चुलीवरचं तंदूरी चिकन

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
2 Sep 2009 - 11:29 pm

हे चिकन आम्ही ईंजिनियरींग तिसर्‍या वर्षाला असताना रायगडी गेलो होतो (DEC २००४) तेंव्हा केले होते..

रायगडावर स्वता: चिकन बनवायचे , ते पण तंदूर म्हणून एका सायकल च्या दुकानातून २०-२५ नविन स्पोकस घेऊन गेलो होतो आम्ही. तर असचं आम्ही एका पहाटे चिंचवड हून निघालो रायगडला ३ दुचाक्यांवर ६ जण. रस्त्यात मुळशी आणी ताम्हिणी घाटात थोडा टाईमपास केला.आणी साधारण १०-१०.३० च्या सुमारास महाडला पोचलो.

तिथे एका मटण दुकानात ३ जिवंत कोंबड्या विकत घेतल्या. त्याच दुकानदाराकडून उद्या परत करण्याच्या बोलीवर त्याचीच हलाल करायची सुरी घेतली. बाकी सोलण्यासाठी सुरी आमच्याकडे होतिच.

गड पायर्‍यांनी चढता चढता दही विकत घेतले लावुन ठेवण्यासाठी..वर चढल्यावर आधी रहायची सोय करुन घेतली..(चढायला २-३ तास लागले...आर्धे फुकाडे होते चढणार्‍यांतले) आणी कोंबड्या हलाल करुन ठेवल्या.

साधारण २० एक मिनिटांनी कोंबड्या सोलुन घेतल्या...तोपर्यंत मित्रांनी दह्यात गरम मसाला, हळद, आलं - लसूण पेस्ट थोडं मीठ , घरून आईने बनवून दिलेला मसाला एकत्र करून ठेवला होता.

त्या दह्यात कोंबड्या म्यारिनेट करून ३ तास ठेवल्या ...मग तिथेच एक दगडांची चूल बनवली ...चूलीत रायगडावरच जमा केलेली लाकडं घातली ...कागदाचीच फुंकणी केली.. मग प्रत्येक कोंबडीत ६-८ सायकलचे स्पोक्स घुसवले....आनी चुलीवर (हेच आमचं तंदूर) ठेवले...साधारण १ तास लक्ष देउन तंदूर तयार झाले ते असे..

सगळ्यांनाच भूका लगल्याने सजावट करुन वगैरे फोटो काढण्याच्या भानगडीत न पडता लगेच खाऊन संपवलं पण सगळ्यांनी..

टिप : हे हिवाळ्यात ट्रेक वगैरे करताना बनवू शकतो...ऊन्हाने खराब व्ह्यायचा त्रास नाही..आणी पवसाळ्यात कोरडं लाकूड मिळणार नाही..म्हणून..जिवंत कोंबड्या ऐवजी आजकाल मिळणार गोदरेज अथावा वेंकीस प्याकबंद चिकन नेऊ शकतो..

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

2 Sep 2009 - 11:32 pm | मिसळभोक्ता

थोरल्या आबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गडावर मांसाहार केल्याबद्दल तीव्र निषेध !

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

2 Sep 2009 - 11:48 pm | टारझन

वा !! साल्या .. तु कोंबड्या कापायचास हे मला म्हाईतंच नव्हतं .. तसा तु खाटका सारखा डेंजर दिसायचास खरा कॉलेजात :)

असो .. कोण कोण गेलेलं रे ?

प्रभो's picture

2 Sep 2009 - 11:53 pm | प्रभो

मी फक्त सोलल्या रे....हलाल करायला एका मित्राला येत होतं तो काश्मीरी होता..त्याच नाव मनिष...मी सोडून बाकिचे सगळे म्याकानिकल चे होते रे....अमेय, मनिष, अभिजित, सुयोग, भूषण

sujay's picture

3 Sep 2009 - 12:27 am | sujay

१ नंबर !!
मलाही ईंजिनियरींग च्या दिवसांची याद आली, अम्ही बी हा चाळा बरेचदा केला होता.
स्पोक एवजी स्क्युर्वस (होटेलात तंदूर ला वापरतात त्या सळया) वापरवेत म्हंजी जास्त वजन झाल (कोंबडीच) तरी चिंता नाय.
पुण्यात मंडईत रामेश्वर चोकात भांड्याचा दुकानात २५-३० रू. ला मिळतात.

बाकी हे तंदूर आणि ओल्ड मंक म्हणजे ईंजिनियरींग च्या दिवसातील स्वगसुख (आईला स्व वर रफार काय जमना)!!

(nostalgic) सुजय

प्रभो's picture

3 Sep 2009 - 10:48 am | प्रभो

ठाण्यात कुठे मिळतात का हे स्क्युर्वस???? सध्या ठाण्यात आहे मी.

नाही माहीत मित्रा . मी कधीच ठाण्याला आलो नाहीये,सो नाय माहीत.

(ठाण्याला किंवा ठाण्यात न गेलेला) सुजय