आज भल्या पहाटे कोकिलकूजनाने झोपेतून जागा झालो. हो, आमच्याकडे बारा महिने उन्हाळा असल्यामुळे श्रावण महिन्यातही कोकिल कूजतात (आणि आमची साखरझोप कुजवतात!!!).
तर काय सांगत होतो? हो, जागा झालो, प्रातर्विधी, स्नान वगैरे आटपून आणि शुचिर्भूत होऊन आपल्या मिपामंदिरात डोकावलो.
मंदिर पहाटे सुनसान होतं....
लांबूनच गाभार्यात डोकावून पहिलं तर श्री नंदनगिरी होडावडेकर स्वामीमहाराज हलक्या आवाजात तत्वज्ञानावर प्रवचन देत होते....
त्यांच्यासमोर चार हलकी मंडळी (वजनाने हो!!) बसून हलक्या आवाजात चर्चा करीत होती.......
आता आम्ही पडलो फाटकी मुंडासंवाली सामान्य माणसं! आपल्याला गाभार्यापर्यंत कोण जाऊ देणार? आपली हद्द नगारखान्यापर्यंतच!!
तेंव्हा तिथेच बसून नंदनस्वामींचे अमॄताचे बोल ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो.....
पण आयच्यान सांगतो, एक शब्द कळेल तर शपथ!!!
अल्बिनो काय, मेलॅनिन काय, वेरेश्चगिन काय!!!!
आम्ही मॅट्रिकला इंग्रजी नापास असल्याने नंतर त्यांच्या मराठी शब्दांवर लक्ष द्यायचा प्रयत्न करून पाहिला!! पण तिथे ही तीच गत!!!
उत्क्रांती, नेणिवेची पातळी, नैसर्गिक उर्मी, छ्या, छ्या, छ्या!!!!
हे म्हाराज तर अगदीच उच्चपातळीवरून (मराठीतः हाय फंडा!) बोलून र्हायले होते. आमच्या डोचक्याचा अगदी पार कोदा व्हायची पाळी आली!!!!
तेव्हढ्यात....
आमच्या कानी 'बायका', 'भांडण', 'शिव्या', हे शब्द कानी पडले...
आणि आमची "नैसर्गिक उर्मी" तिथेच असल्याने आम्ही कान टवकारले....
वर्तमानपत्रातल्या कुठल्यातरी बातमीसंबंधी महाराज अगम्य शब्दांत बोलत होते.....
इथे आम्ही महाराजांचा नाद सोडून वर्तमानपत्रांकडे वळलो. आमचा नेहमीचा "ठाणेवैभव" सोडून काही हुच्च पेपर चाळल्यावर आमच्या प्रकार ध्यानात आला. सारांश असा.....
महाराष्ट्रातील सुखेड आणि बोरी या दोन शेजारी गावांतल्या बायका म्हणे दर नागपंचमीला या दोन गावांच्या मध्ये असलेल्या पाणवठ्यावर एकत्र जमून एकमेकींना भांडून जाहीर शिव्या घालतात.....
अख्खी दोन्ही गावंच काय पण शेजारपाजारच्या गावांतून लोकं तिथे मुद्दाम हा समारंभ बघायला जमतात...
ही प्रथा म्हणे गेली अनेक वर्षे चालू आहे....
आणि आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) त्याला विरोध करून ती प्रथा बंद पाडणार आहे......
तिच्यायला, ह्या अंनिसच्या!!!!!!!
भांडल्या सुखेड-बोरीच्या बायका तर अंनिसचं काय गेलं?
आता चार मराठी बायका एकत्र जमल्या तर भांडणार नाही तर काय करणार? एकत्र जमून एकमेकीची "निर्हेतूकपणे" स्तुती करण्यार्या बायका आमच्या तरी पाहण्यात कधी आलेल्या नाहीत!!
आता शहरी बायका गोड शब्दांत एकमेकींना टोमणे मारतात, तर खेड्यातल्या बायका डायरेक शिव्या देतात, पण भावना तीच!!!
आणि खुद्द त्या भांडणार्या आणि शिव्या देणार्या बायकांची या प्रथेविरूद्ध काही तक्रार दिसत नाही. त्याशिवाय उगाच का त्या दर वर्षी नटून्-सजून हा सोहळा साजरा करतात?
आम्हाला तर ह्या सोहळ्याला स्वतः हजर रहावंसं वाटायला लागलंय.....
कल्पना करा....
दोन गावांतल्या पाच-पन्नास बायका नटून्-सजून एकत्र जमल्यात आणि एकमेकींना शिव्या देत भांडतायत....
शिव्या देण्याच्या आवेशाने त्यांची तोंडं तांबडीबुंद झालीयेत, श्वास फुललाय.....
चेहर्यावर केसांच्या बटा हिंदकाळतायत, पदर घसरतायत, कंबरा झुलतायत....
किती मनोहर दृश्य!!!!
त्यात हे सगळं पाणवठ्यावर....
म्हणजे एखाद-दोन ललना घसरून पडून ओल्याचिंब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.......
अरे काय त्या अंनिसचं डोकं फिरलंय काय? असला सोहळा बंद करायचे डोहाळे लागलेत त्यांना!!!!
मी तर म्हणतो समजा गेलेच तिथे त्या अंनिसचे कार्यकर्ते....
आणि हा सगळा सोहळा पाहून, तोही नागपंचमीला, जर समजा सगळे नाग फडा उभारून र्हायले तर?
तर हे कार्यकर्ते सोहळा थांबवतील की नागांना आवरायचं कार्य करतील?
मिपावरील स्त्री सभासदांच्या सदर्भातला मजकूर संपादित. - संपादक.
(निवेदनः वरील लिखाण विनोदाने लिहिले आहे हे ज्याला समजले नाही तो खरा मिपाकरच नाही! त्यामुळे नेहमीचं ते ह. घ्या वगैरे लिहिणार नाही ज्जाऽऽऽ!!!)
प्रतिक्रिया
7 Aug 2009 - 11:49 pm | बेसनलाडू
सपशेल! काका, दंडवत!!!
(तत्त्वज्ञानी)बेसनलाडू
9 Aug 2009 - 6:49 pm | मराठमोळा
हहपुवा
साष्टांग दंडवत!!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
7 Aug 2009 - 11:49 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
अवांतर: पिडां एकदम मनकवडे हो... अगदी माझ्याच मनातलं लिहिलंय. ;)
(वर्गणीच्छू) बिपिन कार्यकर्ते
7 Aug 2009 - 11:55 pm | _समीर_
हाहाहा...तुफान लेख हा डांबीस शेठ!
7 Aug 2009 - 11:58 pm | रामपुरी
बातमी खरी असेल तर अंनिसचं अवघड आहे. यात अंधश्रद्धा कुठं आली? या अंनिसला नाही तिथे तोंड घालायची सवयच आहे. तिकडे हजारो बुवा, श्री श्री, सु श्री, भगवान इत्यादी इत्यादी धिंगाणा घालतायत. त्यांचा भांडाफोड करायचा दम यांच्या xxत नाही. यांना एकदा कुठेतरी घाऊक बडवून काढला पाहिजे.
8 Aug 2009 - 12:06 am | दादा कोंडके
प्रवेश प्रतिबंधीत
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
असं अजुन कसं आलं नाही या पानासाठी?
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
8 Aug 2009 - 12:07 am | नंदन
=)) =))
या प्रवचनाचा अन्यत्रही प्रयोग होऊ शकेल :). दोन टायमाची चाय आणि मासळीचं जेवण इतकीच काय ती बिदागी ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Aug 2009 - 1:34 am | एक
:)
या लेखाची एक कॉपी अंनिस ला पाठवली पाहिजे..
8 Aug 2009 - 1:36 am | विकास
या लेखाची एक कॉपी अंनिस ला पाठवली पाहिजे..
अनिस ताबडतोब फाट्यावर मारेल अशी काळजी वाटते. ;)
8 Aug 2009 - 2:51 am | पिवळा डांबिस
त्यांना लेख फाट्यावर मारू द्या!!
आम्ही त्यांना आणि तुम्हाला फाट्यावर मारू!!!
त्यात काय विशेष!!!
8 Aug 2009 - 3:36 am | एक
आम्ही त्यांना फाट्यावर मारायच्या निमीत्तालाच टेकले आहोत . :)
गुणगुणार्या डासांसारखे हातातच लागत नाहीत .#ले! X(
8 Aug 2009 - 3:46 am | विकास
आम्ही त्यांना आणि तुम्हाला फाट्यावर मारू!!!
हे बरं आहे... आम्ही म्हणलं की काळजी वाटते की "ते" फाट्यावर मारतील म्हणून तर आम्हाला का त्यांच्याबरोबर..? :?
ही लोकशाही की ठोकशाही का नुसतेच बायवन गेटवन फ्री? :(
8 Aug 2009 - 3:52 am | पिवळा डांबिस
अहो अंनिस ही एक चिमूटभर संस्था!!!
ती आमचा लेख फाट्यावर मारेल याची तुम्हाला काळजी वाटावी?
ठीक आहे, तुम्ही आता 'काळजी' दाखवल्यामुळे नो फाटा फॉर यू!!!
(दुसरा कोणी सब्स्टिट्यूट सुचवाल का? फाट्याला रिकामं रहायला आवडत नाही!!!!)
:)
9 Aug 2009 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे
इथे एक अंनिस कडे जायचा रस्ता फुटतो ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Aug 2009 - 9:58 am | विकास
संकेतस्थळाचे इंग्रजी नाव वाचून मजा वाटली:
Superstition Education Committee असे म्हणणे योग्य की Anti-Superstition Awareness Committee असे म्हणणे योग्य? :-)
अमेरिकेत प्रत्येक कामाच्या ठिकाणी sexual harassment ह्या विषयावर कायद्याने माहीती/शिक्षण देणे गरजेचे असते. त्या संदर्भात sexual harassment awareness training असे म्हणण्याऐवजी sexual harassment training असे म्हणतात! :-)
9 Aug 2009 - 10:17 am | प्रकाश घाटपांडे
superstition eradication हाच योग्य शब्द आहे. निर्मुलन कशाचे? तर अंधश्रद्धांचे. पण लोक म्हणतात दाभोलकर म्हंजे ते अंधश्रद्धावाले का? निर्मुलन हा शब्द अधिक वापरण्याचे कष्ट कोणी घेत नाही. विंग्रजी वापरल नाई तर त्यो गुगलवाला आम्ची दखलच घेनार नाई
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Aug 2009 - 5:22 pm | _समीर_
अहो प्रकाशकाका त्यांनी अती उत्साहाच्या भरात 'Education' असले वाचले. ठरावीक साच्यातले चष्मे वापरले की होते असे कधी कधी..
असो..
8 Aug 2009 - 1:37 am | उमराणी सरकार
लय भारी पिवला दांबिस,
ही २ गावे कुठे आहेत? पुढची नागपंचमी तिथे. बायका भांडतात तेव्हा पुरूषांच्याही माना खाली जातील अश्या त्वेषाने शिवीगाळ करतात. त्यात झिंज्या उपटायचा सिन असेल तर "यासम दुजा न कोय."
उमराणी सरकार
8 Aug 2009 - 1:41 am | विकास
महाराष्ट्रातील सुखेड आणि बोरी या दोन शेजारी गावांतल्या बायका म्हणे दर नागपंचमीला या दोन गावांच्या मध्ये असलेल्या पाणवठ्यावर एकत्र जमून एकमेकींना भांडून जाहीर शिव्या घालतात.....
या दृश्यावरून बटाट्याच्या चाळीतील शिघ्रकवीच्या ओळी आठवल्या: अचानक नळाला पाणी आले म्हणून सर्व लगबग करून जातात तेंव्हा तेथेच एकजण अंघोळीला येऊन बसतो त्याला उद्देशून:
उठवा मेल्या धटींगणाला, आदळीत कळशा कुणी गर्जल्या
कुणी तयाच्या पिढ्या मोजील्या,
नळभूमीवर अवतरल्याकी साक्षात रणरागिणी, नळाला आलयं गडे पाणी !
8 Aug 2009 - 1:50 am | खादाड_बोका
आणि हा सगळा सोहळा पाहून, तोही नागपंचमीला, जर समजा सगळे नाग फडा उभारून र्हायले तर?
तर हे कार्यकर्ते सोहळा थांबवतील की नागांना आवरायचं कार्य करतील?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मला तर स्वप्नातही भुक लागते....
8 Aug 2009 - 1:54 am | टुकुल
फुल्ल फार्मात आहात पिडाकाका....
<<दोन गावांतल्या पाच-पन्नास बायका नटून्-सजून एकत्र जमल्यात आणि एकमेकींना शिव्या देत भांडतायत....
शिव्या देण्याच्या आवेशाने त्यांची तोंडं तांबडीबुंद झालीयेत, श्वास फुललाय.....
चेहर्यावर केसांच्या बटा हिंदकाळतायत, पदर घसरतायत, कंबरा झुलतायत.... >>>
वा वा वा !!! आणी तिथे आम्ही फेटे उडवायला =))
--नागोबा,
टुकुल.
8 Aug 2009 - 3:11 am | घाटावरचे भट
आयला, धमाल आहे.... बेष्ट लिवलंय.
8 Aug 2009 - 7:44 am | विसोबा खेचर
डाम्बिसा,
आज प्रथमच मला तुझ्या लेखामुळे मनस्ताप सहन करावा लागला, शिव्या खाव्या लागल्या.
अरे आधीच काय माझ्या डोस्क्याला कमी ताप आहेत का रे? खरडवह्यांचा अभ्यास कर.
असो..
लेखाची थीम बाकी छान! :)
तुझा,
तात्या.
8 Aug 2009 - 9:31 pm | पिवळा डांबिस
आज प्रथमच मला तुझ्या लेखामुळे मनस्ताप सहन करावा लागला,
का बुवा? माझ्या लेखामुळे तुला का मनस्ताप सहन करावा लागतो? जे कुणी तुला मनस्ताप देणारे आहेत त्यांना म्हणावं एकतर तिथे धाग्यावर जाऊन तुम्हाला काय बोलायचंय ते बोला किंवा नाहीतर मग ही चांदणी घ्या आणि प्रसन्न व्हा!!!!!
शिव्या खाव्या लागल्या.
भले!!! तू सुखेडी-बोरीला पोचलास सुद्धा?:)
अरे आधीच काय माझ्या डोस्क्याला कमी ताप आहेत का रे?
कबूल! पण मी तो ताप कधी वाढवलाय ते सांग ना? उलट इथे मिपावर जेंव्हा जेंव्हा वातावरण तापतं तेंव्हा तेंव्हा मी काहीतरी लिहून ते थंड करण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करत असतो!!! तूच जरा मिपाची वाटचाल उघडून बघ!!!!
खरडवह्यांचा अभ्यास कर.
जमायचं नाय!! एकतर साक्षात तुझ्याच खरडवहीत मी फक्त चित्रं न्याहाळतो (आणि त्यातही तू हल्ली तोलानी, बांधानी वगैरे हिंगाच्या डब्या दाखवून निराशा करतोस!!)
बाकी इतर फालतू बुद्रुक खरडवह्यां तपासायला मला टाईम नाय!!!!
असो..
लेखाची थीम बाकी छान!
थॅन्क्स!! तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरवर माझा विश्वास आहेच!!! आणि बाकी सारं माझ्या दृष्टीने बिल्कुल बिनमहत्वाचं आहे!!!!!!
केवळ तुझाच फॅन,
फोकलीचा डांबिस!!!!!
8 Aug 2009 - 10:29 pm | अवलिया
>>>आणि त्यातही तू हल्ली तोलानी, बांधानी वगैरे हिंगाच्या डब्या दाखवून निराशा करतोस!!
सोनाराने कान टोचले ते बरे झाले... आता जरा बरा 'माल' दिसेल अशी आशा आहे... नाही तर आहेच आपले.. हरीमुखे म्हणा !
--अवलिया
9 Aug 2009 - 8:07 am | विसोबा खेचर
मान्य..! :)
तात्या.
8 Aug 2009 - 8:28 am | दशानन
=))
=))
हा हा हा पिडा आजोबा... !
जबरा !
***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
8 Aug 2009 - 8:34 am | विनायक प्रभू
आता सिरियस विषय चर्चा करताना हा लेख आठवला की वांदे होतील.
दोन बायकाना भांडताना ते सुद्धा कचा कचा ..जे दृश्य असते आहा हा
इथे तर सामुदायिक.. क्या बात है.
8 Aug 2009 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
आपल्याला बोरीच्या बार मध्ये बायका काय शिव्या देत असतील याची उत्सुकता असेलच. तत्पुर्वी शिव्यांची माहिती करुन घ्या.ल्वॉक अंनिसला लई श्या घालत्यात. आन पुढ बी घालनार हायेत हे भाकीत वर्तवतो
(ज्योतिषी अंनिस)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
8 Aug 2009 - 10:23 am | टारझन
फारंच मर्मभेदी लिहीलंय काका !!
तुम्ही विनोदी अंगाने लिहीलं असलं तरी ह्यात एक प्रकारची सत्यता आहे !
अत्यंत चोक्कस हाताळणी , सुरेख वाक्यरचणा आणि प्रचंड सेण्स ऑफ ह्युमर सगळ्यांचाच आधार घेऊन सत्यपरिस्थितीवरची धपली काढलीये !
जियो पिडांकाका !!
(श्री.पिडांचा मित्र) टारझन
8 Aug 2009 - 3:48 pm | विजुभाऊ
हा प्रकार करायला " नागपंचमीचाच" मुहूर्त कशासाठी
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
9 Aug 2009 - 2:54 pm | तिमा
आवो, विजुभाऊ, कश्याला उगाच वेड पांघरुन पेडगांवला जायाचं? आँ ?? नागोबा ह्ये 'आपले आद्यगुरु 'दादा कोंडक्यांच्या अर्थानं घ्यायचं राव !!!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
9 Aug 2009 - 1:32 pm | श्रीयुत संतोष जोशी
लय म्हंजी लैच भारी बुवा.
तो नरेन्द्र दाभोळकर एक नंबरचा ** आणि ** माणूस आहे हे मी स्वानुभवावरून सांगतो. स्वतःवर एखादंप्रकरण शेकायची वेळ आली की हा लगेच पळ काढतो.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
11 Aug 2009 - 6:51 am | _समीर_
तात्या, मिसळपाववर असा व्यक्तिगत चिखल उडवला जाऊ नये असे वाटते. आज नरेंद्र दाभोळकरांवर राग उद्या आणखी कुणावर.
अण्णा, पुलं, बाबुजी ह्या मिपाच्या दैवतांना उद्देशुन असली मुक्ताफळे उधळणार्या करंट्यांचीही काही कमी नाही त्यांना अश्याने आयती संधी मिळेल.
अश्याने नरेंद्र दाभोळकर अब्रुनुकसानीचा खटला भरतील मिपावर.
11 Aug 2009 - 8:28 am | प्रकाश घाटपांडे
समाजप्रबोधनाच्या कार्यात अशा अनेक वक्तव्यांची सवय असते. दाभोलकर अशी वक्तव्ये आपल्याच भाषणात मांडत असतात. कारण त्या समाजातुन आलेल्या प्रतिक्रिया असतात. त्याचा अजिबात राग येत नाही. उलट विचार ऐकुन घेतल्या बद्दल धन्यवाद देतात.काही लोक दाभोलकरांना कृतीशील विचारवंत म्हणतात तर काही लोक हलकट,पाजी, बदमाश माणुस आहे असे मानतात.
(समन्वयक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Aug 2009 - 9:43 am | विकास
काही लोक दाभोलकरांना कृतीशील विचारवंत म्हणतात तर काही लोक हलकट,पाजी, बदमाश माणुस आहे असे मानतात.
बाकी काही म्हणा, पण दाभोळकरांना संपुर्ण मिपा लेखनसंग्राहात वरील वाक्यात मोजल्यात इतक्या म्हणजे प्रकाशरावां इतक्या शिव्या कोणी दिल्या नसतील ;)
10 Aug 2009 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेहेहेहे ....
दोन दिवसाच्या अनुपस्थित हा लेख वाचायचा राहिलाच होता ... झक्कास!
अदिती
10 Aug 2009 - 6:22 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =))
सू हा स...
10 Aug 2009 - 7:26 pm | लिखाळ
ही ही ही .. मजेदार. :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
3 Aug 2011 - 5:35 pm | विजय नरवडे
जबराट
3 Aug 2011 - 8:23 pm | मी-सौरभ
क्या बात है!!
26 Feb 2012 - 7:24 pm | अन्नू
धन्य हो! उचल रे देवा उचल आता!![Smiley](http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif)
27 Feb 2012 - 8:06 am | विजुभाऊ
कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत
17 Mar 2012 - 10:05 am | धन्या
सध्या जी धुळवड चालू आहे, त्यात अजून भर.
स्त्रीपुरुष समानता आणि अंनिस असे मिपाकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय एकाच धाग्यात असा हा दुग्धशर्करा योग असलेला पिडाकाकांचा धागा नजरेखालून घाला.
आणि अर्थातच, होउन जाऊद्या. :)
17 Mar 2012 - 4:56 pm | पैसा
शनिवार रैवारची सोय करून ठेवताय काय?
17 Mar 2012 - 5:30 pm | धन्या
असेलही. पण असलीच तर ती आमची सोय नाही. इतरांची.
स्त्री पुरुष समानता आचरणात आणण्याव्यतिरिक्त हल्लीच्या तरुण पोरांना दुसरा पर्यायच नाही. ;)