भारतीय !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Aug 2009 - 12:00 pm

हे जळणं आता रोजचंच आहे
बंदुकीच्या गोळीशी आमचं
नातं फार जवळचं आहे
बंदुक माझ्याकडेही आहे
पण चापावर बोटच येत नाही
मी अगदी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

मी कधीचा शांतता मागतोय
ते मात्र आर. डी. एक्स. देताहेत,
आणि देताहेत
निष्प्राण, जळलेली, तुटलेली
माझ्याच स्वप्नांची, आकांक्षाची प्रेते
पण मी शांत आहे
...........कारण मी भारतीय आहे

त्यांचा जोर वाढतोय
माझा भारत कधीचा जळतोय
ते निर्धास्त आहेत
पुन्हा पुन्हा नव्या जोमाने
बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत
त्यांना माहितीये मी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

खबरदार..
माझा अंत पाहु नका
मी जळेन तुमच्या वणव्यात
पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला
ती एकच ठिणगी पुरेशी आहे.
कारण..
विसरताय तुम्ही..
वरवर शांत भासत असलो
तरी अखेर...मी भारतीय आहे.

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

12 Aug 2009 - 4:53 pm | नाना बेरके

आपल्या संसदेवर हल्ला झाला, कारगीलयुध्द घडले, मुंबईमधील हल्ले, ताज आणि व्ही.टी. स्टेशनवरचे भीषण हल्ले. आपण शांत.

आपण कधी पेटून उठतंच नाही, त्यामुळे आपली ठिणगीसुध्दा तयार होईल कि नाही ह्याची शंका वाटते. असो.

- तुमची कविता चांगली आहे.

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2009 - 4:59 pm | विशाल कुलकर्णी

सहमत आहे नाना...

बघा ना ४८ वाचनानंतर आत्ता कुठे एक प्रतिसाद आलाय! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

प्रशांत उदय मनोहर's picture

12 Aug 2009 - 5:38 pm | प्रशांत उदय मनोहर

दुर्दैवाने सहमत. :(
- प्रशांत

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 5:41 pm | लिखाळ

ह्म्म.. परिस्थिती विचित्र आहे खरेच.

बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत

याचा अर्थ काय? कोण बापू आणि त्यांची कोण कन्या?
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

विशाल कुलकर्णी's picture

12 Aug 2009 - 5:43 pm | विशाल कुलकर्णी

महात्मा गांधी आणि त्यांची अहिंसा !

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 5:52 pm | लिखाळ

असे होय.. आभार !
(अहिंसा खरेतर गांधीजींची आजी किंवा पणजी असावी :) इतकी ती जूनी आहे.)
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

हर्षद आनंदी's picture

12 Aug 2009 - 6:34 pm | हर्षद आनंदी

वैतागलात का? अहो, हे असेच आहे याला कारण आहे, भारतीय मानसिकता आणि सो कॉल्ड सहीष्णुता !!

अरे नका गाऊ सहीष्णुतेचे पोवाडे, तुम्ही भ्याड आहात हे कबुल करा ना!
आमची मर्दानगी फक्त बायकोवर, शामळु मित्रावर, जमलीच तर शेजार्‍यावर पण परधर्मीय आणि परदेशीय म्हणजे आम्हाला देवच की!!

त्यांची चाकरी करण्यात आम्हाला धन्यता वाटते, कशासाठी पोटासाठी म्हणताना आपल्या देशातीय स्वातंत्र्य सैनिकांवर लाठ्या चालवणारे आम्हीच, जालीयनवाला बागेत गोळ्या झाडणारे आम्हीच, इंग्रजांना फितुर होणारे आम्हीच, महंमद घौरीला मदत करणारे आम्हीच, अकबरला शहेनशहा बनवुन आपल्या घराची अब्रु त्याच्या बिछान्यावर घालणारे आम्हीच !! हो आम्हीच ते भारतीय ... षंढ .. नपुंसक.... राष्ट्राभिमान खुंटीवर टांगुन परकियांच्या ढांगेखालुन जाणारे आम्हीच!!!! सदानकदा त्राहीमाम! त्राहीमाम!! म्हणत भगवंताची (?) वाट पहाणारे आम्ही, आम्ही काय हातात तलवार घेणार? "बंदुकीची गोळी?" "अरे बापरे! ही तर हत्या ...नरकात जाऊ ना आम्ही ! "

आणि हि बेईमान औलाद आजही माजलीय, फोफावलीय.,... काही रूपड्यांसाठी देशाला गहाण टाकतीय आणि आम्ही फक्त लेख लिहितोय, चर्चा करतोय, आजची रात्र सुखात झोपु मग उद्या बघु असे म्हणत मस्त जगतोय...

आम्ही म्हणतो, शिवाजी जन्माला आला पाहीजे पण तो शेजारी !!
(शिवाजी जन्माला आला तेव्हा एक साधारण मानव होता, त्याला घडवला त्याच्या आईने, या काळ्या मातीने, त्याला पेटुन ऊठवला शहाजी राजांच्या पराक्रमाने, हे आपण सोयिस्करपणे विसरुन, "राजे, तुम्ही परत या", अश्या पाट्या लावुन हींडत असतो)

आम्ही भारतीय ... शुर भारतीय .. .कधी काळी पृथ्वीवर राज्य केलेल्या भरताचे नपुंसक वंशज.... रामाचा, कृष्णाचा, चंद्रगुप्ताचा, अशोकाचा, पृथ्वीराजाचा, शिवाजीचा आणि कुणाकुणाचा पराक्रम विसरुन त्यांच्या खाजगी आयुष्याचे धिंडवडे काढत त्यांची पुजा करणारे हरामी भारतीय ... होय आम्ही भारतीय!!

विकास's picture

12 Aug 2009 - 7:12 pm | विकास

कशालाही जेंव्हा कुठलीच प्रतिक्रिया दिली जात नाही तेंव्हा ते मुर्दाडपणाचे लक्षण असते... तेच आपण दाखवून दिलेत असे वाटले. एकीकडे कविता आवडली पण, "ही कविता आवडली नाही, पटत नाही, काहीही लिहीता," असे म्हणता आले असते तर अधिक आवडले असते. :-(

बाकी भारताला आपण भारतमाता म्हणतो आणि गांधीजींना राष्ट्रपिता... तेंव्हा तुमच्या काही ओळींचे अर्थ वेगळे होऊ शकतात असे वाटते.

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 9:50 am | विशाल कुलकर्णी

धन्स.....
खरेतर परवा विकासजींच्या एका लेखावर ९६मराठा यांनी एक प्रतिक्रिया दिली होती... ! वाचुन खुप छान वाटले, अभिमानही वाटला पण मनोमन विचारचक्र चालु झाले की खरेच जर अशी परिस्थिती उदभवली तर किती भारतीय स्वदेश रक्षणासाठी उभे राहतील? आणि मग जे काही विचार मनात आले ते कवितेच्या स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला .
अहिंसा गेली कित्येक युगे आपल्या देशाचा स्वभाव आहे, पण या शब्दाला सम्राट अशोकानंतर खर्‍या अर्थाने सार्थकता आणली ती महात्मा गांधींनी , म्हणुन अहिंसेला बापुंची कन्या म्हणण्याचे धाडस केले.

सगळ्यांचे आभार.

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

विसोबा खेचर's picture

13 Aug 2009 - 10:57 am | विसोबा खेचर

पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला

क्या बात है..!

तात्या.

आशिष सुर्वे's picture

13 Aug 2009 - 11:32 am | आशिष सुर्वे

अप्रतिम काव्य..
आपण फेटा ऊडवून दाद देणार राव!
(आंग्ल भाषेत 'हॅट्स ऑफ'.. म्हणतात ना, तेच ते)

@

^
^
^

राहिला एक प्रश्न..
खरेच जर अशी परिस्थिती उदभवली तर किती भारतीय स्वदेश रक्षणासाठी उभे राहतील?

तसे पाहता आपली संरक्षणदले असल्या परिस्थितींसाठी समर्थ आहेतच.. http://en.allexperts.com/e/i/in/indian_armed_forces.htm
परंतु तशी वेळ आलीच तर आश्वस्त असा, 1,150,000,000 भारतीय आहोत आपण!

मने गोठली असली तरी रक्त मात्र गोठले नाही!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 11:36 am | विशाल कुलकर्णी

असेच होवो ! शुभं भवतु : !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

आता गांधीवादा पेक्षा सावरकर,शीवाजी राजे, टिळ्क,स्वामी विवेकांनंद यांच्या विचारांना आचरणात आणायला पाहिजे. कविता छान जमली आहे.

पूजा