गोपालकाला

पक्या's picture
पक्या in पाककृती
14 Aug 2009 - 2:00 pm

फक्त शिर्षक असलेल्या http://misalpav.com/node/8940 या धाग्यातील पाककॄती नंतर सापडण्यास सोपे जावे म्हणून पाककॄती विभागात टाकत आहे.

दही हंडी आणि कृष्णजन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्च्छा.
नेटावर सर्च केल्यावर गोपालकाल्याची पुढील रेसिपी मिळाली.

भिजवलेले पोहे, खोवलेला नारळ, काकडी - हि. मिरच्या आणी आलं बारिक चिरून , दही , जिरे , मीठ, साखर, फोडणी साठी तूप.
तूपाची फोडणी करुन त्यात जिरे , मिरच्या, आले घालणे. ही फोडणी पोह्यांवर ओतणे. त्यात दही , काकडी आणि खोवलेला नारळ घालणे, चवी नुसार मीठ व साखर घालणे. सर्व जिन्नस चांगले मिक्स करुन घेणे.

विजूभाऊंनी दिलेली रेसिपी - जाड पोहे, ज्वारीच्या लाह्या , मेतकूट, साखर ,मीठ,लोणचे , आले( ठेचलेले) हे सर्व मिक्स करावे. हवी असल्यास हिरवी मिर्ची

गोपालकाल्याच्या अजून वेगळ्या काही रेसिप्या असतिल तर येऊ द्यात.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

14 Aug 2009 - 2:03 pm | अवलिया

फटु ?

--अवलिया

पक्या's picture

14 Aug 2009 - 2:33 pm | पक्या

gopalkala

फटू नेटावरून साभार.
घरी गोपालकाला केल्यास तो पण नंतर टाकीन.

पक्या's picture

14 Aug 2009 - 2:54 pm | पक्या

काही घरांमध्ये नुसताच दही पोहे काला पण करतात. दह्यात वाटून घेतलेली मिरची + जिरे पूड+ मीठ घालून हे दही भिजवलेल्या पोह्यांमध्ये मिक्स करतात.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 3:05 pm | भाग्यश्री कुलकर्णी

प्रत्येकाच्या घरातुन जे जे खायचे पदार्थ मिळतील तेघेउन त्याचे एकत्रीकरण करुन मुळ गोपाळकाला करावयाचे.त्यामुळे गोपाळकाल्यात कोणताही पदार्थ वर्ज्य नाही.

पक्या's picture

15 Aug 2009 - 12:00 am | पक्या

>>गोपाळकाल्यात कोणताही पदार्थ वर्ज्य नाही.

ते बरोबर आहे. पण नुसतचं सर्वांनी एकत्र जमून खायचं असेल तर जमलेल्या सर्वांचे पदार्थ एकत्र करुन काला केला तर चालेल.
जन्माष्टमीला श्रीकॄष्णाला गोपालकाल्याचा नैवेद्य दाखवतात. त्यावेळी वर सांगितल्याप्रमाणे दही पोह्याचाच काला करतात.

अनामिक's picture

15 Aug 2009 - 12:40 am | अनामिक

मी लहान असताना आमच्या भागातल्या बायका आपापल्या घरी गोपालकाल्याचा कार्यक्रम आयोजीत करायच्या. त्यात सुरवातीला कृष्णाची पुजा, गवळणी गाण्याचा कार्यक्रम उरकला की मग गोपालकाला तयार करायला घ्यायचे. जी कुणी बाई होस्ट असेल ती आधीपासूनच बरीच तयारी करून ठेवत असे. गोपालकाल्यासाठी पोहे, चुरमुरे, लाह्या, ताक, दही, साखर, लोणचे (आंब्याचे, लिंबाचे), हिरवी मिरची, भिजवलेली हरबर्‍याची डाळ, शेंगदाने वगेरे वगेरे साहित्य तयार असायचे. कार्यक्रमाला येणार्‍या बायकासुद्धा घरून एका डब्यात वरील साहित्या पैकी काहीतरी घेऊन येत असे. पाणी साठवायच्या स्टीलच्या मोठ्या पिपात घरचे आणि येणारे साहित्य भरत रहायचे. आणि मग ताक, दही, लोणचे घालून गोपालकाला तयार करायचा. सगळ्यांना वाटायचा आणि सगळ्याचे डबे भरून द्यायचे.
खूप मजा यायची.

अजूनही हा प्रकार होतो, पण पुर्वी जेवढा व्हायचा तेवढा नाही!

-अनामिक