पुन्हा पावसाला..

अनिरुध्द's picture
अनिरुध्द in जे न देखे रवी...
10 Sep 2009 - 10:36 am

(हि कविता हे मला सुचलेलं एक विडंबन आहे. मिलींद इंगळे यांच्या "गारवा" या अल्बम मधील 'पुन्हा पावसाला सांगायचे' यावरुन सुचलेले. मिलींद इंगळे यांची माफी मागून हे सद्य परीस्थिती दाखवणारं विडंबन टाकत आहे)

पुन्हा पावसाला सांगायचे
किती वेळ असे दडून रहायचे

तुझ्या लांबण्याने दरी सुकली
हिरवी वनराई जळू लागली
ढगांनी किती दूर धावायचे

पुन्हा पावसाला सांगायचे
किती वेळ असे दडून रहायचे

तेव्हढ्यात मला पाऊस दिसला
जमीनीवर बरसण्यास होता आसुसला
मला बघून खिन्न हसला.... म्हणाला.....

तुम्ही माणसांनी मला रोखले
झाडे तोडल्याने जग हे तापले
वीकेन्ड होम तुम्ही बांधले
नदी-नालेही त्यांची वाट चुकले

किती माणसाला सुचवायचे
उगा का असे त्याने वागायचे

मग माझ्याही डोळ्यांत पाणी आलं
पाणी भरल्या ढगांनाही ते नाही पाहावलं
पाऊस म्हणाला -

तुझी आसवे पाझरु लागता
कसा होई तुज पश्चात्ताप आता
इशाराच हा पुढे सावध वागा
निघालो मी, मला आहे बरसायचे

आणि पाऊस खूप बरसला
बरसण्याआधी त्याने इशारा दिला
पर्यावरणाला हानी न पोचवण्याचा
तेव्हाच मी संकल्प केला.

विडंबन