त्रंबकेश्चर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in कलादालन
29 Aug 2009 - 6:27 am

या श्रावणातील चौथ्या सोमवारी त्रंबकेश्चर ला गेलो होतो. गावात मंदिराजवळ पाऊस होता व मंदिरात कॅमेरा नेता येत नव्हता. बाहेर गर्दीचे काय फोटो काढणार? ती तर सगळीकडेच आहे.
दुपारी आम्ही गंगाद्वार या डोंगरावरील ठिकाणी गेलो होतो. तेथेही सतत पाऊस चालू होता म्हणून काही फोटो काढता आले नाही. जे काही तिन चार फोटो काढले ते खाली देत आहे.


गंगाद्वार च्या पायर्‍या चढतांना दिसणारा ब्रम्हगीरी चा पर्वत. याच पर्वतावर गोदावरी नदी उगम पावली आहे. श्रावणातील तिसर्‍या सोमवारी या पर्वताला सुमारे ३० ते ६० किमी ची फेरी मारतात. या वेळी ही मी ती मारली होती. त्या बद्दल कधीतरी लिहीनच.


डोंगरावरील जंगलसंपदा


क्रिकेट वेडा देश. क्रिकेटला वेळ, काळ, स्थळ काही लागत नाही. (किती मॅन अवर वेस्ट जातात कुणास ठाव?)


पाझर तलाव दिसतोय


त्रंबकेश्वर शहर

छायाचित्रण

प्रतिक्रिया

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Aug 2009 - 1:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी

नाशिकला असताना पावसाळ्यात बरेचदा जाणे व्हायचे.आता मात्र तुमच्या फोटोंमुळे परत आठवणी जाग्या झाल्या.

सूर्य's picture

29 Aug 2009 - 1:34 pm | सूर्य

म्हणतो. नाशिकला असताना बरेच वेळा जायचो. गेले बर्‍याच वर्षात जाणे जमले नव्हते. फोटो बघुन मस्त वाटले.

- सूर्य.

सूर्य's picture

29 Aug 2009 - 1:38 pm | सूर्य

- सूर्य.

झकासराव's picture

29 Aug 2009 - 1:50 pm | झकासराव

काय मस्त हिरवळ आहे.
छान आहेत फोटु.

क्रान्ति's picture

29 Aug 2009 - 4:54 pm | क्रान्ति

मस्त आहेत फोटो.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:05 am | विसोबा खेचर

भरलेल्या कुशावर्ताचा फोटू का नाही काढला?

बाकी फोटू छान...

तात्या.

दशानन's picture

31 Aug 2009 - 9:12 am | दशानन

मस्त आहेत फोटो.

आवडले रे.. पाश्या !

पाषाणभेद's picture

31 Aug 2009 - 9:39 am | पाषाणभेद

फक्त बलबिर पाशा नका म्हणू बरा का!

"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

हर्षद आनंदी's picture

31 Aug 2009 - 9:28 am | हर्षद आनंदी

५ वर्षांपुर्वी सह-कुटुंब शिर्डी-शनी शिंगणापुर-वणी-नाशिक-त्र्यंबकेश्वर अशी मस्त यात्रा केली होती.

आता परत जायची ईच्छा आहे, बघु त्र्यंबकेश्वर कधी बोलवतोय!!

फोटु मस्त !

पावसात फोटु काढायचे असतील तर,
कॅमेराच्या मापाची पिशवी घ्या, प्लॅस्टीकची, पण वाण्याकडची नको, एकदम पारदर्शक पाहीजे. कॅमेरा चालु करा आणि पिशवीत भरा. पुढे आलेल्या लेन्स च्या बाजुने गुंडाळुन घ्या, आणि मागे ओढा... सर्वे बटने कव्हर करा, लेन्स्च्या पुरता छोटाचा चौकोन कापा आणि मस्त फोटु काढा.

पाषाणभेद's picture

31 Aug 2009 - 9:41 am | पाषाणभेद

पण सर्वे बटने म्हणजे मी आधी काहीतरी वेगळेच बटने समजलो होतो.
नंतर सर्वे बटने म्हणजे सर्व बटने असे समजले.

"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

अभिजा's picture

2 Sep 2009 - 2:20 pm | अभिजा

छान आहेत फोटो.
मंदिरात कॅमेरा नेता येत नाही हे मंदिरात प्रवेश करतानाच समजते. मग तेव्हा कॅमेरा बाहेर कुठेतरी ठेवून यावा लागतो. मोठी पंचाईत होते. स्वानुभव!! :-)

sneharani's picture

2 Sep 2009 - 2:30 pm | sneharani

मस्त आहेत फोटो.

भडकमकर मास्तर's picture

2 Sep 2009 - 3:11 pm | भडकमकर मास्तर

मस्त फोटो,
तो डोंगराखाली क्रिकेट खेळणार्‍या पोरांचा फोटो फार आवडला...

फक्त त्याखालची ओळ अगदी वैतागसम्राटाची ( मॅन अवर वेस्ट ... हाहाहाहा)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी