गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी विसर्जीत होणार्या एका गणेशमूर्ती कडे पाहून सुचलेली ही कविता....
रेंगाळलेल्या मिरवणुकीत
एका कोपर्यात अगदी मागे |
ओरडणारे लाऊडस्पीकर्स
आणि फक्त बाप्पा जागे ||
चक्क त्यांच्याकडे येणारा म्हणून
मी लांबूनच दिसलो होतो |
जवळ जाताच म्हणाले ,
"क्षणभर टेकून बसलो होतो ||
बोलणार असशील तर मोठ्याने ,
इथे काहीच ऐकू येत नाही |
एवढे मोठे असून कान
मला खरंच सहन होत नही ||
आता मात्र थकलोयं मी
यंदा दिवस मोजतो आहे |
अथांग गर्दीत जोडलेले हात
गेले ३० तास शोधतो आहे ||
पण इतकी प्रगती केली तुम्ही
साक्षात् देवालाही मागे टाकलं |
वर्षात मोजून दहा दिवस
छान वेळापत्रक आखलं ||
वर्षभराचे सारे हिशेब
प्रत्येक जण एकदाच देतो आहे |
नवंस वगैरे पुढल्या खेपेला
बाप्पा दरवर्षी येतो आहे ||
अरे,न थकता देतोय मी
तरी तुमची ओंजळ भरत नाही ||
आशीर्वादांचा साठा माझा
दहा दिवस सुद्धा पुरत नाही ||
गृहीत धरताय मला फक्त
पण कधी माझी पर्वा केलीये का?
चतुर्थीला अथर्वशीर्ष , यापुढे
तुमची मजल गेलीये का??
काहीही मनात न ठेवता
एकदा माझ्याकडे येऊन बघा |
केवळ भरभरून देण्याचे
कधी चार क्षण जगा ||
मनात तुमच्या आहेच भाव
पण तो वर्तनात दिसू दे |
आणि प्रसाद म्हणून वाटीभर
श्रद्धा तेवढी असू दे" ||
एवढं बोलून बाप्पा थांबला
त्याने पाणावलेल्या कडा पुसल्या |
देव सुद्धा रडतो जिथे , तिथे
तुमच्या आमच्या भावना कसल्या??
क्षणभर हाच विचार केला
अन् माझे हात जोडले गेले |
जयघोष पुन्हा सुरू झाला ,
मिरवणुकीने कूच केले ||
मूर्ती अस्पष्ट दिसली कारण,
बाप्पाचे शब्द अश्रू बनून
माझ्या डोळ्यांभोवती जमले होते |
अन्
काही काळापूर्वीचे हळवे बाप्पा,
भक्तांची झोळी भरण्यात
पुन्हा एकदा रमले होते ||
प्रतिक्रिया
27 Aug 2009 - 3:16 pm | विमुक्त
खूपच छान!!!!!!!!!!!!
27 Aug 2009 - 3:32 pm | चिरोटा
कविता आवडली.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
27 Aug 2009 - 4:27 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता आवडली.
छान. बरेच कळले आहे तुम्हाला.
बिपिन कार्यकर्ते
27 Aug 2009 - 4:44 pm | sneharani
कविता आवडली.
काहीही मनात न ठेवता
एकदा माझ्याकडे येऊन बघा |
केवळ भरभरून देण्याचे
कधी चार क्षण जगा ||
Chhan.
27 Aug 2009 - 4:48 pm | मदनबाण
काहीही मनात न ठेवता
एकदा माझ्याकडे येऊन बघा |
केवळ भरभरून देण्याचे
कधी चार क्षण जगा ||
क्लासच... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
27 Aug 2009 - 4:52 pm | प्रभो
अरे,न थकता देतोय मी
तरी तुमची ओंजळ भरत नाही ||
आशीर्वादांचा साठा माझा
दहा दिवस सुद्धा पुरत नाही ||
खरंय हे यार!!!
27 Aug 2009 - 6:36 pm | मनीषा
मनात तुमच्या आहेच भाव
पण तो वर्तनात दिसू दे |
आणि प्रसाद म्हणून वाटीभर
श्रद्धा तेवढी असू दे" || ... छान!
27 Aug 2009 - 6:40 pm | चतुरंग
अंतर्मुख करणारी कविता आहे.
चतुरंग
27 Aug 2009 - 6:45 pm | अनामिक
असेच म्हणतो...
-अनामिक
28 Aug 2009 - 5:30 pm | राघव
अस्सेच म्हणतो. :)
पु.क.शु.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
27 Aug 2009 - 7:21 pm | मीनल
मला ही काहिसे असेच वाटले होते. मी मागच्या वर्षी प्रकाशित केलेली ही कविता.
का असे केलेस?
कोप-या वरच्या दुकानात
एकदा येणे केलेस,
सर्व मूर्तींमधे मलाच
अचूक तू हेरलेस.
खिशातल्या पाकिटातून
लगेच पैसे काढलेस,
``नंतर घेऊन जातो``
हलकेच मला सांगितलेस.
कागदी रंगीत मखरावर
छान दिवे सोडलेस,
लगबगीच्या तयारीला
उत्साहाने भरलेस.
चतुर्थीला मोटारीतून
मला घरी नेलेस.
जरीकिनारी आसानावर
स्थानापन्न केलेस.
पान,सुपारी,हार,तुरे
सर्व काही आणलेस.
भटाच्या सांगण्यानुसार
कसेबसे पुजलेस.
पेढे,मोदक,करंजी
खाऊ मला घातलेस.
नैवेद्याच्या लाचेमधे
नखशिकांत बुडवलेस.
टाळ्या,टाळ, झांजा वाजवून
कौतुक असे केलेस,
की भक्तिच्या देखाव्यात
सार खरे भासवलेस.
का अशी पापे करून
सर्व काही गमावलेस?
`मला माफ कर``
नाही कधी म्ह्टलेस.
दुस-या दिवशी दुपारीच
पुन्हा एकदा ओवाळलेस,
उत्तर पूजा उरकून घेऊन
हलकेच मला हलवलेस.
`पुढल्या वर्षी लवकर या`
म्हणून पाण्यात शिरवलेस,
स्वतःला धांदलीतून
लगेच मोकळे केलेस.
दिड दिवस का होईना,
तू मला आळवलेस,
जन्माचा राखणकर्ता म्हणून
मला कायमचे अडकवलेस.
मीनल.
27 Aug 2009 - 7:49 pm | हृषीकेश पतकी
कविता सुरेख आहे आपली..
आणि भावना पण सारखी आहे..
कविता आवडली..
आपला हृषी !!
27 Aug 2009 - 7:35 pm | प्राजु
बापरे!! आंतर्मुख करणारी आहे कविता. खूप आवडली.
मीनलची कविता... तेव्हाही आवडली होती.. पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Aug 2009 - 10:16 pm | क्रान्ति
अस्संच वाटत असेल बाप्पाला! कविता खूप आवडली. मीनलची कविताही आवडली.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी