पुन्हा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
9 Aug 2009 - 3:30 pm

वाटते भय का प्रकाशाचे पुन्हा?
वाहती वारे विनाशाचे पुन्हा

यायचे नव्हते तुला येथे कधी,
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?

वादळाहातीच ज्याचे होडके,
कोण साथी त्या प्रवाशाचे पुन्हा?

कोरडे रडणे, उमाळे बेगडी,
दु:ख का फसवे उसाशाचे पुन्हा?

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

गझल

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

9 Aug 2009 - 4:02 pm | दादा कोंडके

सुंदर गझल!

'उसासा' चं 'उसाशाचे' झालेलं पटकन कळलं नाही.

श्रावण मोडक's picture

9 Aug 2009 - 4:15 pm | श्रावण मोडक

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

खास.

पार्टनर's picture

9 Aug 2009 - 4:20 pm | पार्टनर

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

जबरदस्त ! m(_ _)m

दशानन's picture

9 Aug 2009 - 4:23 pm | दशानन

सुंदर... !
आवडली गझल !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
तुझ सम नाही दुसरा ध्वज
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

प्रमोद देव's picture

9 Aug 2009 - 7:15 pm | प्रमोद देव

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

हे दोन शेर जास्त आवडले.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मनीषा's picture

9 Aug 2009 - 7:16 pm | मनीषा

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?
वा!!! छान ..

मस्त कलंदर's picture

9 Aug 2009 - 7:21 pm | मस्त कलंदर

या ओळी अधिक आवडल्या...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

ऋषिकेश's picture

9 Aug 2009 - 7:35 pm | ऋषिकेश

प्रत्येक शेर मोजून मापून आणि कसदार!!

खूप खूप खूप खूप आवडली गझल

यायचे नव्हते तुला येथे कधी,
का बहाणे हे खुलाशाचे पुन्हा?

क्या बात है!!!

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ३४ मिनीटे झालेली आहेत. चला आता वाचुया एक सुमधूर गझल "पुन्हा...."

अवलिया's picture

9 Aug 2009 - 7:37 pm | अवलिया

वा ! सुरेख !

--अवलिया

मदनबाण's picture

9 Aug 2009 - 7:52 pm | मदनबाण

व्वा...अप्रतिम गझल.

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?
जबरदस्तच
बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?
व्वा.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

प्राजु's picture

9 Aug 2009 - 8:00 pm | प्राजु

तो उसाशाचा शेर सोडला तर संपूर्ण गझलच अप्रतिम आहे. :)

सोंगट्यांनी डाव केव्हा साधला?
का बदलले दैव फाशाचे पुन्हा?

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

हे तर लाजवाब!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

9 Aug 2009 - 11:35 pm | बेसनलाडू

फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2009 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन्हा?

एखादी उत्तम साहित्यकृती जसजशी आपण वाचत जाऊ तसतशी अनुभूतीच्या वरच्या पातळीवर नेत राहते सतत, आणि तिचा शेवट अगदी कळसाला नेतो.... बस्स.... तसेच झाले. याहुन अधिक बोलणे नाही.

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

10 Aug 2009 - 5:21 am | घाटावरचे भट

उत्तम!!

दत्ता काळे's picture

10 Aug 2009 - 11:37 am | दत्ता काळे

गझल आवडली.

चन्द्रशेखर गोखले's picture

10 Aug 2009 - 1:16 pm | चन्द्रशेखर गोखले

पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी गझल... क्या बात है !

अनिल हटेला's picture

10 Aug 2009 - 6:40 pm | अनिल हटेला

बोट माझे का वळे माझ्याकडे
शोधताना मूळ नाशाचे पुन:

क्या बात है.....:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

धनंजय's picture

11 Aug 2009 - 2:20 am | धनंजय

गजल आवडली.

(उसाशाच्या ओळींबद्दल प्राजुशी सहमत.)