आमचेही काही प्रश्न...

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
25 Feb 2008 - 1:11 am
गाभा: 

सप्रेम नमस्कार,
आम्ही या संकेतस्थळावर तसे नविनच सदस्य आहोत.  सरपंचांपासुन स्फूर्ती घेऊन आम्हाला पडलेले काही कॉमन प्रश्न इथे देत आहोत.  कुणाला उत्तरे माहिती असल्यास देण्याची कृपा करावी...
१०.  मि. पा. वरील सदस्यांची सध्याची एकूण संख्या किती?
९.  मि. पा. वर अधूनमधून एका सुंदरीचे चित्र दिसते.  ही बया कोण, (आणि मुख्य म्हणजे) कुठे भेटेल?:)
८.  मि. पा. वर दारूचे नांव काढताक्षणी सगळे इतका आनंदकल्लोळ का करतात?
७.  चतुरंगसाहेब बुध्दिबळपटू असावेत का?
६.  पेठकरसाहेब आणि स्वाती राजेश यांना रेसेपी ठाउक नसलेले पदार्थ कोणते?
५.  मराठीच्या अभिमानाने पेटलेले इनोबा शांत असण्याच्या वेळा कोणत्या?
४.  बिरूटेसाहेब मि. पा. वर नेहमी प्रा. डॉ. अशी डबल बॅरलची बंदूक घेऊन का फिरतात?
३. सरपंच, जनरल डायर, तात्या, आणि विसोबा खेचर हे त्यांच्या लेखनशैलीवरून भाऊभाऊ वाटतात.  प्रत्यक्षात तसे आहे का?
२.  उद्या चारोळ्या करण्यावर बंदी आली तर प्राजुची तब्येत फारच खालावेल का?
आणि,
१. त्या हरामखोर पिवळ्या डांबिसाला इथे येण्याची परवानगी कशीकाय मि़ळाली बॉ?
ह. घ्या.:)))

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

25 Feb 2008 - 1:30 am | इनोबा म्हणे

च्यामारी...डांबीसा
लेका(खरं तर 'काका' म्हणायला हवं)
बाकी मी २४ तास पेटलेलाच असतो...
१. त्या हरामखोर पिवळ्या डांबिसाला इथे येण्याची परवानगी कशीकाय मि़ळाली बॉ?
अगदी १००%सहामत
||इनोबा म्हणे||

विसोबा खेचर's picture

4 Oct 2011 - 6:19 pm | विसोबा खेचर

९.  मि. पा. वर अधूनमधून एका सुंदरीचे चित्र दिसते.  ही बया कोण, (आणि मुख्य म्हणजे) कुठे भेटेल?:)
आपण ह्या बयेबद्दल म्हणताय का?

ही आमची अत्यंत लाडकी दाक्षिणात्य नटी अनुष्का! तिला भेटावयास आपल्याला दक्षिण भारतात चेन्नई येथे जावे लागेल..
तशी ती अधनंमधनं मुंबईत येते व एका बड्या आसामीच्या मध्यस्थीने आम्ही तिच्याशी ओळखही काढली आहे व एकदोन फिल्मी पार्ट्यात तिला भेटलोही आहे! :) 

आम्ही मात्र तेवढ्यानेच पाघळलो होतो आणि 'मिसळपावला मालकीण मिळाली!', अशी स्वप्न रंगवत घरी परतलो होतो! :))))

अहो ठाण्याला दोन खोल्यांच्या जागेत राहणारे आम्ही! अनुषाला कसं पटायचं हे? :) 
पण चलता है! सालं तरूण वयात होतं असं कधी कधी आणि चढतो असा कधी कधी एकतर्फी इष्कचा बुखार! :) उतरेल काही दिवसांनी...! :)
परंतु ती एक बॉलिवुड-टॉलिवुड मधली फेमस व्यक्ति आहे एवढेच सांगतो! :)
असो... बाकी प्रश्नांची उत्तरे सवडीने!
आपला,(अनुष्काप्रेमी) तात्या.

आत्मशून्य's picture

6 Oct 2011 - 12:20 am | आत्मशून्य

इथे, आपली आवड फारच जूळते म्हणायची अनुष्का शेट्टी माझीही अत्यंत आवडती आहे. :) तिचे रॉबरी पासून ते अरूधतीपर्यंत सर्व चित्रपट पाहिले आहेत :) विक्रमार्कूडू मधलं जूम्जूम माया गाणं तर माझ्या खरडवहीमधेच कितीतरी दिवस लावल होतं :)

धागा वर आणनार्‍याचे मनापासून आभार, अनुष्काला बघूनच बरं वाटलं त्यातच अजून एका अनुष्का फॅनची ओळख झाल्याने तर विषेश आनंद झाला :)

प्राजु's picture

25 Feb 2008 - 2:31 am | प्राजु

छे हो.. माझी कसली तब्बेत खालावते? ती खालावली तर तुमच्या प्रतिसादांना उत्तरे कोण लिहिणार?
- (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा's picture

25 Feb 2008 - 12:41 pm | धमाल मुलगा

मि. पा. वर दारूचे नांव काढताक्षणी सगळे इतका आनंदकल्लोळ का करतात?डा॑बिसकाका, माझ्यामते हा आन॑दकल्लोळ सगळेच सगळीकडे करतात...फक्त मनातल्यामनात, कारण सभ्यतेची अवास्तव कारण॑ आणि सज्जनतेची झूल.मिपावर कस॑ तिच्याआयला सगळ॑ मोकळ॑ ढाकळ॑ ! एकदम साल॑ दिल खोल के!आता त्यामध्ये आमच्यासारखे हावरट आणि बेवडे आले म्हणजे काय, विचारायची सोयच उरली नाही. असो, भारतात केव्हा येताय? या माझ्याकडे..बसु मस्त स्फटीकाच्या ग्लासात बर्फाचे खडे अन् सोनेरी इस्कॉच घेऊन. तुपली मपली आवडसारखीच हाय बव्हत्येक :))- आन॑दकल्लोळी ध मा ल.

हेच म्हणतो ........
"असो, भारतात केव्हा येताय? या माझ्याकडे..बसु मस्त स्फटीकाच्या ग्लासात बर्फाचे खडे अन् सोनेरी इस्कॉच घेऊन. तुपली मपली आवडसारखीच हाय बव्हत्येक :))"
शेहनशहा-ए-धमालिस्थान ....
आपले ठरल्याप्रमाणे जर आपण डांबिसकाकांना घेऊन 'बेंगलूर' सल्तनतीत आल्यास आपण 'जश्ने बहार' ऊडवून देऊ ......

धमाल मुलगा's picture

25 Feb 2008 - 3:00 pm | धमाल मुलगा

वा ! नेकी और पूछ पूछ ?  अरे ४-२ जिवलग भेटणार असतील तर आपण नक्कीच करू हा कार्यक्रम ! डा॑बिसकाका, बघा १ नाही २-२ आम॑त्रण॑ आहेत, बोला कधी स॑धी देताय आपल्या सेवेची? आम्ही तर नुसतेच "बसु" म्हणालो...(साल॑ कद्रुपणा काही जात नाही) आमचा डॉनभाऊ तर "जश्न-ए-बहार" करू म्हणतोय....बघा तुमच॑ क्यालि॑डर अन् सा॑गा  कधीफिल्डी॑ग लाऊन ठेऊ ते!डॉन-ए-हि॑डोस्ता॑, नक्कीच करू आपण असा कार्यक्रम... आपला,- सरताज-ए-धमालिस्तानध मा ल.

डाम्बीस काकाला उत्तरे मिळाली असावीत

विजुभाऊ's picture

25 Feb 2008 - 3:05 pm | विजुभाऊ

पिवळा डाम्बिस्.....बाकी तुम्हाला नाव झकास गवसलय्.....पु लं च्या एका पुस्तकात मी हे वाचले होते.....
पण मला एक सान्गा की तुम्हाल हे सम्बोधन प्रथम कोणी दिले?
माझे नाव मी डामरट असे ठेवणार होतो....पण .......( याला मराठीत्..न बोलुन शहाणे...असे म्हणतात) असो...
बाकी सरपंच, जनरल डायर, तात्या, आणि विसोबा खेचर हे त्यांच्या लेखनशैलीवरून भाऊभाऊ वाटतात.  हे खरे आहे....
मी माझ्या एक सज्जन मित्राला ही साईट पहा म्हणालो...त्याने साईट पाहुन पहिला प्रश्न विचारला "या इतक्या चान्ग्ल्या साइट ला उत्पन्न काय?"   मला ही हा प्रश्न पडला?.........
तुम्च्या डाम्बिसपणातुन हा काही शोध लागतो का बघा.
*उ.सू.:ही साइट मेम्बरां कडुन  वर्गणी घेउन चालविली तरी चालेल......
 
 
 

विसोबा खेचर's picture

25 Feb 2008 - 3:23 pm | विसोबा खेचर

पिवळा डाम्बिस्.....बाकी तुम्हाला नाव झकास गवसलय्.....पु लं च्या एका पुस्तकात मी हे वाचले होते.....
पुलंच्या तुझे आहे तुजपाशी या नाटकात हे नांव आहे..
आपला,तात्या देवासकर.
त्याने साईट पाहुन पहिला प्रश्न विचारला "या इतक्या चान्ग्ल्या साइट ला उत्पन्न काय?"   मला ही हा प्रश्न पडला?.........
अगदी भरपूर उत्पन्न आहे! मिपावरची सततची माणसांची ये/जा, त्यांचा वावर, त्यांची थट्टामस्करी, त्यांचे राग-लोभ-थट्टा-मस्करी-प्रेम-ममता-माया-मारामार्‍या-भांडणं-हेवेदावे-वावविवाद आणि मुख्य म्हणजे त्यांचे मिपावरील निर्व्याज प्रेम, हेच मिपाचे अनमोल उत्पन्न आहे! :)
*उ.सू.:ही साइट मेम्बरां कडुन  वर्गणी घेउन चालविली तरी चालेल......
स्वागत आहे. अतिशय उत्तम कल्पना आहे..! 
कृपया इच्छुकांनी सव्वा रुपाया (Rs 1.25 only!!) इतकी वार्षिक वर्गणी आयसीआयसीआय बँकेच्या ००३५०१०६१७२३ या क्रमांकाच्या बचत खात्यात रोखीने भरावी. :)
धनादेश चालणार नाही! :)
आपला,(एक धंदेवाईक मराठी!) तात्या.

राजमुद्रा's picture

25 Feb 2008 - 3:11 pm | राजमुद्रा

मि. पा. वर दारूचे नांव काढताक्षणी सगळे इतका आनंदकल्लोळ का करतात?
कारण मी असं ऍकलयं की दारूची चव कडू असते. तरीही ती एवढी आवडण्याचे कारण कोणी देवू शकेल का?म्हणजे ती पिताना चांगली वाटते की पिल्यानंतर्?माझा हा प्रश्न बाळबोध वाटला तरी हरकत नाही. पण दारू पिल्यानंतर कसे वाटते?(हे शब्दात कुणी सांगू शकेल क?)
राजमुद्रा :)

धमाल मुलगा's picture

25 Feb 2008 - 4:38 pm | धमाल मुलगा

प्रश्न चा॑गला आहे. उत्तर ,मात्र कठीण आहे.ती पिताना चांगली वाटते की पिल्यानंतर्? ह॑...आवड आपली आपली. कोणाला कडवट आवडते, कोणाला गोडसर. तिच्यातकाय मिसळताय त्यावर हे अवल॑बून असते. पिताना आणि प्यायल्यावरही छान वाटत॑पण दारू पिल्यानंतर कसे वाटते?(हे शब्दात कुणी सांगू शकेल क?) छान...उत्तम...अनभिषिक्त सम्राटासारखे (तात्या...माझ्या आवशीला नका हो सा॑गू :) ). मन कस॑ हलक॑ हलक॑ होत॑...सगळे आपले जवळचे वाटू लागतात... "हे विश्वचि माझे घर" भावना मूळ धरू लागते. जगात सगळीकडे आन॑दी-आन॑दपसरलेला आहे अस॑ वाटायला लागत॑..... ह्याला काही अपवादही आहेत. त्या॑ना दु:ख्खाच॑ भरत॑ येत॑...लहान मुलासारख॑रडू लागतात...एकूण काय तर्...दारू माणसात लपलेला खरा अवतार बाहेर काढते.|| इति सुरापुराणस्य प्रथम अध्याय समाप्त ||- ध मा ल (दारूवाला).

राजमुद्रा's picture

25 Feb 2008 - 4:54 pm | राजमुद्रा

दारू पिल्यावर एवढे छान वाटते तर मग बहुतांशी लोक (विशेषत: भारतातील जुने लोक) दारूला वाईट का म्हणत असावेत? विशेषतः स्त्रीयांसाठी.
 राजमुद्रा :)

धमाल मुलगा's picture

25 Feb 2008 - 5:42 pm | धमाल मुलगा

दारूला वाईट का म्हणत असावेत? कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात वाईटच. एकदा आन॑द मिळतोय म्हणल्यावर लोक ऊठसुठ तेच करू लागले तर प्रकृतीला हानी पोहोचते. एकाच वेळी जास्त प्रमाणात सेवन केल्यास मनुष्य आन॑दातिरेकाने मर्कटलिला करू लागतो, ज्यायोगे त्याच्या सामाजिक स्वास्थास धोका स॑भावतो. विशेषतः स्त्रीयांसाठी. स्त्रीया॑च्या शारिरीक जडणघडणीमध्ये पुरूषा॑पेक्षा फरक असल्या कारणे आणि मद्याच्या अतिसेवनाने शरिरात विषद्रव्या॑चे प्रमाण वाढून होणार्‍या गर्भास धोका स॑भावतो.  ह्याशिवाय, भारतीय स॑स्कृतीमध्ये स्त्रीया॑नी विनयशील रहावे असे सर्वमान्य असताना, मद्यसेवनाने स्त्रीचा स्वतःवरील ताबा सुटल्यास ते  तिच्यासाठी, तिच्या कुटु॑बासाठी सामाजिक पत-प्रतिष्ठेच्या अनुष॑गाने विचार केल्यास घातक ठरते. कुवतीनुसार व सा॑गोपा॑ग विचार करून केलेल्या अभ्यासानुसार मी वरील श॑का दूर करण्याचा यत्कि॑चित यत्न केला आहे. याउप्पर आणखी काही माहिती हवी असल्यास नि:स॑कोच पृच्छा करावी.आपला,- वैद्यराज ध मा ल. (सल्लागार, आर्य मदिरा म॑डळ - स॑लग्न: अखिल भारतीय मदिरा उत्थान महासभा.)

राजमुद्रा's picture

25 Feb 2008 - 6:39 pm | राजमुद्रा

धन्यवाद ! धमालदादा
राजमुद्रा :)

८ - अहो दारुचे नाव काढताक्षणी म्हणजे काय, आमच्यासारख्या असुरावाद्यांसाठी "मि.पा. = मिसळपाव" असे असले तरी सगळ्या सुरावाद्यांसाठी "मि.पा. = मिळालीच पाहिजे", असे आहे!:))
७ - बुध्दिबळ हा बैठ्या खेळापैकी आमचा अत्यंत लाडका खेळ! आम्ही वयाच्या नवव्या वर्षापासून खेळत आलो.  आमच्या जुन्या वाड्यात खालच्या मजल्यावर एक छोटीशी खोली होती तिथे मी हळूच जाऊन बसत असे आणि तासनतास माझा खेळ चाले. पूर्वी इलस्ट्रेटेड वीकली मधे आर्.एन्.सप्रे नावाचे खेळाडू ह्यातली कोडी घालत आणि जगज्जेत्या खेळाडूंचे उत्तमोत्तम डावही दिलेले असत. ते मी सोडवीत बसे. बर्‍याचदा तीर्थरुपांच्या हातचा मारही खाल्ला अभ्यास टाकून खेळत बसल्याबद्दल.
कालिजात असताना बरे खेळत असू. मिखाइल ताल, गॅरी कास्पारोव आणि विश्वनाथन आनंद ही आमची अत्यंत लाडकी मोहरी! बाकी आवडती प्यादीही बरीच आहेत.
मध्यंतरीची बरीच वर्षे आयुष्याच्या शह-काटशहांच्या खेळात गेल्यामुळे मूळ खेळाचा सराव राहिलेला नाही त्यामुळे आम्ही बुध्दिबळपटू नसून 'बुध्दिबळपिटू' झालो आहोत (म्हणजे सध्या आम्हास कोणीही मात देते:)!
४ - प्रा.डॉ. च्या डबल बॅरल बंदुकीचा उल्लेख वाचून मला कुठल्याशा सिनेमातला अशीच डबल बॅरल घेऊन फिरणारा उत्पल दत्त डोळ्यांसमोर आला ;) (घालतात आता गोळी मला:(()
३ - सरपंच, जनरल डायर, तात्या, आणि विसोबा खेचर हे सख्खे भाऊच पण एकमेकांतून विस्तवही जात नाही. ओळखण्याची खूण अनुक्रमे - गांधीटोपी, फेल्ट हॅट, कानांवरून बांधलेला पांढरा गमछा आणि मुंडासे :)
१ - पिवळ्या डांबिसाने काहीतरी करणी केली आहे खरी त्याखेरीज त्याला असा सहज प्रवेश मिळाला नसता. बघूया त्याला कसे पळवून लावता येईल ते, आम्ही चांगल्या मांत्रिकाच्या शोधात आहोत :)
(ह.घ्या.::))
चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

25 Feb 2008 - 8:52 pm | प्रभाकर पेठकर

पेठकरसाहेब यांना रेसेपी ठाउक नसलेले पदार्थ कोणते?
हेवेदावे...जलन्....तिरस्कार... इ.इ.इ.

सुधीर कांदळकर's picture

25 Feb 2008 - 9:20 pm | सुधीर कांदळकर

उत्तरे जर दिली नाहीत तर तुझ्या पायाची शंभर छकले होऊन तुझ्याच डोक्यावर पडती. असे दारूच्या नशेत लिहिले नाही हे आपले नशीब.
अभिणंदण आनि धण्यवाद.

समस्त मि. पा. करान्ना प्रणिपात्. आम्हाला अशी कम्पनी भेट्तच नाही कॉलेज सोड्ल्यापसून. जसे बाळपणा नन्न्तर कधीही बॅट हतात न धरलेले लोक जीव तोडून मॅच पहातात तसे सध्या मी करत आहे.
 

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 2:58 pm | धमाल मुलगा

आम्हाला अशी कम्पनी भेट्तच नाही कॉलेज सोड्ल्यापसून.म्हणून म्हणतो अनिलाताई, बघता काय...सामिल व्हा !कधीही बॅट हतात न धरलेले लोक जीव तोडून मॅच पहातात तसे सध्या मी करत आहे.काठावर बसुन का कधी पोहण्याची मजा कळते?पुन्हा कॉलेजात पोचाल, करा सुरू द॑गा  :))आपला- उतमात घालण्यात सर्वात पुढेटवाळ ध मा ल.

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2008 - 9:28 am | पिवळा डांबिस

इनोबा,
च्यामारी...डांबीसा
आमच्या प्रश्नांनी इनोबा इतके पेटले की त्यांना शब्दच सुचेनासे झाले!!!!! :)))))
आम्हांला नुसता पेटलेला वणवाच दिसत होता!! :)))))))
तात्याराव,
त्यापैकीच एकाच्या ओळखीतून आम्ही या अनुष्काला भेटलो आणि तिच्या आकंठ प्रेमात बुडालो. ती मात्र आमच्यावर मुळीच म्हणजे मुळीच प्रेम करत नाही याची आम्हाला खात्री आहे! :)
जाऊ द्या तात्या, तुम्ही प्रेम करतां ना, मग तेव्हढंच बास आहे!
"तुम मुझे भूल भी जाओ, तो ये हक है तुमको,
मेरी बात और है, मैने तो मोहोब्बत की है!!"
आम्ही मात्र तेवढ्यानेच पाघळलो होतो आणि 'मिसळपावला मालकीण मिळाली!', अशी स्वप्न रंगवत घरी परतलो होतो! :))))
अरे, मिसळपावला अशी मालकीण मिळाली तर आम्ही तुमच्या दरवाज्याला मोत्याची तोरणं लावू ना!! :))))
आम्ही तिचा पत्ता चुकुन विचारला तात्याराव, माफ करा!  तुमचा दिल जर इतका गुंतला असेल तर आम्हाला तिचा पत्ता माहिती असायची मुळीच गरज वाटत नाही!
साला, दोस्ती पहले होती है, लडकियां तो बादमे आती है!! :))))))
प्राजुकाकू,
माझी कसली तब्बेत खालावते? ती खालावली तर तुमच्या प्रतिसादांना उत्तरे कोण लिहिणार?- (सर्वव्यापी)प्राजु
आता तूच तुझं वर्णन "सर्वव्यापी" असं केल्यावर तुझ्या तब्ब्येतीची चौकशी करण्यात काय अर्थ आहे? :)))))
शेहनशहा-ए-धमालिस्थान, छोटा डॉन,
आयला, तुमच्याशी बोलायचं म्हणजे हिंदी आलं पाहिजे!  आपली तिथेच गोची होते बघा!! बघू मैफल जमवल्यानंतर तरी आम्हाला काही हिंदी सुचतं का ते!!:)))
राजमुद्राबाई,
कारण मी असं ऍकलयं की दारूची चव कडू असते. तरीही ती एवढी आवडण्याचे कारण कोणी देवू शकेल का?
दारूचा पहिला घोट किंवा सिगरेटचा पहिला झुरका (ऐकिवात) फारसा आनंददायक नसतो. पण दुसरा घोट किंवा झुरका ट्राय केला पाहिजे अशी ओढ ह्या गोष्टी लावून जातात (पु. ल.) .  माझं ऐकाल तर त्या धमाल्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः ट्राय करून पहा!  काही व्यसन लागणार नाही. "एकच प्याला" वगैरे काही खरं नाही हो!  जर कायद्याने सज्ञान असाल तर एकदा हे करून बघाच!!! आता ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचं सोडून द्या, स्वतः अनुभव घेऊन बघा :)))
लाजमुद्लाताईचा धमालदादा,
दालू म्हनजे काय ले भाऊ?:)))
पेठकरसाहेब,
हेवेदावे...जलन्....तिरस्कार... इ.इ.इ.
हे विकार आहेत हो पंत, पदार्थ कुठले?  उद्या तुमच्या हाटेलात आलो तर एक प्लेट हेवादावा खायला घालू शकाल का?:))
सुधीरभाऊ,
या प्रश्नांची उत्तरे जर दिली नाहीत तर तुझ्या पायाची शंभर छकले होऊन तुझ्याच डोक्यावर पडती. असे दारूच्या नशेत लिहिले नाही हे आपले नशीब.
काय हो सुधीरभाऊ! आजची फेणी पाणी न घालता एकदम थेट बाटलीतूनच की काय?  अहो पायाची शंभर छकले झाली तरी ती डोक्यावर कशी पडतील?  डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्या पायावर लोळू लागतील असे म्हणा...:))
बाकी आयडिया मात्र झकासच दिलीत राव!  आता साला दर महिन्याला सदरच सुरू करतो, "विक्रम-वेताळ"!:))))
अनिलाबाई,
आम्हाला अशी कम्पनी भेट्तच नाही कॉलेज सोड्ल्यापसून.
मग बघता काय काठावर बसून?  मारा, सूर मारा!! :)
चतुरंगसाहेब,
सर्वांत चतुर प्रतिक्रिया देण्याचा मान चतुरंगसाहेबांकडे जातो!!
उगाच नाही बुध्दिबळपटू झाले!! :))
आमच्यासारख्या असुरावाद्यांसाठी "मि.पा. = मिसळपाव" असे असले तरी सगळ्या सुरावाद्यांसाठी "मि.पा. = मिळालीच पाहिजे", असे आहे!
हे मात्र जबरा!  आम्हालाच काय पण तात्यालाही हे सुचले नाही आजवर!!!!:))))
मध्यंतरीची बरीच वर्षे आयुष्याच्या शह-काटशहांच्या खेळात गेल्यामुळे मूळ खेळाचा सराव राहिलेला नाही त्यामुळे आम्ही बुध्दिबळपटू नसून 'बुध्दिबळपिटू' झालो आहोत
क्या बात है!!
"इस जिंदगीने निकम्मा कर दिया चतुरंग,
वरना हमभी खिलाडी थे हिजाब के"
आणि "उत्पल दत्त"?  आयला आता आम्ही आणि चतुरंगसाहेब दोघेही गोळ्या खाणार डॉक्टरसायबांच्या!!:))))))
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल अनेक आभार!!
-हरामखोर पिवळा डांबिस

राजमुद्रा's picture

28 Feb 2008 - 10:02 am | राजमुद्रा

माझं ऐकाल तर त्या धमाल्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः ट्राय करून पहा!  काही व्यसन लागणार नाही. "एकच प्याला" वगैरे काही खरं नाही हो!  जर कायद्याने सज्ञान असाल तर एकदा हे करून बघाच!!! आता ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचं सोडून द्या, स्वतः अनुभव घेऊन बघा :)))
मलाही वाटतयं निदान दारूच्या विषयाला प्रतिसाद द्यायला का होईना एकदा चव घ्यावीच, मि. पा. वर एकमेव 'दारू' असा विषय आहे ज्याला ढिगाने प्रतिसाद मिळतात आणि आम्हाला फक्त वाचायचे काम करायला लागते.
राजमुद्रा :)

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2008 - 10:32 am | पिवळा डांबिस

पाहिजे तर आमच्या मीनाकुमारीला (चुकलो, कारभारणीला) तुम्हाला फोन करुन मार्गदर्शन करायला सांगतो! :))

धमाल मुलगा's picture

28 Feb 2008 - 10:54 am | धमाल मुलगा

पाहिजे तर आमच्या मीनाकुमारीला (चुकलो, कारभारणीला) तुम्हाला फोन करुन मार्गदर्शन करायला सांगतो! :))ह.ह.पु.वा. च्यामारी डा॑बिसकाका तुम्ही म्हणजे एक अव्वल नग आहात नग!

राजमुद्रा's picture

28 Feb 2008 - 11:00 am | राजमुद्रा

धमालदादाशी सहमत!
राजमुद्रा :)

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 2:58 am | स्वाती राजेश

माझ्या आईने केलेली तुरीच्या डाळीची आमटी ....अगदी नुसती पिण्यासारखी होते. असे मी एकटीच नाही तर जो कोणी याची चव घेतो त्याचे हेच म्हणणे आहे.
मी कितीही प्रयत्न केला तरी तिच्या हातची चव कधीच आली नाही. तिने वापरलेले तेच पदार्थ वापरून सुद्धा....

येवून जाउ द्यात त्याची रेशीपी

आशु जोग's picture

6 Oct 2011 - 12:08 am | आशु जोग

>> प्रा.डॉ. च्या डबल बॅरल बंदुकीचा उल्लेख वाचून मला कुठल्याशा सिनेमातला अशीच डबल बॅरल
घेऊन <<

अहो तुम्ही पण लावा की तुमच्या पदव्या, हरकत काय आहे