बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
21 Jul 2009 - 10:08 pm

माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे?
भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे?

भ्रष्ट नेत्यांच्यामुळे ही वाळवी आली घरी
एकही शाबूत ऐसा कोपरा उरला कुठे?

टॉवरांचे रान झाले चाळ माझी पाडली
आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे?

दारची जास्वंद गेली कार पार्किंगच्यामुळे
परसदारी बहरणारा मोगरा उरला कुठे?

बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले
मग 'अगस्ती' सांग तुजला, पिंजरा उरला कुठे?

---- धोंडोपंत

गझल

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

21 Jul 2009 - 10:14 pm | बेसनलाडू

वा पंत! गझल खूप प्रभावी आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

पंत तो उंबरा आहे इथे.

श्रावण मोडक's picture

21 Jul 2009 - 10:17 pm | श्रावण मोडक

आवडली रचना.

चित्तरंजन भट's picture

21 Jul 2009 - 10:33 pm | चित्तरंजन भट

वाव्वा टॉवर, कार पार्किगंवाल्या द्विपदी विशेष! धोंडोपंत, गझल आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2009 - 10:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गझल आवडली...!

दारची जास्वंद गेली कार पार्किंगच्यामुळे
परसदारी बहरणारा मोगरा उरला कुठे?

एकदम खास !

-दिलीप बिरुटे

प्रशांत उदय मनोहर's picture

21 Jul 2009 - 11:51 pm | प्रशांत उदय मनोहर

विशेषत:

>>बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले
>>मग 'अगस्ती' सांग तुजला, पिंजरा उरला कुठे?

मस्तच.

आपला,
(मराठीप्रेमी) प्रशांत

हवालदार's picture

21 Jul 2009 - 11:59 pm | हवालदार

टॉवरांचे रान झाले चाळ माझी पाडली
आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे?

फार सुन्दर

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 12:38 am | ऋषिकेश

छान! गझल आवडली

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 12:48 am | बिपिन कार्यकर्ते

गझल आवडली पंत. मस्तच आहे.

बिपिन कार्यकर्ते

गेल्या चार-पाच पिढ्या आमचे कुटुंब कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. आपल्या घरी मराठी, तर महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेचा कुठला पिंजराच नाही, अशी मुक्त अवस्था होती.

(आता कन्नड आणि कोंकणी भूमिपुत्रांना आमचे पूर्वज वाळवीसमान वाटले असतील, हे शक्य आहे. आधी कन्नड कौशल्याचे प्रमाणपत्र हातात नसताना कर्नाटकात नोकरी मिळू देणारा कर्नाटकाचा कायदा भ्रष्ट नेत्यांनी बनवला असे त्यांना वाटत असेल, शक्य आहे. नव्हे, बहुधा ढळढळीत सत्य आहे. पण त्यांच्याबद्दल मला दुय्यम सहानुभूती वाटते.)

नेमक्या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत तर धोंडोपंत गुरूच आहेत - सलाम!

सुवर्णमयी's picture

22 Jul 2009 - 2:01 am | सुवर्णमयी

कविवर्य, आपली गझल अतिशय आवडली.
सोनाली

आण्णा चिंबोरी's picture

22 Jul 2009 - 6:11 am | आण्णा चिंबोरी

धोंडोपंत, तुझ्या आधीच्या रचनांइतकी प्रभावी वाटली नाही.

माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे?
भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे?

या ओळी वाचून बे एरियातले किंवा मिडवेष्टातले अमेरिकन हुळहुळत याच आशयाच्या ओळी इंग्रजीत गुणगुणत असतील असे वाटून गेले.

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 9:03 am | विसोबा खेचर

आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे?

ही ओळ सर्वात भारी...

पंत, सुंदर रचना. पुनरागमनाबद्दल आनंद वाटला..

तात्या.

क्रान्ति's picture

22 Jul 2009 - 9:07 am | क्रान्ति

गझल. अगदी मनातली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

मैत्र's picture

22 Jul 2009 - 9:15 am | मैत्र

आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे?

तुमच्या पुनरागमनाचा आनंद जास्त आहे. अजून उत्तमोत्तम रचना येऊ द्या...

पर्नल नेने मराठे's picture

22 Jul 2009 - 10:20 am | पर्नल नेने मराठे

धोन्डो तिकडेच राहात आहेस ना कि घर बद्ललेस?
चुचु

वेताळ's picture

22 Jul 2009 - 12:12 pm | वेताळ

पुनरागमनला हार्दिक शुभेच्छा.
वेताळ

केशवसुमार's picture

22 Jul 2009 - 12:28 pm | केशवसुमार

पंत,
तुम्ही इथे परत लिहिते झालात हे उत्तम..
(आनंदित)केशवसुमार
जोरदार पुनरागमन.. अभिनंदन!!
खणखणीत गझल.. वा!!
(आस्वादक)केशवसुमार
आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा

mahalkshmi's picture

23 Jul 2009 - 1:26 am | mahalkshmi

गझल अतिशय आवडली.खुप .वाहवा वाहवा.

मदनबाण's picture

23 Jul 2009 - 8:47 am | मदनबाण

माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे?
भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे?
अगदी असेच वाटते...

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

चतुरंग's picture

23 Jul 2009 - 4:48 pm | चतुरंग

अजून येऊदेत.
(तुमचे छंदशास्त्रावरचे लिखाण चालवा की पुढे.)

चतुरंग

सूहास's picture

23 Jul 2009 - 8:07 pm | सूहास (not verified)

वेलक्म बॅक...प॑त

सुहास