आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुरेख कविता/गझल खर्डेघाशी
जिलबीवर जिलबीच्या राशी
जेवण झाले, अले घशाशी
भले भुकेले राहू आम्ही
खाऊ तर खाणार तुपाशी
फोडासम सुजलेले शैशव
तुलना झाली सदा फुग्याशी
जरा बुटांशी खेळुन झाले,
'टॉमी'ने केली बदमाशी!
किती पाखरे आली गेली
एखादे आलेच गळ्याशी
बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
प्रतिक्रिया
20 Feb 2008 - 12:45 pm | इनोबा म्हणे
केश्या सही रे!
20 Feb 2008 - 12:49 pm | विसोबा खेचर
आयला! केश्या पुन्हा एकदम फॉर्मात! :)
जिलबीवर जिलबीच्या राशी
जेवण झाले, अले घशाशी
फोडासम सुजलेले शैशव
तुलना झाली सदा फुग्याशी
वरील ओळी एकदम जबरा!! हहपुवा, हहलोपो! :))
(जिलब्या खाऊन घशाशी आलेला!) तात्या.
20 Feb 2008 - 12:54 pm | बेसनलाडू
किती पाखरे आली गेली
एखादे आलेच गळ्याशी
बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
हे भारी. बांधून नको, बांधुन हवे; म्हणजे आपले मात्रांच्या नावाने बोंबलायला नको ;)
(आस्वादक)बेसनलाडू
21 Feb 2008 - 12:25 pm | केशवसुमार
लागू नये म्हणून रहूदे तसच..;)
आमचा वृताशी केलेला करार कशाला मोडायला आवता..
सुचवणि बद्दल धन्यवाद.. मुळ प्रतित बदल केला आहे..
(वेंधळा)केशवसुमार
20 Feb 2008 - 7:35 pm | ऋषिकेश
आयला! केश्या पुन्हा एकदम फॉर्मात! :)
असेच म्हणतो..
मस्त विडंबन.. फार आवडले
-ऋषिकेश
20 Feb 2008 - 8:05 pm | अविनाश ओगले
तुमचे विडंबन वाचण्याआधी मूळ गझल वाचली. बेसनलाडू आणि जिलबी दोन्ही मस्त. कृपया आपल्या नावातला सुमारपणा काढून टाकावा व केशवखुमार, केशवखुमासदार असे लिखाणाला शोभेलसे नाव धारण करावे ही विनंती.
20 Feb 2008 - 8:48 pm | सुधीर कांदळकर
१२.४२ ला विडंबन. च्यायला मेंदू आहे का वीज.
आपली तर टूबच पेटत नाही.
एकदम आक्रीत. एकदम फैनाबाज पघा पावनं.
अजून यिऊद्यात.
21 Feb 2008 - 7:23 am | प्राजु
वा वा... केशव..
एकदम सह्हीच..
- प्राजु
21 Feb 2008 - 7:46 am | वरदा
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
तुमच्या सौंनी पाहीली का ही कविता?
21 Feb 2008 - 12:30 pm | केशवसुमार
शू ऽऽऽऽ हळू बोला....
कोणी ऐकल तर ...
(धिट नवरा)केशवसुमार
21 Feb 2008 - 9:59 pm | सर्वसाक्षी
पुन्हा एकदा दमदार फलंदाजी! टाकला चेंडु की हाणला.
22 Feb 2008 - 12:46 pm | अनिला
बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
हे तर गरज सरो .. झाले
अस्से काय? फायदे विसरलात वाट्ते?
तरी सुध्धा तुमचे नाव विड्म्बनोत्तमराव