एक मैत्रिण

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
22 Feb 2008 - 9:03 pm

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

आपली एक मैत्रिण.

मिनु जोशी.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

अनिला's picture

23 Feb 2008 - 7:53 pm | अनिला

खरेच मैत्रीण असणे आवशयक आहे. लग्न झालेल्या बायकान्ना तर असलीच पाहिजे

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

माझ्या मनीची भावना स्प्ष्त झाली

सुधीर कांदळकर's picture

23 Feb 2008 - 10:10 pm | सुधीर कांदळकर

सोपी बाळबोध स्पष्ट अर्थ असलेली कविता.

जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

या ओळी आवडल्या. कीप इट अप. आणखी येऊ द्यात. शुभेच्छा.

इनोबा म्हणे's picture

24 Feb 2008 - 1:13 am | इनोबा म्हणे

यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते.
ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा,मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही.

बाकी कविता झक्कासच...!

(कविताप्रेमी) -इनोबा

सरपंच's picture

24 Feb 2008 - 9:32 am | सरपंच

यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते.

हम्म!

ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा,

कवितेखाली मिनु जोशी अशी सही आहे. तरी कृपया आपणच मिनु जोशी आहात आणि ही कविता आपलीच आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट खुलासा अपेक्षित आहे..

मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही.

सहमत आहे. या बाबत काय तो स्पष्ट खुलासा न आल्यास येत्या २४ ते ३६ तासात ही कविता मिसळपाववर अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी..

चूभूद्याघ्या...

सरपंच.