अलीकडचे "चिडके बिब्बे" ऑस्ट्रेलियन खेळाडू

पारंबीचा भापू's picture
पारंबीचा भापू in जनातलं, मनातलं
3 Sep 2009 - 1:50 pm

हे माझे पहिले-वहिले लेखन आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे!
================================================
क्रिकेटची गोडी मला लागली १९६० पासून. त्यावेळी इंग्लंडचे कप्तान होते लेन हटन व नंतर पीटर मे, ऑस्ट्रेलियाचे होते हॅसेट् व रिची बेनो, पाकिस्तानचा करदार, वेस्ट इंडीजचे वॉरेल वगैरे. भारताचे कप्तान सारखे बदलायचे, कधी पॉली उम्रीगर, कधी बुधी रामचंद कधी अमरनाथ वगैरे. आपण क्वचितच जिंकत असू, त्यामुळे भारताच्या विजयाची अशी मनात जिद्द वाटायची नाहीं, पण ऍशेस् सीरीजकडे मात्र खूप लक्ष असायचं. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं म्हणून असेल, पण ऍशेस् सीरीजबाबत ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकावी असे मनोमनी वाटायचे. डॉन ब्रॅडमनचे फक्त नाव ऐकलेले. रिची बेनोपासून क्रिकेटचा भक्त! नंतर बॉबी सिंप्सन, बिल लॉरी, आयन व ग्रेग चॅपेल, किम ह्यूज, ऍलन बोर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ व आता रिकी पॉंटिंग असे ऑस्ट्रेलियाचे अनेक कप्तान आले व गेले, पण ऑस्ट्रेलियाबद्दलची ही आपुलकी अलीकडेपर्यंत कधी कमी झाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचे कप्तान व खेळाडू नेहमीच विजिगीषुवृत्तीने खेळायचे पण खिलाडू वृत्तीत कमी नाही.
पाकिस्तानात खेळताना ब्रॅडमनचे रेकॉर्ड मोडायची संधी असताना सामना जिंकायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून ३३४ धावावर नाबाद असलेल्या टेलरने डाव आदल्या दिवशीच्याच धावसंख्येवर घोषित केला होता ही घटना ऑस्ट्रेलियन कप्तानांच्या मनाची सकारात्मक घडण दाखविणारी उत्तम घटना म्हणता येईल.
स्टीव वॉ आल्यापासून मात्र हे चित्र बदलले. हळू-हळू ऑस्ट्रेलियन कप्तान व खेळाडू नुसते विजिगीषु वृत्तीनेच न खेळता चिडके बिब्बे झाले व "विजयासाठी कांहींही" या वृत्तीने खेळू लागले व तेंव्हापासून त्यांचा संघ माझ्या मनातून उतरू लागला. रिकी पॉंटिंगचं वागणं तर ज्याला "वाह्यात" म्हणता येईल असं होऊ लागलं. जसा कप्तान तसा संघ या न्यायाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची खिलाडूवृत्ती टप्प्या-टप्प्याने दिसेनाशी झाली! स्टीव वॉच्या काळापासून आपला संघ कधी-कधी जिंकूही लागला होता व त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच असभ्य वर्तन जास्तच जाणवू लागलं. त्यात स्लेजिंग या सोज्वळ नावाखाली केलेले असभ्य वर्तन तर आणखीच जाणवू लागले.
या असभ्य वर्तनाची परमावधी झाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुंबईतल्या ब्रेबर्न स्टेडियमवरील बक्षिस समारंभात! त्यावेळी पॉंटिंग, ब्रेट ली, ऍन्ड्र्यू सायमंड्स् व इतर खेळाडूंनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ भारतीय नेत्याचा माकडचेष्टा करून अपमान केला ते पाहून तर मन विटून गेलं. त्यात हरभजन सिंगवर केलेले खोटे आरोप (ज्यातून तो दोषमुक्त होऊन बाहेर पडला), पंचांना घाबरवून वेडेवाकडे निर्णय द्यायला भाग पाडून जिंकलेली टेस्ट् अशा अनेक घटना मनात गर्दी करतात.
परिणाम एवढाच कीं नुकतीच संपलेली ऍशेस् सीरीज इंग्लंडने जिंकली याचा अतीशय आनंद झाला.

क्रीडाअनुभव

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

3 Sep 2009 - 3:44 pm | पर्नल नेने मराठे

माकडचेष्टा 8|
चुचु

पारंबीचा भापू's picture

3 Sep 2009 - 3:49 pm | पारंबीचा भापू

आपण "माकडचेष्टा" असे लिहून कसली तरी स्माइली टाकली आहे. म्हणजे आपण सहमत आहात की असहमत ते कळले नाही!
भापू

एकलव्य's picture

3 Sep 2009 - 4:15 pm | एकलव्य

परिणाम एवढाच कीं नुकतीच संपलेली ऍशेस् सीरीज इंग्लंडने जिंकली याचा अतीशय आनंद झाला.

अगदी अगदी!!

पॉन्टिंग आउट होणे -- तेही अगदी स्वस्तात आणि मूर्खासारखा -- म्हणजे तर माझ्या आनंदाची परमावधी असते.

चीअर्स

सुधीर काळे's picture

3 Sep 2009 - 4:15 pm | सुधीर काळे

आजच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल माझेही मत असेच आहे. धन्यवाद.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

उगीच काहीतरी पवारान्बध्धल लिहू नका..
आज पर्यन्त शरद पवारान्चा अपमान कोणीही करू शकलेला नाही,
धक्के मारण, टोमणे मारण, वाइट बोलण, विलीन व्हायचा सल्ला देण, दिल्लीत भेटीकरता २-३ दिवस ताटकळत ठेवण, पूलाला राजीव गान्धीच नाव देण्याची चमचेगिरी करण्याची पाळी आणण , म्हणजे अपमान नव्हे..

सुधीर काळे's picture

3 Sep 2009 - 8:24 pm | सुधीर काळे

एकाद्या व्यक्तीपुरते मी बोलत नाहीं. शरदभाऊ भारत सरकारचे मंत्री होते (आजही आहेत) व त्यांची इज्जत जाणे म्हणचे देशाची इज्जत जाण्यासारखे आहे असे मला तरी वाटते. (कांहीं लोकांना तसे नाहीं वाटत!) म्हणून मला त्या रिक्याचा राग आला. इतका कीं मी इथल्या ऑस्ट्रेलियाच्या राजदूताकडे तक्रारही नोंदविली. (अगदी जसवंतसिंग स्टाईल).
त्याच्या दुसर्‍या दिवशी रिक्याने शरदभाऊंना फोन करून रदबदली केली व त्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जकार्तातील राजदूताने पत्र पाठवून या रदबदलीचा उल्लेख करून हे प्रकरण मिटल्याचे जाहीर केले.
जसवंतसिंगांनी अजून उत्तर दिले नाहीं. तीन दिवसांचा वायदा होता, आता ६ दिवस झाले!
ते बोलणार तरी काय म्हणा?
मी त्यांना अनाहूत सल्ला दिला आहे की असा (गैर मार्गाने) मिळालेल पैसा पंतप्रधान रिलीफ फंडाला द्यायची त्यांनी घोषणा करावी कीं हीरो होऊन जातील. तसेही त्यांनी अद्याप केलेले नाहीं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

तेन्नालीराम's picture

3 Sep 2009 - 9:28 pm | तेन्नालीराम

सुधीरभाऊंनी लिहिलेले बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शरदभाऊंचाच अपमान केला असे नाही तर सरकारच्या एका मंत्र्याचा! इंग्लंडमध्ये हा बक्षीस-समारंभ झाला असता तर असे करायची छाती होती का पोंटिंगची आणि त्याच्या पिलावळीची?
अगदी चूक आहे असे करणे. म्हणून तर लोक नाराज होऊन आता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध झाले आहेत.
ते. रा.