९ ऑगस्ट -- "क्रांती दिन "
उंच उभारुनी ध्वजा केशरी
जयजयकार निनादु दे |
पेटलेल्या संगराची
ज्योत गगनाला भिडू दे ||
सामोरी येथ आमुच्या
लोहपाशात बद्ध देवता
थेंब तिच्या अश्रुचा
धगधगती ज्वाला बनू दे ||
आव्हान असे दश-दिशांना
अजिंक्य आमुची विजिगीषा
बेभान अनावर आवेगाला
साथ धैर्याची मिळू दे ||
तळपति तेज दामिनी
उसळू द्या आवेशाने
अर्ध्य उष्ण रुधिराचे
तेजाला त्या अर्पू दे ||
उभा पुढे जरी काळ राही
नसे तमा आम्हा जराही
मत्त , उन्मत्त अहंकाराला
धाक शौर्याचा असू दे ||
पाप नाचते उन्मादाने
धुंद होत आपुल्या बळाने
अमानुष त्या क्रौर्याचा
नाश पुण्याला करू दे ||
धुमसत राही आग अशी
रण भूमीच्या -हुदयांतरी
उधळुनी प्राण पुष्पे ही
गीत अभिमानाचे स्फुरु दे ||
प्रतिक्रिया
7 Aug 2009 - 3:30 pm | विमुक्त
भारीच....
7 Aug 2009 - 5:23 pm | विशाल कुलकर्णी
छान !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 5:35 pm | दत्ता काळे
कविता चांगली आहे.
कडव्याच्या शेवटच्या 'दे' ह्या शब्दामुळे, मला कवी यशवंतांच्या
' वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती . . . .
कवितेची आठवण आली.
7 Aug 2009 - 7:01 pm | मदनबाण
पाप नाचते उन्मादाने
धुंद होत आपुल्या बळाने
अमानुष त्या क्रौर्याचा
नाश पुण्याला करू दे ||
छान कविता. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
7 Aug 2009 - 7:36 pm | विसोबा खेचर
एक उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद झाला...
तात्या.
7 Aug 2009 - 7:40 pm | रामदास
कविता आवडली.
8 Aug 2009 - 8:58 am | प्राजु
खूप छान कविता. एकदम मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Aug 2009 - 11:18 am | पॅपिलॉन
समयोचित, चांगली कविता.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
8 Aug 2009 - 12:18 pm | राघव
चांगलंय.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
9 Aug 2009 - 8:32 am | लवंगी
सुरेख कविता
10 Aug 2009 - 1:18 pm | चन्द्रशेखर गोखले
जबरदस्त कविता !
11 Aug 2009 - 5:23 pm | क्रान्ति
आव्हान असे दश-दिशांना
अजिंक्य आमुची विजिगीषा
बेभान अनावर आवेगाला
साथ धैर्याची मिळू दे ||
अप्रतिम कविता!
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी