उसाश्यांचे भान

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
29 Jul 2009 - 3:18 pm

तरवारीना मिळते कवितेचे म्यान
जीवघेणी तान होते कट्यारीचे पान
हरपते सारेच ऐकूनी देहभान
हवे कशास मग उसाश्यांचे भान...

तू सभोताली नीळाई होउनी
येतेस सारे आकाश झाकुनी
ऐन पावसात इंद्रधनु घेउनी
हवे कशास मग उसाश्यांचे भान

होवोनी चंद्र मन धुंद होत जाते
पायीचे नाद ताल संगीत होते
काय सय जीव घेऊनी जाते
हवे कशास मग उसाश्यांचे भान

कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते
काय चमत्कार होतो..शब्द मूका करते
भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते
हवे कशास मग उसाश्याचे भान

तु येतेस होवोनी रानीचे पान
पावसाळी शहारा. थेंब थेंब गान
वेडावला जीव....तृप्त इंद्रधनुची कमान
हवे कशास मग उसाश्यांचे भान.
...........................विजुभाऊ सातारवी

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Oct 2010 - 12:49 pm | अवलिया

क्या बात है !!

मराठमोळा's picture

9 Oct 2010 - 1:05 pm | मराठमोळा

विजुभौ,

१ नंबर.........
एकदम आवडेश!!!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

9 Oct 2010 - 2:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....सुंदर्..आवड्ले...!

विजुभाऊ's picture

11 Oct 2010 - 4:04 pm | विजुभाऊ

धन्यवाद

अवलिया's picture

11 Oct 2010 - 4:08 pm | अवलिया

आभार

तात्या विन्चू's picture

11 Oct 2010 - 5:35 pm | तात्या विन्चू

सुन्दर ...कविता आवडली...