पावसाळी भटकंती

प्रभो's picture
प्रभो in कलादालन
19 Aug 2009 - 2:42 am

नमस्कार मंडळी,

मिपा वरचा माझा पहिलाच लेख.
असं काहि मि फार काहि लिहित नाही...(खरं सांगयच तर २-४ चारोळया सोडुन कधी काहीच लिहिलं नाही)

आसो....महान लोकानी सांगितलय कि स्वताची जास्त लाल करू नये...

साधारण २ महिन्यांपुर्वी मी मिपावर साभासद होण्यासाठी निवेदन दिले होते....आमचे परममित्र टारझन हयांच्या मदतीने मिपा वर येउन (अरे बस कर आता).... हा माझा पहिलाच दिवस....

चला माहीती भरपूर झाली ....

मी व माझे काही मित्र पवसाळी भटकंती करायला कर्जत जवळच्या 'भिवपूरी रोड' येथील एका टेकडीवर भटकायला गेलो होतो....

सकाळी ७ च्या लोकल ने ठाण्याहून सर्वजण निघालो....कल्याण ला लोकल बदलून सधारण ९-९.३० च्या सुमारास आम्ही भिवपुरी ला पोचलो..
एका मस्तश्या खानवळीत पोहे - वडापाव नाश्ता करुन सफरीस निघालो.

रस्त्यात एका दुकनदाराने महिती दिली की जवळच एक टेकडी आहे तिथुन माथेरान च डोंगर आणी इतर सिनरी दिस्ते.

ह्या टेकडीची एक खसियत वाटली ती म्हणजे, पुर्ण टेकडी वर कचरा-प्लास्टीक चा एक ही कण नव्हता...

त्याची काही प्रकाशचित्रे ....

टेकाड उतरून जवळच्याच एका धबधब्यावर जाउन आंघोळ केली...

परतताना पाहिलेला एक सुन्दर कलेचा नमुना...एका चिमुरडी ने बनवलेला गणपति बाप्पा..

आता सध्या मी गणपति बप्पाची आतुरतेने वाट पहात आहे.. (आई च्या हातचे मोदक्......आई ग्ग..... आताच तोंडाला पानी सुटतयं..)
त्या आधी शुक्रवार आणी शनिवार मज्जा करावी म्हणतोय... श्रावण संपतोय लेकानो....

तोपर्यन्त .....गणपति बप्पा की जय!!!!!!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

19 Aug 2009 - 3:47 am | पाषाणभेद

छान फोटो आहेत. लेखन करायला घाबरू नका. आम्ही सगळे आहोत ना? (कंपू करून!)

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

रेवती's picture

19 Aug 2009 - 3:50 am | रेवती

मस्त फोटो !
हिरवळ मनाला सुखावणारी आहे.

रेवती

दशानन's picture

19 Aug 2009 - 8:46 am | दशानन

असेच म्हणतो.... फोटो छान आले आहेत....

पण तो पाचव्या फोटोत टार्या काय करत आहे बो :?

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

टारझन's picture

19 Aug 2009 - 8:57 am | टारझन

असेच म्हणतो ..... प्रतिकराव ... फोटू "के व ळ अ प्र ति म !!!" हो :)

आणि काय बे राजे चोच्या ... वषिंडावर बसुन तु काय करतोय ? त्याच फोटूत ?

- टर्बो

ऋषिकेश's picture

19 Aug 2009 - 9:16 am | ऋषिकेश

छान!.. सकाळी सकाळी हिरवेगार फोटो पाहून बरे वाटले

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...."

धन्यवाद....

- (नव्याचे नऊ दिवस) - प्रभो

नंदन's picture

19 Aug 2009 - 2:19 pm | नंदन

मस्त आलेत फोटोज. लिहित रहा भौ.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सूहास's picture

19 Aug 2009 - 2:41 pm | सूहास (not verified)

अशी ही जळवाजळवी...

सू हा स...

लवंगी's picture

20 Aug 2009 - 5:00 pm | लवंगी

गणपती बाप्पा ज्ज्याम आवडला.

अवलिया's picture

20 Aug 2009 - 11:43 pm | अवलिया

मस्त आलेत फोटो. लिहित रहा भौ.
गणपती बाप्पा ज्ज्याम आवडला.

:)

--अवलिया

विशाल कुलकर्णी's picture

21 Aug 2009 - 2:39 pm | विशाल कुलकर्णी

फोटो छान, फोटोविषयक आणि सविस्तर माहिती देता आली असती तर अजुन बहार आली असती ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रभो's picture

21 Aug 2009 - 3:00 pm | प्रभो

या वीकांतला रायगडी बेत आहे...आल्यावर सविस्तर लिहिन...

क्रान्ति's picture

22 Aug 2009 - 8:17 am | क्रान्ति

सगळेच फोटो मस्त! बाप्पा खूपच आवडले.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

परिकथेतील राजकुमार's picture

22 Aug 2009 - 3:56 pm | परिकथेतील राजकुमार

यायययययययssssssssssssssss

सगळे फोटु छान आले आहेत, विशेषतः माझा फोटु अतिशय देखणा आला आहे !!

(काही दुष्ट मिपाकरांनी माझा फोटु बघुनही दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे.)

©º°¨¨°º© पराचा कावळा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

सोनम's picture

18 Sep 2009 - 11:56 am | सोनम

फोटू एकदम झकास आले आहे... =D> =D>
माझा फोटु अतिशय देखणा आला आहे !!
(काही दुष्ट मिपाकरांनी माझा फोटु बघुनही दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे.)

परा शेठ तुला कोण विसरणार रे. :? :?
तुझा फोटू ही छान आलाय .... :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

साहिल१२३'s picture

8 Apr 2013 - 2:45 pm | साहिल१२३

सगळेच फोटो मस्त! बाप्पा खूपच आवडले