लपवणे ते झाले सुरू, माझेच माझी यातना
राम न उरला काही, आरंभीच संपली कथा !
नसे अभंग नामयाचा, नच विरहिणी मीरेची
साकळली वेदना सारी, मी रचितो माझी गाथा !
विसरल्या सार्या श्रुती, अश्रुत भिजल्या आर्या
जखमा सार्या ओल्या, मी घोकतो जुन्याच संथा !
ना स्मरे मंत्र आता, ना आठवते मज हरिनाम
वेदनांचे हे वेद माझे, विसरल्या त्या जून प्रथा !
हे भोग मम प्राक्तनीचे, नकोत पळवाटा नव्या
संपते जिथे दु:ख जुने, जन्मा येते नवी व्यथा !
विशाल.
प्रतिक्रिया
20 Aug 2009 - 9:56 am | मदनबाण
विशालभाऊ संपुर्ण कविताच इतकी सुंदर आहे की ,कुठलं कडव विशेष आवडलं हे सांगणेच कठीण आहे !!!
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
20 Aug 2009 - 10:07 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मित्रा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 Aug 2009 - 10:57 am | ज्ञानेश...
वा.. सुंदर कविता.
शेवटची दोन कडवी जास्त आवडली.
ना स्मरे मंत्र आता, ना आठवते मज हरिनाम
वेदनांचे हे वेद माझे, विसरल्या त्या जून प्रथा !
"Great Power Comes With Great Responsibilities"
20 Aug 2009 - 11:13 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद ज्ञानेशभाऊ,
अपेक्षित सुधारणा केलीय.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 Aug 2009 - 3:37 pm | हृषीकेश पतकी
खूप खूप छान!!
20 Aug 2009 - 3:40 pm | लिखाळ
सुंदर कविता .. आवडली.
-- लिखाळ.
21 Aug 2009 - 9:25 am | विशाल कुलकर्णी
आभार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"