वाटेवर मी तिच्या ठेवली--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
20 Jul 2009 - 4:49 pm

वाटेवर मी तिच्या ठेवली
प्राजक्ताची दोन फुले
ह्रदयातून मग लक्ष लागले
प्राजक्तातून प्रीत फुले ?

उगीच ठेवला प्राजक्त तिथे मी
मनात रुजलो आहे किती ?
मधल्या दिवसांमधील अंतर
जाणून घेण्या आहे किती ?

हळवी लागे ओढ अनामिक
मनास हुरुहूर सले खुळी
प्राजक्तातून प्रीत पाहतो
विसरली का मज प्रीतकळी ?

आनंदाने तिने उचलली
रस्त्यावरची दोन फुले
गंध घेउनी प्रेमभराने
मला शोधण्या नजर फिरे

फुले नव्हे ती आमुची प्रीती
प्राजक्तातून फुलली होती
तशीच ताजी तशीच नि॑मळ
प्राजक्तासम उरली होती

कविता

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

20 Jul 2009 - 4:58 pm | पर्नल नेने मराठे

अहो .....गुलाब ठेवतात.
माझ्या वाटेत पण ठेवला होता... पण काकाने उचलला :(
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

20 Jul 2009 - 6:52 pm | पर्नल नेने मराठे

आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना .
(कोब्रा) चुचु

पुष्कराज's picture

21 Jul 2009 - 7:37 pm | पुष्कराज

कधी जर प्रेम केलत तर कळेल की वाटेवर दोनच फुल का ठेवली ते

पर्नल नेने मराठे's picture

20 Jul 2009 - 6:52 pm | पर्नल नेने मराठे

आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना .
(कोब्रा) चुचु

पिवळा डांबिस's picture

20 Jul 2009 - 9:39 pm | पिवळा डांबिस

मंदी आहे चुचुबाई!
जरा समजून घ्या....
:)
(गोब्रा) पिडां

अवलिया's picture

21 Jul 2009 - 9:13 am | अवलिया

कागदी ठेवा ... पुन्हा कामास येतील ! :)

(चोब्रा) अवलिया

नाना बेरके's picture

20 Jul 2009 - 5:24 pm | नाना बेरके

चुचु ने कवितेला दिलेला प्रतिसाद आवडला. अगदी चिमणरावांच्या शब्दातूनच दिला आहे असा क्षणभर भास झाला.

पुष्कराज,

कविता भारी आहे, पण . .
मनास हुरुहूर सले खुळी
हे मला जरा ऑड वाटलं. कारण हूरहूर सलत नाही, लागते . . , ओढी सारखी.

दत्ता काळे's picture

20 Jul 2009 - 6:10 pm | दत्ता काळे

त्यातली 'प्राजक्ताच्या फुलासम' असलेली नाजुक, हळुवार भाषाही आवडली.

चन्द्रशेखर गोखले's picture

20 Jul 2009 - 10:26 pm | चन्द्रशेखर गोखले

गोड , लडिवाळ कविता.. आवडली !!

बेसनलाडू's picture

20 Jul 2009 - 11:35 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू
यावरून काही दिवसांपूर्वी मी लिहिलेली एक त्रिवेणी आठवली -
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी

(स्मरणशील)बेसनलाडू

प्राजु's picture

20 Jul 2009 - 11:39 pm | प्राजु

कविता हळूवार आहे..
आवडली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विश्वेश's picture

21 Jul 2009 - 11:17 am | विश्वेश

वाटेवर मी तिच्या ठेवली
न भरलेली दोन बिले
ह्रदयातून मग लक्ष लागले
पाकिट किती हलके झाले ?

आनंदाने तिने उचलली
रस्त्यावरची दोन बिले
पेड़ शिक्का न दिसता
मला शोधण्या नजर फिरे

विश्वेश's picture

21 Jul 2009 - 11:18 am | विश्वेश

सुन्दर ...

पाऊसवेडी's picture

21 Jul 2009 - 3:31 pm | पाऊसवेडी

खुप मस्त आहे कविता

-------------------------------------
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!