ठेवलय.
ही छान कल्पना आहे. उद्याच करते.

आजचे माझे सर्व प्रतिसाद पाककृतींबद्दल(च) का यावेत हा मलाही प्रश्न पडला आहे. बहुतेक दिवसभर बर्‍यापैकी बेचव खाल्यामुळे असावे.

पण लवंगीताईंनी दिलेली पाककृती साधी आणि मस्त आहे, हेही खरेच. फोटोही छान.

प्राजु's picture

15 Sep 2009 - 11:53 pm | प्राजु

धन्य आहेस गं बाई!!!
बाय द वे राहतेस कुठे?? ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

17 Sep 2009 - 3:04 am | लवंगी

कधिपण ये उडत उडत.. :)

श्रावण मोडक's picture

16 Sep 2009 - 12:38 am | श्रावण मोडक

कुठून धागा उघडला हा यावेळी!!!

रेवती's picture

16 Sep 2009 - 7:14 pm | रेवती

लवंगीताईने बर्‍याचजणांना पाकृमुळे 'वर' पाठवले आहे.;)
मी शाकाहारी आहे तरी फोटू आवडले.
नवरोबांनी आठवडाभर भांडी घासणे ( डिशवाशर लावणे) , केर काढणे ( वॅक्युम क्लिनर ) , कपडे धुणे ( वॉशर-ड्रायर लावणे ), पोरांचा अभ्यास घेणे इत्यादि किरकोळ अटी आणी स्वयंपाक्घरात पाय टाकायचा नाहि या मुख्य अटीवर मांडवली झाली.
किरकोळ? ही हा हा हा!;)

रेवती

मुक्ता's picture

16 Sep 2009 - 8:52 pm | मुक्ता

नवरोबांनी आठवडाभर भांडी घासणे ( डिशवाशर लावणे) , केर काढणे ( वॅक्युम क्लिनर ) , कपडे धुणे ( वॉशर-ड्रायर लावणे ), पोरांचा अभ्यास घेणे इत्यादि किरकोळ अटी आणी स्वयंपाक्घरात पाय टाकायचा नाहि या मुख्य अटीवर मांडवली झाली.

हे कस काय जमत बुवा तुम्हाला..? आमचे हे ढिम्म हलायचे नाहित..
पण स्वताच तंदुरी उत्तम करतात.असो कॉर्निश हेन कधी केली नाही करुन
पाहीन.

...बाकी फोटो झ्याक्च...

मुक्ता

लवंगी's picture

16 Sep 2009 - 9:18 pm | लवंगी

पाकक्रुती किती सोपी आहे कि नई? पण ३० मिनिट अजिबात स्वयंपाकघरातन बाहेर यायचच नाहि आणि त्याला आत प्रवेश करू द्यायचा नाहि. अर्ध्या तासाने खूप दमलेलो आहोत अस चेहेरा करून बाहेर यायच.. ;) अस केल ना कि नवरे गुपचुप सगळी काम करतात.. :)

एक's picture

16 Sep 2009 - 10:14 pm | एक

कॉर्निश हेन म्हणजेच गेम हेन का?

आणि चरबी का काढायची?.. तिचीपण एक टेस्ट असतेच की..एखाद्या दिवशी ४-५ मैल जास्त धावायचं! हाय काय अन नाय काय!

लवंगी's picture

17 Sep 2009 - 5:58 pm | लवंगी

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार.

स्वाती२'s picture

21 Sep 2009 - 11:17 pm | स्वाती२

फ्रिजवरील प्रिंट पाहून लेकाची विकेट पडली. त्यातच नवरात्र म्हणजे नऊ दिवस वरणापुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर त्याला अगदी राहवेना. त्याने गुरवारी शाळेतुन आल्यावर हेन मुरवत टाकली. शुक्रवारी संध्याकाळी ओव्हन मधे. ४० मिनिटांनी बाहेर काढून आजीला पाठवायला फोटो सेशन. त्यातलाच एक फोटो.

स्वाती२'s picture

22 Sep 2009 - 5:52 am | स्वाती२

धन्यवाद.

सुबक ठेंगणी's picture

22 Sep 2009 - 5:04 am | सुबक ठेंगणी

अगं हे काय सही आहे...हया रविवारचा मेन्यू ठरला.
आणि काय आहे...तुझ्या नव-याने केलेली सगळी कामं माझी मलाच करावी लागतात...सो कॅलरीजची पर्वा न करता एन्जॉय करीन :)