कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन
त्यावर काचेचे आवरण बसवेन
आत भट्टी झाल्यावर येसी बसविन
भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले
तरी पण मी बदलणार नाही
मोठ्या शहरात राहून प्रगती करेन
स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन
ब्रॅडेड वस्तू वापरुन
नद्या-नाले घाण करेन
तरी पण मी बदलणार नाही
सहापदरी रस्ते बांधेन
ते लहान गावात आणून सोडेन
गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन
ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले
तरी पण मी बदलणार नाही
माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन
कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन
माझेच विचार पुढे रेटून
काहीच साध्य झाले नाही
तरी पण मी बदलणार नाही
मला घाई आहे मी पुढे जाणार
दणदणीत हॉर्न वाजवून तुमच्या गाड्या ओलांडणार
कितीही दामटली तरी ५ मिनिटांचीही बचत होत नाही
माहिती आहे पुढच्याच सिग्नलला तुमची भेट होणार
तरी पण मी बदलणार नाही
माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही
त्यामुळे मला कळूनही
मी बदलणार नाही
मी बदलणार नाही
मी बदलणार नाही
(आयुष्यात पहिल्यांदाच काव्य प्रसवले आहे. सांभाळून घ्या)
अशा काव्याचा रस कोणता?
प्रतिक्रिया
6 Sep 2009 - 3:59 pm | मराठमोळा
>>आयुष्यात पहिल्यांदाच काव्य प्रसवले आहे. सांभाळून घ्या
टेंशन घेऊ नका.. मिपाकर संभाळून घेतील..
>>अशा काव्याचा रस कोणता?
काव्यप्रसव रस.. ;)
असो,
पुलेशु..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 Sep 2009 - 4:02 pm | पर्नल नेने मराठे
ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले
तरी पण मी बदलणार नाही :D
चुचु
6 Sep 2009 - 4:54 pm | विनायक प्रभू
क्या बात है
6 Sep 2009 - 5:37 pm | अवलिया
अरे वा ! विज्ञानामुळे मी बदलणार नाही असा ठामपणा आलाच तर तुमच्यात !! गुड !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Sep 2009 - 6:36 pm | अमृतांजन
मॅन, तुमचा मलिंगा यॉर्कर कळलाच नाही!- "अरे वा ! विज्ञानामुळे मी बदलणार नाही असा ठामपणा आलाच तर तुमच्यात"
6 Sep 2009 - 7:05 pm | अवलिया
:)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Sep 2009 - 7:01 pm | अमृतांजन
हे भारतात केव्हा पहायला मिळेल?-
शेतकर्यांना हवामानाचा रोजचा अंदाज
http://www.agriculture.com/
http://www.farmersalmanac.com/weather/USA-Northeastern-weather
http://www.agriculture.com/ag/story.jhtml?storyid=/templatedata/ag/story...
तंत्रज्ञान शिक्षणसंस्थेतून असे शिक्षण मिळेल का?-
http://www.cleanriverproject.com/
6 Sep 2009 - 7:04 pm | अवलिया
http://www.imd.gov.in/
http://www.imdagrimet.org/
बाकी शिक्षण वगैरेचे काही सांगता येणार नाही
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Sep 2009 - 7:15 pm | अमृतांजन
दुवे पाहिले. आवडले; शासनाचे प्रयत्न चांगले आहेत.
तरीही युयुत्सु ह्यांच्या लेखातील " "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही"." ह्या वाक्याने अस्वस्थ आहे.
6 Sep 2009 - 10:32 pm | अवलिया
विज्ञानाचा अवलंब करुन स्वस्थता मिळावी, नाही मिळाल्यास देवाचे नाव घ्या ! कशाने फरक पडतो ते कळवा.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Sep 2009 - 9:06 am | दशानन
छान कविता... आवडली.. !
आशय खुप मोठा आहे.. !
7 Sep 2009 - 2:17 pm | sneharani
कितीही दामटली तरी ५ मिनिटांचीही बचत होत नाही
माहिती आहे पुढच्याच सिग्नलला तुमची भेट होणार
तरी पण मी बदलणार नाही
Mastach.!
7 Sep 2009 - 2:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी
चांगली लिहीली आहे कविता.