ताई

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
29 Jul 2009 - 1:34 am

नाही कधीच बसले
ते पाठीवरी धपाटे,
जाण्या कुशीत रडण्या
नशीब झुरले आहे

खेळातले भांडणे वा
लाडातले गालगुच्चे,
ताईकडे झोपण्याला
नशीब चुकले आहे

ताऊचा घास पहिला
भरविता म्हणे आई,
"सोन्या, तुझ्या पाचवीला
नशीब पुजले आहे"

फोटोत फक्त हसते
किती गोड माझी ताई!
घेण्यास बघ मुका तो
नशीब मुकले आहे

रेषा कुठली चुकीची
कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरूनी
नशीब उठले आहे

(काही बदलांसह पूर्वप्रकाशित)

करुणकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 9:20 am | विसोबा खेचर

रेषा कुठली चुकीची
कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरूनी
नशीब उठले आहे

......!

(नि:शब्द) तात्या.

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 7:26 am | पाषाणभेद

फोटोत फक्त हसते
किती गोड माझी ताई!

ह्या ओळी तर काळजाला लागल्या.

- पाषाणभेद

ऋषिकेश's picture

29 Jul 2009 - 1:31 pm | ऋषिकेश

सुंदर!

(..)ऋषिकेश

दशानन's picture

29 Jul 2009 - 1:35 pm | दशानन

सुंदर !!!


खेळातले भांडणे वा
लाडातले गालगुच्चे,
ताईकडे झोपण्याला
नशीब चुकले आहे

निशब्द !!!

+++++++++++++++++++++++++++++

आशिष सुर्वे's picture

29 Jul 2009 - 4:22 pm | आशिष सुर्वे

प्रति, बेसनलाडू..

आम्हाला सख्खी बहीण नाहीय.. वाचताना डोळे पाणावलेत...

''रेषा कुठली चुकीची
कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरूनी
नशीब उठले आहे''

अजून काहीच बोलू शकत नाही.

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

क्रान्ति's picture

29 Jul 2009 - 10:40 pm | क्रान्ति

कवितेनं शब्दशः रडवलं!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

राघव's picture

29 Jul 2009 - 11:07 pm | राघव

अप्रतीम लिहिलेत बेला. :)
खूप सुंदर. (काही ठिकाणी लयीत खपल्यासारखे वाटले कारण ते बेला कडून अपेक्षीत नाही.. :) )
भावना ओतप्रोत भरलेली आहे अगदी! सलाम!!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

स्वाती२'s picture

29 Jul 2009 - 11:41 pm | स्वाती२

अप्रतिम. स्क्रिन धुसर झालाय.