(गलका!)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
31 Jul 2009 - 7:53 pm

आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल गलका! (गलका!)धक्का बसला तिला जरासा, मला लागला झटका!सॉरी म्हणता... कानाखाली तिने लावला फटका!सजावटींच्या दिव्यांत बसतो शांत चाखतो मदिरा...जरी चघळतो 'मावा', 'पोलो' तिला जाणवे भपका!उगीच का डोळ्यांत अचानक माझ्या आले पाणी?नाव घेतले माझे तू अन, मला लागला ठसका!असा आज का, लंगडतो मी काय तुम्हाला सांगू?तिच्या घरातिल कुत्र्याचा मी पार घेतला धसका!झोप हवीशी सुट्टीची... पण सासू ही तडमडते...जागे होणे भाग अता मज, अन सुट्टीचा पचका! मौन आमचे घरात असते, घरात असता पत्नी...ती माहेरी गेल्यावरती घरी मित्रांचा गलका!जागा झाला माझ्यामधला आज बेरकी "केश्या"...काव्य मिळाले सुरेख इतके जणू लागला मटका!- केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

31 Jul 2009 - 8:02 pm | श्रावण मोडक

वा. सुरेख.
"जागा झाला माझ्यामधला आज बेरकी "केश्या"..." आज? की नेहमीच?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2009 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मौन आमचे घरात असते, घरात असता पत्नी...
ती माहेरी गेल्यावरती घरी मित्रांचा गलका!

पत्नी पिडितांची संख्या वाढते आहे, हे मात्र खरे आहे. :) (ह. घ्या)

सुनील's picture

31 Jul 2009 - 8:24 pm | सुनील

मस्त. प्रदीप कुलकर्णी यांची मूळ गझलदेखिल छानच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चेतन's picture

1 Aug 2009 - 10:20 am | चेतन

गुरुजी एकदम फक्कड जमलयं
वाचुन एकदम ठसका लागला

__ /\__

चेतन

क्रान्ति's picture

1 Aug 2009 - 3:33 pm | क्रान्ति

मूळ गझलइतकंच सरस विडंबन!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी