मेघांचा डफ, तडीतेची थाप
गगनाच्या अधरी, मल्हारराग
लय.. जलतरंग, भुई छेडीता
तालास येई, लयबद्ध जाग
पवनाने धरिला सुर अन
नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा
शुभसुंदर .. अरूपाचे रूप
गौरीतनय .. तो गण नृप
लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप
आल्हादघन, सांबनंदन
नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
पदी पैंजणे .. झंकारती
रसभाव मुखी .. साकारती
तुंदील तन .. मोही मती
अंगांग मीन, मुद्रेत लीन
नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
आकाशगंगा .. तेजाळली
नक्षत्रे नभी .. उल्हासली
चैतन्यगंधी .. हर्षावली
विश्वाचा मंच, अपुरे अनंत
नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 11:30 am | प्रमोद देव
नादमय रचना!
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
1 Sep 2009 - 9:41 am | विशाल कुलकर्णी
देवबाप्पा, होवुनच जावुद्या आता ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
1 Sep 2009 - 7:24 pm | क्रान्ति
अप्रतिम रचना!
गणराज रंगी नाचतो
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी