वाटे तुला की, तू एकटा
न संगे कोणी , दिवस सरता
खायला येई , सुन्न भयाण शांतता
न कळे काही , त्रस्त तु सर्वथा
मग,
कर तू , वाच तू, स्मर तू
हे नमन , आहे हे तुजकरिता!
मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता
साथ मिळे तुला , जीवन एक कविता
सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता
असावी ही , पुस्तकातली परिकथा
मग,
स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला,
हे नमन , आहे हे तुजकरिता!
प्रतिक्रिया
14 Aug 2009 - 10:38 am | प्रशांत उदय मनोहर
छान.
- प्रशांत