ह्या वादळ-वार्याला पकडुन मुठीत
दुर कुठेतरी भिरकवायचय,
ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन
वार्याच्या वेगाने धावायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय
ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन
त्यानांच ठेंगा दाखवायचाय,
जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय,
आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय
चंद्र तार्यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय,
जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय,
तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन
माझे प्रेम तिला सांगायचय,
तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय
पावसाचा थेंब होउन कड्यावरुन दरीत कोसळायच,
नदी नाल्यातुन , ओढ्यातुन वहात वहात सागराला जाउन मिळायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय
ऑफिसला मारुन बुट्टी , बॉसला फाट्यावर मारायचय
हे आयुष्य मला माझ्या मनाचा राजा होउन जगायचय,
बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय
प्रतिक्रिया
6 Aug 2009 - 11:08 am | पर्नल नेने मराठे
मस्त ;)
चुचु
6 Aug 2009 - 11:55 am | टारझन
प्रतिक्रिया हृदयाला भिडली !
-टुटु
6 Aug 2009 - 11:28 am | Dhananjay Borgaonkar
छान लिहीली आहे कविता..:)
6 Aug 2009 - 2:22 pm | विश्वेश
एक नंबर