मंजूर नाही

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
11 Sep 2009 - 2:37 pm

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

गझल

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Sep 2009 - 2:42 pm | मदनबाण

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !
मस्तच...
मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही
व्वा.
अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '
लयं भारी... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

मूकवाचक's picture

23 Apr 2013 - 10:39 am | मूकवाचक

+१

मनीषा's picture

11 Sep 2009 - 3:24 pm | मनीषा

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

खूपच छान ..

यशोधरा's picture

11 Sep 2009 - 3:27 pm | यशोधरा

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

सुरेख!

अनिल हटेला's picture

11 Sep 2009 - 3:56 pm | अनिल हटेला

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

क्या बात है......:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2009 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

क्या बात है ! आवडल्या ओळी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

11 Sep 2009 - 3:55 pm | कानडाऊ योगेशु

सुरेख गझल.
मतल्यातील शेर तर सर्वोत्कृष्ठच!

दशानन's picture

11 Sep 2009 - 4:05 pm | दशानन

ओह !

अत्यंत सुदर !

आवडली !

राघव's picture

11 Sep 2009 - 5:25 pm | राघव

अतिशय उत्तम!
प्रत्येक शेर अगदी खणखणीत. संपूर्ण गझल आवडली! :)

(क्रांतीतैच्या गझलांचा फॅन) राघव

अविनाशकुलकर्णी's picture

11 Sep 2009 - 5:59 pm | अविनाशकुलकर्णी

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही ..

आय हाय क्या बात है...बहोत खुब

श्रावण मोडक's picture

11 Sep 2009 - 6:41 pm | श्रावण मोडक

रचना एकदम मंजूर आहे.

अविनाश ओगले's picture

11 Sep 2009 - 7:16 pm | अविनाश ओगले

आवडली.

चतुरंग's picture

11 Sep 2009 - 7:20 pm | चतुरंग

एकेक शेर आरपार! :)

(मंजूर)चतुरंग

धनंजय's picture

11 Sep 2009 - 7:28 pm | धनंजय

छान गजल आहे.

sujay's picture

11 Sep 2009 - 7:37 pm | sujay

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

केवळ अप्रतीम !!

(तुमच्या गजलांचा फ्यान) सुजय

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

11 Sep 2009 - 7:47 pm | अमित बेधुन्द मन...

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

अप्रतिम

प्राजु's picture

11 Sep 2009 - 7:49 pm | प्राजु

खणखणीत गझल... !!!
जबरदस्त !!

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

या खूप खूप आवडल्या ओळी.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अन्वय's picture

11 Sep 2009 - 11:21 pm | अन्वय

कौतुकासाठी शब्द नाहीत
सुरेख गझल
अप्रतिम

निमीत्त मात्र's picture

11 Sep 2009 - 11:31 pm | निमीत्त मात्र

संदीप खरेंची नामंजूर कविता ह्यामागची प्रेरणा आहे का? मंजूर नाही पेक्षा नामंजूर जास्त ठसकेबाज वाटते. इथला रदीफही बदलून नामंजूर करता येईल का?

जपत किनारा शीड सोडणे नामंजूर! कसं एकदम त्वेषात म्हणावसं वाटतं.

अन्वय's picture

11 Sep 2009 - 11:46 pm | अन्वय

संदीप खरेंची नामंजूर कविता ह्यामागची प्रेरणा आहे का?

संदीप खरेंना लिहिता येते????

क्रान्ति's picture

12 Sep 2009 - 9:22 am | क्रान्ति

निमित्तमात्रजी, मी संदीप खरे यांच्या कविता वाचल्या नाहीत, कधीतरी काही कविता ऐकल्या आहेत. नामंजूर ही तर कधीच ऐकली नाही. मिपावर स्वाक्षरीत काही ओळी वाचल्या आहेत.
माझ्या याच नाही, तर प्रत्येकच गझलमागची प्रेरणा माझे आद्य गझलगुरू स्व. सुरेश भट, त्यांच्या नावाचं संकेतस्थळ sureshbhat.in, तसंच आणखी एक संकेतस्थळ marathigazal.com, या संकेतस्थळावर गझल आणि गझलविषयी लेख लिहिणारे सर्व मान्यवर, मिपा आणि मायबोली या संकेतस्थळांवरचे मान्यवर कवि आणि गझलकार, त्यांच्या रचना, वाचकांच्या हुरूप वाढवणार्‍या प्रतिक्रिया आणि सगळ्यात शेवटी माझं मन, माझे विचार! याशिवाय अन्य कोणतीही प्रेरणा माझ्या गझललेखनामागे नाही, हे सविनय सांगावेसे वाटते.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 12:07 am | मुक्त विहारि

संदीप खरे ह्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम जरूर पहा..

तोपर्यंत जरा हे ऐका..

http://www.youtube.com/watch?v=34sOysa47Fs

लवंगी's picture

12 Sep 2009 - 12:43 pm | लवंगी

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !
अप्रतिम..

सचिन's picture

12 Sep 2009 - 1:44 pm | सचिन

क्षमस्व....! पण मला ही कविता विशेष समजली नाही. भटांच्या कवितांशी खूप साधर्म्य वाटते, आणि वाचताना त्यांच्याप्रमाणेच एक र्‍र्हिदम जाणवतो...म्हणून छान वाटली. पण, कुठल्या मानसिक परिस्थितीत ह्या ओळी सुचल्या आहेत वा प्रसंग काय आहे...समजले नाही.
नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !
--- येथे बन्धने नकोत असे वाटत असताना,
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !
--- येथे बन्धने हवीत असे वाटत आहे.
तसेच,
अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '
हे जरा विषद केलेत तर बरे होईल.

- माझ्या स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल प्लीज गैरसमज नसावा. कविता मला समजली नाही असे माझे मत आहे. अधिक नीट समजावी आणि आनन्द घेता यावा म्हणून लिहिले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Sep 2009 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

कविता उमगली समजली आणी आवडली :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Sep 2009 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

काही ओळी खूपच आवडल्या.

बिपिन कार्यकर्ते

अजिंक्य's picture

13 Sep 2009 - 6:22 pm | अजिंक्य

अतिशय छान गझल.
तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

मस्त.
अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

आवडलं. असेच लिहीत राहावे.
-अजिंक्य.

फ्रॅक्चर बंड्या's picture

15 Sep 2009 - 11:00 am | फ्रॅक्चर बंड्या

फार छान गझल आहे

निशांत५'s picture

15 Sep 2009 - 11:06 am | निशांत५

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

या ओळी आवड्ल्या......

पाषाणभेद's picture

15 Sep 2009 - 12:13 pm | पाषाणभेद

तुमची गझल न वाचणे
मंजुर नाही.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सोनम's picture

15 Sep 2009 - 12:57 pm | सोनम

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

खूपच छान... :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

नरेंद्र गोळे's picture

15 Sep 2009 - 4:15 pm | नरेंद्र गोळे

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही ! >> वा! सुंदर.

हा शेर गझलेच्या मूळ भावनेशी विसंगत आहे खराच.
पण मला मात्र तोच जास्त भावला आहे.

दुर्लक्षून जावे अशी ही कविता नाही.
मात्र लक्ष देऊन पाहणार्‍यांस विसंगतीच जास्त दिसत आहेत.

मिसळभोक्ता's picture

16 Sep 2009 - 2:02 am | मिसळभोक्ता

गोळे काका,

ही गझल आहे, कविता नाही.

गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते.

कलोअ

-- मिसळभोक्ता

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

यात दुरावा असण्याला कारणीभूत असणारं कोणतंही बंधन मंजूर नाही असा भाव व्यक्त होतोय. त्यामुळे उलट गझलेची भावना जास्त उत्कटपणे पोचतेय असे वाटते. अप्रतीम गझल! :)

अग्निकोल्हा's picture

23 Apr 2013 - 10:31 am | अग्निकोल्हा

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

विषेश भावले.

चाणक्य's picture

23 Apr 2013 - 10:44 am | चाणक्य

सुरेख रचना. आवडली

श्वेता२४'s picture

24 Dec 2019 - 11:42 am | श्वेता२४

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

क्या बात!