ओबामांचा उद्या वाढदिवस. त्यानिमित्त्य त्यांच्या जन्माच्या Certifiate बद्दल चाललेल्या वादावर आधारित एक कार्टून

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in कलादालन
3 Aug 2009 - 8:53 pm

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

inoba mhane's picture

3 Aug 2009 - 10:28 pm | inoba mhane

Obama la vadhdivasachya shubhechcha!

नंदन's picture

3 Aug 2009 - 10:55 pm | नंदन

सहमत. (मूळ प्रतिक्रियेला दुय्यम नेटिझन्स सहमती देऊ शकत असल्यास).

बाकी आपल्यातल्या एकाचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्याचे पाहून सामान्य केनियन जनतेला झालेला आनंद पाहून आश्चर्य वाटते. एक तर ते स्वाभिमानशून्य असावेत किंवा स्वाहिलीत 'फाट्यावर मारणे'ला समानार्थी शब्द नसावा :)
[तारे तोडलेले आहेत, आता चांदणी मिळवा. :).]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

3 Aug 2009 - 11:07 pm | विकास

माझ्या पण ओबामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! :-)

एक तर ते स्वाभिमानशून्य असावेत किंवा स्वाहिलीत 'फाट्यावर मारणे'ला समानार्थी शब्द नसावा

मला वाटते, "स्वाहिली" ह्या शब्दाची व्युत्पत्ती : स्वाहिली --> स्वहील --> स्वहीत अशी असल्याने ते फक्त स्वार्थी आणि स्वहीत बघणारे असावेत. ;)

- विकास "ओक"

छोटा डॉन's picture

3 Aug 2009 - 11:44 pm | छोटा डॉन

माझ्या पण ओबामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

असो, ह्या निमीत्ताने माझे जे काही घोर अज्ञान होते ते दुर झाले हे ही नसे थोडके, काय ?
इतक्या दिवस मी "स्वाहिली" हा शब्द चक्क "संधी विग्रह" समजत होतो, भयंकर चुक झाली होती.
माझे असे मत होते की "स्वाहिली" चे मुळ "शिवी + दिली ( पक्षी : आपण नेहमी %$&# ना देतो त्या ;) ) " ह्यात लपले आहे. पण ह्यात एक खोच आहे, दक्षिण भारतात जसे प्रत्येक गोष्टीत "एच" हे मुळाक्षर जास्त घालतात तसे पौर्वात्य देशात ( सांगा बरं कोणता ? ) त्याच्याविरुद्ध "एच" हे मुळाक्षर खाऊन टाकतात. त्यामुळे "शिवी + दिली " चे बनले अपभ्रंशाने "सिवी + दिली >> स्विदिली " ...

नंतर मग काळाच्या ओघात एका गहाळ आणि बेफिकीर मनुष्याने चुकुन हे टाईप करताना "द" च्या जागी "ह" हे अक्षर वापरले व तो शब्द बनला "स्विहिली" , लोकांना हे रुपडे भावल्याने पुढे तेच लोकप्रिय झाले. पण पुन्हा काही लोकांना ह्या "वेलांटी" च्या घोळात लै डोक्याला शॉट लागल्याने त्यांनी "स्विहिली" हा शब्द इथुन पुढे "स्वाहिली" असा लिहावा असा वटहुकुम काढल्याचे वाचल्याचे आठवते ( लिंका शोधण्याचा प्रयत्न करु नका, ह्या शिक्रेट गोष्टी आहेत ) ...

सबब, हा शब्द नंतर "स्वाहिली" म्हणुन ओळखला जाऊ लागला.
ह्याचा अर्थ खरेतर "शिवी देणे" असा आहे, आता कुणाला व का दिली जाते ह्यासंबंधी मला जास्त माहिती नाही, वाचकांना इच्छा असल्यास ते शोध घेऊन इथे ह्यावर जास्त प्रकाश टाकु शकतात ...

------
छोटा डॉन

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 12:02 am | ऋषिकेश

एकदा ध्यान लावले असता (जे रोजच रात्री मला लागते) केनियन लोकांच्यात प्रवेश केला असता असे कळले की खरेतर ओबामा हे मनाने अजूनही केन्यन असून ते लवकरच अमेरिकेला केन्याचा एक भाग घोषित करणार आहेत आणि म्हणून केन्यन लोक खूश आहेत

अश्या देशभक्त ओबामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ऋषिकेश (वर्तक)
------------------
रात्रीचे १२ वाजून ०१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हम भी अगर बच्चे होते..."

नंदन's picture

4 Aug 2009 - 12:12 am | नंदन

व्युत्पन्न व्युत्पत्ती आणि सूक्ष्म ध्यान भारीच :)

चांदण्या द्या, संपादक व्हा
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

हरकाम्या's picture

4 Aug 2009 - 12:05 pm | हरकाम्या

डॉनराव अगदी पु ल स्टाईलने लिहिले राव.

असे कां म्हणता? उद्या बॉबी जिंदल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तर मला तरी नक्कीच त्याचा अभिमान वाटेल. (त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे व भारताशी असलेल्या वांशिक नात्याचा तो कधी उल्लेख करत नाहीं हे मला माहीत आहे तरीही. कारण "अपना है फिरभी अपना" असे मला वाटते.)
अर्थात यावर "व्यक्ती तितकी मते" असतात याचा मला इतर फोरमवरील चर्चेतून आलेला अनुभव आहे.
मी २०१६ ची वाट पहात आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

टारझन's picture

3 Aug 2009 - 11:15 pm | टारझन

फकिरचंद आहे ओबामा !!
त्याच्या आवशीचा घो !! आमच्या येण्याच्या संधी फार अवघड करून ठेवल्यात फोकलीच्याने !!

-(अँटीओबामा) झंडू बामा टारझन

इनोबा म्हणे's picture

3 Aug 2009 - 11:40 pm | इनोबा म्हणे

बाकी आपल्यातल्या एकाचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्याचे पाहून सामान्य केनियन जनतेला झालेला आनंद पाहून आश्चर्य वाटते. एक तर ते स्वाभिमानशून्य असावेत किंवा स्वाहिलीत 'फाट्यावर मारणे'ला समानार्थी शब्द नसावा
किंवा कदाचित त्यांचं शेयर मार्केट(असेल तर) अमेरीकेच्याच जिवावर चालत असल्याने त्यांनी पैशासाठी अमेरीकेच्या पायाशी लोळण घेतले असावे. :)

मला वाटते, "स्वाहिली" ह्या शब्दाची व्युत्पत्ती : स्वाहिली --> स्वहील --> स्वहीत अशी असल्याने ते फक्त स्वार्थी आणि स्वहीत बघणारे असावेत.
लय भारी!!!
एक शंका: स्वाहिली लोकं पान खातात का हो? :D

फकिरचंद आहे ओबामा !!
त्याच्या आवशीचा घो !! आमच्या येण्याच्या संधी फार अवघड करून ठेवल्यात फोकलीच्याने !!

खरे तर त्याने भारतीयांच्या अमेरीकेत जाण्याच्या संधी रोखुन भारतात देशभक्त लोकांची पैदास वाढवण्यास मदतच केली आहे. या 'लय भारी' कामगिरीबद्दल ओबामाला भारतरत्न द्यायला हवा.
अशा भारतप्रेमी माणसावर केलेल्या चिखलफेकीबद्दल टार्‍याचा त्याच्याच शब्दांत 'णिशेध' :D

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

नंदन's picture

4 Aug 2009 - 12:09 am | नंदन

खरे तर त्याने भारतीयांच्या अमेरीकेत जाण्याच्या संधी रोखुन भारतात देशभक्त लोकांची पैदास वाढवण्यास मदतच केली आहे.

- खरंय, देशभक्तीचा इतका साधा आणि इन्स्टंट मार्ग उपलब्ध असताना याकडे आपल्या थोर नेत्यांचं दुर्लक्ष व्हावं म्हणजे कमालच.

-----------------------------------------------------------------------------------

ती भुयारी रेल्वे, फिरते जिने, त्या चिमुकल्या आगगाड्या आणि त्यात बसणारी ती गोरीगोरीपान मंडळी ह्या सार्‍या गोष्टींचा मला तर पुढे पुढे लोभ जडला. भुयारी रेल्वेइतके बिनधोक वाहन कुठलेही नसेल....मुंबईचा काळबादेवी भाग उद्या जर अधिक स्वच्छ झाला, माणसे वाहतुकीचे नियम सांभाळून चाली लागली व रहिवाशांनी पान खाऊन थुंकायचे नाही असे ठरवले तर त्या भागालाही मुंबईची पिकॅडली म्हणायला हरकत नाही. -- अपूर्वाई.

- पुलंच्या काळात प्रवासवर्णनं लिहायला मराठी संकेतस्थळे नव्हती, हे आपलं केवढं मोठं भाग्य!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

इनोबा म्हणे's picture

4 Aug 2009 - 12:22 am | इनोबा म्हणे

मुंबईचा काळबादेवी भाग उद्या जर अधिक स्वच्छ झाला, माणसे वाहतुकीचे नियम सांभाळून चाली लागली व रहिवाशांनी पान खाऊन थुंकायचे नाही असे ठरवले तर त्या भागालाही मुंबईची पिकॅडली म्हणायला हरकत नाही.
भाईकाकांसारख्या थोर लेखकाला पान खाऊन रस्त्यावर पच्चकन थुंकण्यातली मजा कळू नये याचेच आश्चर्य वाटते.
मला वाटते आपण अमेरीकनांचे अनुकरण करायची गरज नाही. त्यांना स्वच्छता राखायची असेल तर राखू द्या. आम्ह्लाला आजुबाजूला चिखल झाल्याशिवाय करमत नाही.

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

ज्ञानेश...'s picture

4 Aug 2009 - 5:46 pm | ज्ञानेश...

ओबामांच्या जन्माच्या प्रमाणपत्राबद्दल कसला वाद चाललाय हे कळेल का? :|

"Great Power Comes With Great Responsibilities"

विकास's picture

4 Aug 2009 - 6:24 pm | विकास

काही जणांचे (अर्थात रस्त्यावरील विरोधकांचे) म्हणणे आहे की त्याचा जन्म केनियात (/ अमेरिकेच्या बाहेर) झाला आहे.

अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे केवळ "अमेरिकन बॉर्न" व्यक्तीच राष्ट्राध्यक्षपदासाठी लायक (eligible या अर्थाने) असते. जर त्यांचा जन्म बाहेर झाला असला तर ते बॉर्न अमेरिकन नाहीत अर्थात त्यांचे राष्ट्राध्यक्षपद हे घटनाविरोधी आहे म्हणून रदबातल केले पाहीजे.

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 7:30 pm | ऋषिकेश

सुक्ष्म ध्यान लावले असत॑अ अजून एक माहिती उजेडात आली आहे. केनिया हा भारताचाच भाग होता. भारत व आफ्रीका खंड एक असल्यापासून एका भागातील स्त्रीया सतत "कीनई" म्हणायच्या (हो कीनई?) त्या कीनई म्हणणार्‍या स्त्रीयांचा प्रदेश तो किन्या. त्याचा अपभ्रंश केन्या. व भारतात 'सोनिया'चे दिन आल्यावर "न्या"चे "निया" लिहिले जाऊ लागले व केन्याचा केनिया झाला..

तात्पर्य, ओबामा भारतीयच आहेत.. अर्थातच त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद देता येणार नाहि तेव्हा ते अमेरिकेला केन्याचा म्हंजे पर्यायाने भारताचा भाग घोषित करणार आहेत मग त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्यापासून कोण अडवू शकतो?

यावरून दिसते माझे आधीचे सुक्ष्म ध्यानाची माहीती किती अचूक होती

ऋषिकेश (वर्तक)
------------------
संध्याकाळचे ७ वाजून २९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2009 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय कन्या किनई म्हणायच्या म्हणून झालं केन्या. बाकी ऋषिकेशशी सहमत.

एला, कोणत्याही देशाचा नागरीक होईना का अमेरिकेचा अध्यक्ष, आपण का त्यावर चर्चा करायची?

(दिल से भारतीय) अदिती

सुधीर काळे's picture

4 Aug 2009 - 10:45 pm | सुधीर काळे

मला असे वाटते कीं राष्ट्रपतीपदासाठी तो माणूस "बॉर्न अमेरिकन" असावा लागतो, म्हणजे जन्मापासून अमेरिकन नागरिक. त्याचा जन्म अमेरिकेबाहेर झाल्याने कांहीं फरक पडत नाहीं. उदा. बाहेरदेशी नोकरी करणार्‍या अमेरिकन दांपत्याला झालेले मूलसुद्धा "बॉर्न अमेरिकन"च असते.
ज्याला नॅचरलाइज्ड अमेरिकन म्हणतात तो किंवा ती राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीं. याची उदाहरणे म्हणजे शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन, हेन्री किसिंजर, मॅडेलाईन आल्ब्राईट वगैरे. ही सर्व माणसे आधी दुसर्‍या राष्ट्रांची नागरिक होती (जर्मनी, पोलंड वगैरे) नंतर त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करले.
बरेच भारतीय "नॅचरलाइज्ड अमेरिकन" आहेत. पण लुईझियानाचा (रिपब्लिकन) गव्हर्नर बॉबी जिंदल "बॉर्न अमेरिकन" आहे व तो राष्ट्रपती होऊ शकतो.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

4 Aug 2009 - 10:53 pm | विकास

मला असे वाटते कीं राष्ट्रपतीपदासाठी तो माणूस "बॉर्न अमेरिकन" असावा लागतो, म्हणजे जन्मापासून अमेरिकन नागरिक. त्याचा जन्म अमेरिकेबाहेर झाल्याने कांहीं फरक पडत नाहीं. उदा. बाहेरदेशी नोकरी करणार्‍या अमेरिकन दांपत्याला झालेले मूलसुद्धा "बॉर्न अमेरिकन"च असते.

बरोबर आहे. पण ओबामाच्या बाबतीत त्यांचे (म्हणूनच आधी म्हणल्याप्रमाणे रस्त्यावरील) विरोधक तरी देखील मुद्दा करत आहेत कारण त्यांचे वडील हे केनियन होते. मग आईकडून की वडलांकडून (नागरीकत्व) असा मुद्दा जमल्यास करायचा हा प्रकार आहे.

मला खात्री आहे, रिपब्लिकन्सनी जितके यात बघितले नसेल इतके हिलरी क्लींटन आणि बिल क्लिंटनने प्रायमरीजच्या वे़ळेस पाहीले असेल. ज्या अर्थी क्लिंटन पतीपत्नी आणि रिपब्लिकन पक्ष ओरडत नाही त्या अर्थी यात (ते केनियन असण्यात) तथ्य नसावे. :-)

सुधीर काळे's picture

4 Aug 2009 - 11:43 pm | सुधीर काळे

घरचे उदाहरण द्यायचे झाल्यास सोनिया गांधी "बॉर्न इंडियन" नसून "नॅचरलाइज्ड इंडियन" आहेत. त्या आधी इटलीच्या नागरिक होत्या व आता भारतीय नागरिक आहेत.
अमेरिकेत अशा परिस्थितीत त्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकल्या नसत्या.
भारतीय घटनेत याचा उल्लेख नाही असे मी वाचले आहे. अशीही वदंता आहे कीं सोनिया गांधी प्रधानमंत्री होण्याचे जवळ-जवळ ठरले होते त्यावेळी त्यावेळचे राष्ट्रपती ए.पी.जें.नी अशा वेळी reciprocity तपासून पहायचे ठरविले. म्हणजे जर इटलीच्या राज्यघटनेत "नॅचरलाइज्ड इटालियन"ला अशा उच्च पदावर बसण्याची तरतूद असेल तर ते सोनिया गांधींना हिरवा झेंडा दाखवायला तयार होते. पण इटलीच्या राज्यघटनेत अशी तरतूद नाहीं म्हणून त्यांनी सोनिया गांधींना नकार द्यायचा निर्णय घेतला.
परिणाम?
(१) सोनिया गांधींचा "आतला आवाज" (inner voice) "बोलका" झाला व त्यांनी आपला दावा मागे घेऊन मनमोहनसिंग यांचे प्यादे पुढे सरकविले.
(२) "ए.पी.जें"ना एक टर्म संपल्यावर दरवाजाची वाट दाखविण्यात आली.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

5 Aug 2009 - 12:03 am | विकास

ऐकीव माहीतीप्रमाणे: जेंव्हा Person of Indian Origin (PIO) आणि त्या संदर्भात कायद्यात बदल करण्यात आले, तेंव्हा त्यात reciprocityचे भारतीय कायद्यातील कलम काढून टाकण्यात आले. अर्थात तांत्रिक दृष्ट्या आता कोणालाही त्यांनी जर पंतप्रधान होयचे ठरवले तर कोर्टात जाता येणार नाही!

बाकी कलामांना परत राष्ट्रपती केले नाही यात जसे राजकारण आणि प्रतिक्रीया होती तसेच काही नवल देखील नव्हते. कारण एक बाबू राजेंद्रप्रसाद सोडल्यास प्रत्येक राष्ट्रपती फक्त एकच टर्म राष्ट्रपती म्हणून राहीलेला आहे. नारायणनना परत राष्ट्रपतीपदासाठी अनुमोदन न देण्यासाठी एनडीएने हेच कारण वापरले होते. तसेच कलामांबद्दल खूप आदर असला तरी आणि बाकी सगळे (आधी आणि नंतर) त्यांचे वागणे उत्तम / आदर्श असताना, त्यांनी स्वतः असे मागणे, सगळ्यांचा पाठींबा असला पाहीजे वगैरे राजकारणात पडण्याची गरज नव्हती.

बाकी PIO च्या संदर्भात दुहेरी नागरीकत्व का देत नाहीत असा प्रश्न जेंव्हा पंतप्रधान रावना विचारला होता, तेंव्हा त्यांनी दिलेले उत्तर एकदम चपखल होते (आणि म्हणूनच ते पूर्ण मान्य होते): ते म्हणाले, "दुहेरी नागरीकत्व करणे इतके सोपे असते, तर ते आत्तापर्यंत आधीच झालेले नसते का?" :)

मिपावरील किंवा बाहेरील कुणी घटनातज्ञाने यावर कृपया प्रकाश पाडावा, कारण विकासजींनी म्हटल्याप्रमाणे आपल्यापैकी बहुतेकांना नेमकी माहिती नसावी असे वाटते. माझीही माहिती ऐकीव किंवा कुठेतरी वाचलेली आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पाषाणभेद's picture

5 Aug 2009 - 9:46 am | पाषाणभेद

ऋषिकेश आन डानराव यांनी लय हासवले.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

इनोबा म्हणे's picture

5 Aug 2009 - 10:19 pm | इनोबा म्हणे

म्हणजे आम्ही अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यास पात्र नाही. :(
जाऊ द्या. आम्ही आमच्या देशात खुश आहोत.

(राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरीकेच्या पायाशी लोळण न घेणारा) -इनोबा

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

मिसळभोक्ता's picture

5 Aug 2009 - 11:23 pm | मिसळभोक्ता

काल मिपावरचे ओबामा-ऑबसेशन बॅरीच्या कानावर घातले. तेव्हा बॅरीने केलेले विधान चिंतनीय आहे. "आम्ही मिपाला फाट्यावर मारतो" असे पचाक्कन थुंकत बॅरी म्हणाला. व्हाईट हाऊसचे पिंक हाऊस (लाल रंग मिसळून) व्हायला आता फारसा उशीर नाही.

-- मिसळभोक्ता

इनोबा म्हणे's picture

5 Aug 2009 - 11:30 pm | इनोबा म्हणे

=)) =)) =))

काका, लगे रहो!!

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?