आई, तुला काही कळत नाही

स्वाती२'s picture
स्वाती२ in जनातलं, मनातलं
17 Aug 2009 - 7:37 pm

दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला.

"तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble"

"तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं.

"सगळं घेतलय मी."

"मग?"

"जे. टी. ला परवा birthday च text करायच राहीलं. देवा! " लेकाने धावा सुरु केला.

चिरंजिवांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि स्वारी कॅलेंडर वर खुण करुनही birthday wish करायला विसरली होती.

"त्यात काय आता कर की belated" माझे दोन पैसे.

"येस! अब आयेगा मझा." मी आनंदाने गाणं गुणगुणायला सुरुवात केली.

"आता निदान गाऊ तरी नकोस. मला जरा विचार करु दे" लेकाने विनवले.

पाच एक मिनिटांनी सेलफोन काढून त्याने अंगठे नाचवायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी परत बीप.

"We are cool" लेकाने सुटकेचा निश्वास टाकला.

मी उडालेच. चक्क भांडण तंटा नाही म्हणजे काहीतरी घोळ होता.

"J.T. is such a good friend," मी पुटका टाकला.

"डोंबलाची good," लेक खवळलाच.

"मी text काय केलं माहितेय? मी सांगितल की सेल ची बॅटरी मेली म्हणून text नाय करता आला. बॅटरी टाकल्याबरोबर लगेच करतोय."

"अरे तुझी मैत्रिण ना ती. मग असं खोट..."

माझं बोलणं तोडत लेक सुरू झाला. "मग काय सांगायच? कामाच्या गडबडीत दिवसभरात वेळ नाही झाला आणि संध्याकाळपर्यंत इतका दमलो होतो की विसरून गेलो? पुढल्या birthday पर्यंत ऐकवल असतं मला. सालं काढली असती माझी."

"काहिही काय. थोडिशी रुसली असती. पण तू नीट सांगितल असतस तर पटलं असतं," माझा उपदेश.

"Mom, you don't know anything about girls"

माझा कानावर विश्वास बसत नव्हता. आता मी देवाचा धावा सुरू केला.

"हॅलो. मी पण मुलगीच आहे."

"No. You are a Mom" लेकाने ऐकवलं.

"तुला माहीत नाय Mom. सी. आर. चिडतो का खेळायला वेळ नाही म्हटलं तर? but these girls. लगेच चिडचिड. मग सांगाव लागतं खोटं "आईने ग्राउंड केलेय "म्हणून. मला काय हौस आलेय खोटं बोलायची? आम्ही मित्र ठेवतो एकमेकांचे birthday लक्षात? पार्टी दिली, नाही दिली ठेवतो हिशोब? पण these girls. आधी birthday लक्षात ठेवणार. मग locker सजवणार. मग आमच्या कडून अपेक्षा. विसरलं की वर्षभर ऐकवणार. ती सी.एस. , मधेच आठ-दहा दिवस बोलणच बंद करते. मी विचारलं "what I did wrong" तर म्हणे "Nothing". पण आदळआपट चालू. मग एक दिवस परत काही झालच नाही अस बोलायला सुरुवात. मी तर आता विचारणच सोडून दिलय. You don't know anything mom." लेकाने समारोप केला.

कसतरी हसू आवरत मी लेकाला कामाच्या ठिकाणी सोडलं. रात्री जेवताना नवर्‍याला किस्सा सांगितला. जेवण संपवून उठत नवर्‍याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".

जीवनमान

प्रतिक्रिया

दशानन's picture

17 Aug 2009 - 7:42 pm | दशानन

=))

जबरदस्तच आहे.... !

Welcome to the club :D

कधी कधी वाटतं ह्या लहान मुलांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळतं की काय =))

* माझंच बालपण दिसत आहे मला... असा भास झाला =))
लहानपणी वाढदिवसाचा खुप क्रेझ होता... त्याची आठवण झाली !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

ऋषिकेश's picture

17 Aug 2009 - 7:48 pm | ऋषिकेश

लई भारी!!
=)) =))

जेवण संपवून उठत नवर्‍याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".

+१ ;)

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ४७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "हम भी अगर बच्चे होते...."

मदनबाण's picture

17 Aug 2009 - 7:50 pm | मदनबाण

:D

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

अवलिया's picture

17 Aug 2009 - 7:52 pm | अवलिया

=))

--अवलिया

अनिल हटेला's picture

17 Aug 2009 - 8:56 pm | अनिल हटेला

जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".
=)) =)) सह्ही...........

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

चतुरंग's picture

17 Aug 2009 - 7:51 pm | चतुरंग

एकदमच भारी किस्सा! ;)

(क्लब मेंबर)चतुरंग

अनामिक's picture

17 Aug 2009 - 8:02 pm | अनामिक

मस्तं किस्सा आहे!

-अनामिक

विनायक प्रभू's picture

18 Aug 2009 - 2:05 pm | विनायक प्रभू

असेच बोल्तो(प्रेसिडेंट ऑफ क्लब)

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Aug 2009 - 7:59 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =))

उच्च किस्सा आहे. तुमच्या लेकाला माझा पण निरोप सांगा...

"वेलकम टू द क्लब" ;)

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

17 Aug 2009 - 8:17 pm | श्रावण मोडक

वेलकम टू द क्लब हे मुलाला आहेच. पण तुमच्यासाठीही काही लिहिलं पाहिजे. इतक्या मोकळेपणानं हे सगळं लिहिल्याबद्दल. हा असा उमदेपणा थोडा विरळा आहे ना!!! तुमचा एक क्लब व्हायला हरकत नाहीये. जरूर करा, आम्हाला कळवा. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2009 - 12:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, तुम्ही आता क्लब सुरू करा! :-)
मस्त लिहिलं आहेत.

अदिती

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 5:01 pm | लिखाळ

वेलकम टू द क्लब हे मुलाला आहेच. पण तुमच्यासाठीही काही लिहिलं पाहिजे. इतक्या मोकळेपणानं हे सगळं लिहिल्याबद्दल. हा असा उमदेपणा थोडा विरळा आहे ना!!!

:) श्रामोंशी सहमत आहे. लेख आवडला :)

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

प्रसन्न केसकर's picture

17 Aug 2009 - 8:30 pm | प्रसन्न केसकर

लिहिलेय. एव्हढेच म्हणतो
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

शितल's picture

17 Aug 2009 - 9:51 pm | शितल

:(

रेवती's picture

17 Aug 2009 - 10:17 pm | रेवती

आईग्ग!
कसली मज्जा!

रेवती

यशोधरा's picture

17 Aug 2009 - 10:35 pm | यशोधरा

मस्त लिहिलय!

धनंजय's picture

17 Aug 2009 - 11:54 pm | धनंजय

मस्त लिहिले आहे.

टारझन's picture

18 Aug 2009 - 12:57 am | टारझन

अल्टी !!!!!!!

-- टारू२

प्राजु's picture

18 Aug 2009 - 1:57 am | प्राजु

हाहाहा...
सह्हीये!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 4:33 am | स्वाती२

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

सहज's picture

18 Aug 2009 - 7:11 am | सहज

मस्त लिहले आहे.

हे गाणे आठवले.

मन's picture

18 Aug 2009 - 10:09 am | मन

किस्स झकासच!
....चिरंजीवांचा वयोगट काय आहे?

आपलाच,
मनोबा

स्वाती२'s picture

19 Aug 2009 - 5:45 am | स्वाती२

धन्यवाद. लेक १४ वर्षाचा आहे. नुकताच हायस्कुलला गेलाय.

समंजस's picture

18 Aug 2009 - 10:23 am | समंजस

अभिनंदन!! छोटयाचे!
फार लवकरच जीवनाचे सत्य कळल्या बद्दल!! :)

(आम्हाला या सत्याचा आविष्कार खुप उशीरा म्हणजे, लग्न झाल्यावरच झाला) :(

राघव's picture

18 Aug 2009 - 11:52 am | राघव

खि: खि: खि:!!

मस्त लिहिलेत. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

झकासराव's picture

18 Aug 2009 - 2:12 pm | झकासराव

=))

जबराच आहेत चिरंजीव.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

क्रान्ति's picture

18 Aug 2009 - 3:03 pm | क्रान्ति

मस्त किस्सा!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

सनविवि's picture

18 Aug 2009 - 9:51 pm | सनविवि

भारीच!! मला पण असे बरेच अनुभव आले आहेत :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Aug 2009 - 1:40 pm | फ्रॅक्चर बंड्या

"Welcome to the club" आवडले

सही आहे

स्वाती दिनेश's picture

19 Aug 2009 - 3:05 pm | स्वाती दिनेश

मस्त लिहिलं आहेस,
स्वाती

सूहास's picture

19 Aug 2009 - 4:53 pm | सूहास (not verified)

आमच्या चौदा वर्षाच्या मित्राला वेलकम टु द क्लब....

सू हा स...