कार्यबाहुल्या मुळे गेले काही महिने जालावर फारसा वावर करता आला नाही.. आज थोडा निवांत वेळ मिळाला आणि आमच्या गुरुजींना केलेले खोडसाळ गंड काव्य आमच्या वाचनात आले . ते वाचून आम्हाला ही गंड झाला ..
मी कवी आहे, मला ही कंड आहेफक्त वृत्ता चा मला हा गंड आहे'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितोपाडला नाही कधी मी खंड आहे!वाचले तर पाहिजे हे काव्य कोणीदोनशे कडव्यात लिहिला खंड आहेचांगल्या मिळती न आता जमीनीह्या मुळे धंदा विडंबन थंड आहेमुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतोवृत्त अन बाराखडी हे बंड आहेबोलले काका, मुळी हे काव्य नाहीजाउ दे तो गर्व, अन पाखंड आहे कैकदा निवृत्त मी झालो तरी हीशमत नाही हा विडंबन कंड आहे'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!संपले नाही तुझे पौगंड आहे...
प्रतिक्रिया
17 Jul 2009 - 1:56 am | llपुण्याचे पेशवेll
जोरदार पुनरागमन केसुशेठ.. हल्ली विडंबनाची कारंजी बंद पडली की काय असे वाटू लागले होते.
*
मला वाटले केसुशेठ लिहीत नाहीत याचे कारण काही दिवसांपूर्वीच्या मुखपृष्ठावरील चपला घालून निघून गेले की काय. चला आता केसु आहेत हे बघून काळजी मिटली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
17 Jul 2009 - 3:37 am | बेसनलाडू
वेलकम् ब्याक्!
(स्वागतिक)बेसनलाडू
17 Jul 2009 - 4:38 am | चतुरंग
लई दिसांनी खासच 'गंड'वले आहेत की! ;)
(गंडलेला)चतुरंग
17 Jul 2009 - 5:45 am | मदनबाण
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे
हा.हा.हा... सह्ह्ह्ह्ही. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
17 Jul 2009 - 6:05 am | घाटावरचे भट
मस्तच!!
17 Jul 2009 - 7:25 am | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
17 Jul 2009 - 9:34 am | ऋषिकेश
लै भारी...
वेलकम ब्याक!
('जुन्या अने जाणित्या' लोकांच्या पुनरागमनाने आनंदित) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
17 Jul 2009 - 4:03 pm | श्रावण मोडक
स्वागत.
17 Jul 2009 - 4:47 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
17 Jul 2009 - 6:03 pm | अभिज्ञ
केसुशेठ,
लै भारी विडंबन...
अतिशय उच्च.
मुळ कवितादेखील जबर्याच.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
17 Jul 2009 - 6:13 pm | दत्ता काळे
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे
.. मस्तं.
17 Jul 2009 - 6:20 pm | सूहास (not verified)
झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....झकास्...झकास....
सुहास
18 Jul 2009 - 10:58 am | वेताळ
बाल्या अन गुर्जीच्या कविता
एकदम झक्कास....
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
आता पुढे खंड नको.
वेताळ
18 Jul 2009 - 7:46 pm | बट्ट्याबोळ
एक नं !!एक नं !!
18 Jul 2009 - 9:07 pm | मनीषा
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
वृत्त अन बाराखडी हे बंड आहे
मस्तच ...