ह्याचा देव

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
21 Jul 2009 - 12:57 am

त्या देशांत आता त्यांचे राज्य आहे हे ह्याला कळले..
हा शहारला..
ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ...
त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्‍या वर्णाचा तो पाहूणा...
त्याच्या नवस्वातंत्र्याचा ह्याला हेवा वाटला.

मग आपणही कमी नाहि असे वाटून हा बोलू लागला
आमच्याकडेही असाच एक नेता होऊन गेला...
तो काळच असा होता..
देवाच्या सेवकांनी देवाला घेरला होता..
देवाचा व्यापारी करून भक्ताला गिर्‍हाईक केले होतं...
तो व्यापार एका माणसाला दुसर्‍यापासून तोडत होता...
आमची वेस गावाबाहेर सुरू व्हायची.. गाव येताच संपायची...
आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं...
तो म्हणला "देव झूट आहे.. सारे सारखे आहेत"
आम्ही म्हणलो " होय होय.. देव झुट आहे"
तो म्हणला "देव विसरा.. तुम्ही फक्त शिका."
आम्ही म्हणलो "होय होय... देव विसरा"
तो म्हणाला "चाकरी सोडा, देश चालवा"
आम्ही म्हणालो...

पाहूणा प्रभावित झाला.. विचारू लागला..
तो नेता गेल्यावर तुम्ही काय केलंत? देश चालवलात?

हा खिन्नपणे हसला... म्हणाला
"छे हो! आम्ही त्याला देव केला..
त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!"

मुक्तक

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jul 2009 - 1:25 am | प्राजु

सॉल्लिड!!
जळजळीत अंजन घालावं अशी आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती२'s picture

21 Jul 2009 - 6:00 am | स्वाती२

>>जळजळीत अंजन घालावं अशी आहे कविता.
+१

बेसनलाडू's picture

21 Jul 2009 - 1:41 am | बेसनलाडू

प्रभावी कविता. आवडली.
(वाचक)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

21 Jul 2009 - 2:06 am | घाटावरचे भट

लैच भारी.

धनंजय's picture

21 Jul 2009 - 2:13 am | धनंजय

प्रबोधक विचार आहेत.

Nile's picture

21 Jul 2009 - 12:48 pm | Nile

सहमत. छान!

सुबक ठेंगणी's picture

21 Jul 2009 - 4:35 am | सुबक ठेंगणी

खरंच महापुरुषांना दोनदा मरण येते...एकदा ते मरतात तेव्हा आणि दुस-यांदा त्यांची तत्त्वे मरतात तेव्हा! ह्या उक्तीची पुन्हा एकदा आठवण झाली!
अतिशय प्रभावी!

छोटा डॉन's picture

21 Jul 2009 - 7:31 am | छोटा डॉन

ॠष्याभाई, जबरा कविता बॉस.
मला खुप दिवसांनी कुठली कविता एवढी आवडली आहे, अगदी खणखणीत सत्य आहे.
सुरेख ...!!!

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2009 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

कपिल काळे's picture

21 Jul 2009 - 11:22 am | कपिल काळे

लै म्हणजे लै म्हणजे लै भारी!!
झणझणीत. !!

पाषाणभेद's picture

21 Jul 2009 - 11:26 am | पाषाणभेद

ऋषिदा, सारेगमप जि़ंकल्यानंतरची पहिली कविता का?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

अवलिया's picture

21 Jul 2009 - 11:28 am | अवलिया

मस्त रे ऋषिकेश... सुरेख !!

--अवलिया

JAGOMOHANPYARE's picture

21 Jul 2009 - 11:32 am | JAGOMOHANPYARE

आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं...

छान.

नंदन's picture

21 Jul 2009 - 11:45 am | नंदन

आवडली. दोन-तीन दिवसांपूर्वी 'मंडेला दिना'बद्दल वाचलं होतं; तेव्हा असंच काहीसं डोक्यात आलं होतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

21 Jul 2009 - 11:54 am | सहज

अधुन मधुन हमखास ठसका लागेल अशी तर्री वाढून जातोस रे!

वर नंदन म्हणाला तसेच मला देखील नेल्सन मंडेला/द. अफ्रिका आठवले.

श्रावण मोडक's picture

21 Jul 2009 - 12:30 pm | श्रावण मोडक

धारदार!!!

दत्ता काळे's picture

21 Jul 2009 - 12:33 pm | दत्ता काळे

जबरदस्त. मुक्तक फार आवडले.

पाऊसवेडी's picture

21 Jul 2009 - 3:51 pm | पाऊसवेडी

>>"छे हो! आम्ही त्याला देव केला..
त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!"

मस्त सुंदरच आहे कविता !!!

-----------------------------------

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

पाऊसवेडी's picture

21 Jul 2009 - 3:52 pm | पाऊसवेडी

>>"छे हो! आम्ही त्याला देव केला..
त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!"

मस्त सुंदरच आहे कविता !!!

-----------------------------------

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

क्रान्ति's picture

21 Jul 2009 - 6:16 pm | क्रान्ति

खूप आवडलं मुक्तक. वास्तवदर्शी आणि अस्वस्थ करणारं.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

नितिन थत्ते's picture

21 Jul 2009 - 9:42 pm | नितिन थत्ते

दाहक कविता.

उत्तम.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 10:56 am | विसोबा खेचर

क्लास रे ऋष्या...

तात्या.

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 8:47 pm | ऋषिकेश

सर्व वाचकांचे अभिप्रायाबद्दल अनेक आभार

ऋषिकेश

लिखाळ's picture

22 Jul 2009 - 8:52 pm | लिखाळ

मुक्तक चांगले आहे.

ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ...
त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्‍या वर्णाचा तो पाहूणा...

पहिल्या परिच्छेदात तो आणि हा यातील नक्की कोण कोण? हे समजाऊन घेताना थोडा गोंधळ झाल्याने इतर प्रतिसाद वाचे पर्यंत वाट पाहिली.

पु ले शु
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

भाग्यश्री's picture

23 Jul 2009 - 12:08 am | भाग्यश्री

फार आवडली!!

http://www.bhagyashree.co.cc/