गिफ्ट

हृषीकेश पतकी's picture
हृषीकेश पतकी in जे न देखे रवी...
17 Aug 2009 - 1:24 am

good morning चा sms वाचताना
माझे डोळेच इतके दमलेले असतात |
आणि कुशीत शिरावसं वाटतं तेव्हा
पालक office मध्ये रमलेले असतात ||

२१ व्या शतकात तंत्रज्ञान
इतकं म्हणून झेपावलं आहे |
मुलाला सकाळी उठवण्याचं काम
आईने mobile वर सोपावलं आहे ||

TV,Cell,comp आणि i-pod
दिवस माझा तारुन नेतात |
AC त बसून दमलेले आई बाबा
मग almost रात्रीच घरी येतात ||

रेडीमेड pizza खायला मग
अजिबातंच वेळ लागत नाही |
पोट गच्चं भरतं त्याने
पण भूक मात्र भागत नाही ||

आजी असतानाचं घर आमचं
आता पूरवी सारखं राहिलं नाहीये |
kitchen मध्ये काम करताना
मी आईला कित्येक दिवसात पाहीलं नाहीये ||

रात्री एकटक serials बघताना
मग त्यांचा channel वरून वाद होतो |
सुरु होण्याआधीच संवाद
दिवस माझा संपून जातो ||

टेम्पररी बनलेल्या नात्यामध्ये आमच्या
आता permanent gap आली आहे |
progress card वर सही करण्याचीसुधा
मला आता practice झाली आहे ||

कामाच्या व्यापात बाबा तर
इतका गुरफटुन गेला आहे |
माझी standard लक्षात ठेवण्यासाठी
त्याने reminder सेव्ह केला आहे ||

तसे रोजच पाहतो एकमेकांना
पण उद्या भेट्ण्याचं प्रयोजन आहे |
धमाल celebration साठी
माझ्या वाढदिवसाचं occasion आहे ||

वेळात वेळ काढून या
मी मेसेज त्यांना केला आहे |
positively try करु
त्यांचा reply सुदधा आला आहे ||

रोजच्या पेक्षा वेगळं घडतंय काही तरी....

माझ्या साठी हे feeling
खरंच अगदी नवं आहे |

आणि माझ्याशी बोलण्यासाठी
रोज फक्त एक तास.........

एवढंच मला त्यांच्याकडून
'birth day gift' हवं आहे ||

कविता

प्रतिक्रिया

रेवती's picture

17 Aug 2009 - 2:16 am | रेवती

कविता चांगली जमली आहे.
मध्येच शिरलेले अनिवासी शब्द तर एकदम निवासी असल्यासारखे फिट्ट बसतात.
रेवती

लिखाळ's picture

17 Aug 2009 - 4:18 am | लिखाळ

कविता छान आहे. आवडली.

मध्येच शिरलेले अनिवासी शब्द तर एकदम निवासी असल्यासारखे फिट्ट बसतात.

कमाल ! प्रतिसाद फार आवडला :)

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

चतुरंग's picture

17 Aug 2009 - 4:40 am | चतुरंग

एकदम यथार्थ वर्णन!

(अनिवासी)चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

17 Aug 2009 - 12:22 pm | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो !
छानच जमली आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Aug 2009 - 3:02 am | बिपिन कार्यकर्ते

कविता आवडली. सध्याच्या 'कामात गर्क' पिढीच्या अपत्याचे मनोगत चांगले मांडले आहे. अर्थात, प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतातच. पण ही बाजू छान मांडली आहे. संदीप / सलिलच्या 'कोमेजून निजलेली एक परीराणी' या कवितेची आठवण झाली.

जाताजाता: कविता आजकालच्या मुलांच्या इंग्रजीमिश्रित मराठी मधे आहे, पण इंग्रजी शब्द देवनागरीत टंकले असते तर?

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

17 Aug 2009 - 5:19 pm | टारझन

अर्रे वा !! कविता छाणच की !!

पळतापळता : हीच कविता उर्दु मधे लिहीली असती तर "के व ळ अ प्र ति म " झाली असती .

- (कविताप्रेमी) टारझन

मदनबाण's picture

17 Aug 2009 - 7:11 am | मदनबाण

कविता आवडली...

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

प्राजु's picture

17 Aug 2009 - 7:47 am | प्राजु

मस्त!!!
ही कविता म्हणजे बदलत्या समाजिक स्थितीचं वर्णन अगदी योग्य करते आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2009 - 8:42 am | प्रभाकर पेठकर

कविता चांगली आहे. कदाचित कुठे असे घडतही असेल. पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही.
कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहणार्‍या आईच्या मनास अपराधी भावनेची बोच असते आणि कित्येकदा त्याची भरपाई घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ, प्रेम मुलांना देण्याकडे अशा आयांचा (आईचे अनेकवचन) कल आणि प्रयत्न असतो.

मुलांच्या दृष्टीकोनातून पाहता, त्यांची भावनिक कुचंबणा होते हे मान्य.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

दशानन's picture

17 Aug 2009 - 8:51 am | दशानन

माझ्या मनात देखील असंच काहीसे आले होते कारण मी अनेक घरे अशी पाहीली आहेत ज्या मध्ये आई-वडील दोघे ही कामावर जातात पण दिवसातून वेळात वेळ काढून.... व शनीवार संध्याकाळ व पुर्ण रवीवार आपल्या मुलांच्या सोबतच घालवतात कारण त्यांना वाटते सोमवार ते शुक्रवार पर्यंत जो गॅप पडला आहे आई-वडील व मुलांमध्ये तो भरुन काढता यावा... !

आईतर आई असते... मग गावातली आय.. असो वा शहरातील मॉम.. !
ती मुलांच्या कडे दुर्लक्ष करेल असे वाटत नाही.. हा कधी कधी कामाच्या रगाड्यात थोडा कमी वेळ देत असेल हे शक्य पण मुलाला सकाळी उठवायला विसरणे शक्यच नाही... !

भावनिक शब्दाच्या खेळामुळे एकदा वाचल्यावर कविता आवडू शकते पण पण पुन्हा पुन्हा वाचली की त्यातला फोलपणा जाणवू लागतो...

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

अवलिया's picture

17 Aug 2009 - 11:51 am | अवलिया

सहमत आहे.

--अवलिया

हृषीकेश पतकी's picture

18 Aug 2009 - 2:35 pm | हृषीकेश पतकी

आपल्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे..
या कवितेमधल्या मुलाची स्थिती अपवादात्मक आहे हे नक्की पण काल्पनिक नाही..
एका परिचयाच्या घरातलं वातावरण पाहिल्यानंतर न राहवून सुचलेली ही कविता आहे..

आवर्जून कविता वाचल्याबद्दल धन्यवाद..

रेवती's picture

17 Aug 2009 - 4:40 pm | रेवती

पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही.
नाही, ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हाच विचार याच शब्दात माझ्या मनात आला; पण ज्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडते ते पाहून आपल्यालाच वाईट वाटते. आईच्या मनाला असलेली बोच ही तिच्याही सवयीची होउन जाते. मन थोडं बोथट होत असेल. असं काही बघितल्यावर माझी फार तडफड होत असे........आता अशी कुटुंबं असतात आणि असणारच्......आपल्यालाच सवय नाही असं काही बघायची म्हणून सोडून देते.

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Aug 2009 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते

ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व वगैरे करते असे वाटत नाही. आणि खुद्द कवीनेही तसा कुठे उल्लेख केला नाहीये. समाजात सगळ्याच प्रकारचे लोक असतात, त्यातला हा एक प्रकार. कवि त्या प्रकारात अडकलेल्या अपत्याचे मनोगत मांडतो आहे असे वाटते. पुढे जाऊन असे म्हणतो, की काही असे प्रकार किंवा अगदी जवळ जाणारे प्रकार अगदीच दुर्मिळ नाहीत.

बिपिन कार्यकर्ते

पक्या's picture

17 Aug 2009 - 12:38 pm | पक्या

>>पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही>>
नसेल ही करत. आज अशी परिस्थिती आहे तर उद्या कशी असेल असा कल्पनाविलास करत गेलो तर कवितेत उल्लेखलेली अतिशयोक्ती घडू शकते. त्या दृष्टिकोनातून कविता वाचली तर एक विरंगुळा म्हणून चांगली जमलीये कविता.

अवांतर : अतिशयोक्ती हा पण भाषेचा एक अलंकार आहे .

खरोखरच अशा बिझी आई-वडिलांच्या मुलांचे होणारे हाल मी पाहीले आहे .
अशी गिफ्ट मागायची वेळ लहान मुलांवर न येवो .....