प्रेरणा: प्राजुची कविता थांब ना आणि सध्या झालेली सर्दी.
गळत आहे नाक माझे औषध झणी आण ना
भिजले सगळे रुमाल आता तरी थांब ना
जाहला डोक्यात कल्लोळ खालती मज पाहवे ना
सांग कसा प्रतिसाद देऊ थोडे तरी थांब ना
साचला आता प्रवाह प्रगती थोडी जाहली
श्वास घेता श्रम जाहले व्हिक्स कुठे मज सांग ना
उठता प्रभाती आवाज बंद वाकुल्या का काढीसी?
स्वाईन फ्लूचा अंदाज घेसी जिव्हेस तुज हाड ना
आवाज निघता मोद होई क्षणिक तोही मग ठरे
राणीची* याद देसी क्रूरवक्त्या थांब ना
संपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी
दर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना
* हा संदर्भ राणी मुखर्जीच्या आवाजाबद्दल आहे.
प्रतिक्रिया
6 Aug 2009 - 3:01 pm | आशिष सुर्वे
कहाणी एकायला जिंवत रहायला हवे ना!
अजून थोडा वेळ थांबलो तर्र आम्ही आपल्या नाकाच्या 'पूरात' नाहीसे होऊ!
(मज्जा आली वाचून!)
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
6 Aug 2009 - 3:07 pm | विनायक प्रभू
वारलु, मेलु
6 Aug 2009 - 3:39 pm | मस्त कलंदर
शरदिनी ताईंची कविता वाचून डोक्याला लागलेल्या शॉटस वर चांगला उतारा आहे..
अदिती.. मस्त विडंबन..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
6 Aug 2009 - 3:45 pm | निखिल देशपांडे
संपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी
दर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना
वा काय ओळी आहेत...
तसे कविता वाचुन प्रतिक्रिया द्यायचा तयारीत होतो पण अचानक नाकात गुळगुळायला लागले नंतर अचानक डोके पण दुखायला लागले. छे आता ह्या कवितेप्रमाणे आपले हाल होणार हे जाणुनच घाम फुटला...
छे स्वाईन फ्लु चा वायरस तर कविते द्वारे सोडण्यात आलेला नाहिये ना..
निखिल
================================
6 Aug 2009 - 8:58 pm | अनामिक
हॅ हॅ हॅ... मस्तं जमलंय विडंबन.
जे तुमच्या नाकात आहे तेच ईडंबनात उतरलेलं दिसतंय!
-अनामिक
6 Aug 2009 - 9:47 pm | कालिन्दि मुधोळ्कर
:-) मस्तच.
6 Aug 2009 - 10:37 pm | Nile
हा हा हा!
तुमच्या नाकाला लोटाभर विक्स लागु. ;)
------
लोटा फॅन
6 Aug 2009 - 11:51 pm | विसोबा खेचर
:)
तात्या.
7 Aug 2009 - 5:34 pm | विशाल कुलकर्णी
अदितीमाय धन्य आहेस ! साष्टांग दंडवत !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 6:50 pm | अजय भागवत
मास्टरपीस!
आवडले विडंबन!
7 Aug 2009 - 6:51 pm | विकास
उत्तम काव्य! कवियत्रीची दर्दभरी कहाणी वाचताना नाक भरून आले... सॉरी डोळे भरून आले :^o
7 Aug 2009 - 6:55 pm | लिखाळ
हा हा .. मजेदार.. :)
थोडी मजा : तुम्ही पाश्चात्य पद्धतीने (रुमाल अथवा टिपकागदावर) नाक शिंकरता की भारतीय पद्धती प्रमाणे.... आ?
प्रश्न वैयक्तिक नसून सांस्कृतीक आहे हे आपणाला लगेच उमजले असेलच :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)