[रोजचीच गोष्ट.]

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
11 Jul 2009 - 2:56 pm

मित्रः काय रे काय गोंधळ चाललाय आज जंगलात?
मी: काय नाय रे कोणी तरी श्वापद परत आलंय म्हणे.
मित्रः च्यायला! मग एवढी पळापळ कसली? जंगलात काय श्वापदं कमी आहेत काय?
मी: मुर्ख आहेस! अरे निम्मे बुरखा पांघरलेले, काही नुसतेच खाजगीत गुरकावणारे. काही उगाच गरीब सश्यांवर वगैरे फोक उगारणारे, काही नुसत्याच जंगलनीतीच्या सभा घेणारे, काही नखांची धार गेलेले अन काही दात पडलेले. मग आता फुकटात काही लचके तोडायला मिळताहेत तर कोण सोडील?
मित्रः काय कळलं नाय राव!
मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास?
मित्र: अरे पण साला कोणाला हा जोडायचा हे कसे कळणार?
मी: ते कळेल तुला ते हळु हळु. फक्त जरा उंचावरुन हे सगळं करायच काय? म्हणजे धुमकेतु पण नीट दिसतो.
मित्र: ते सगळं ठीक आहे रे. पण कुर्‍हाड आपल्यावरच आली तर?
मी: त्याची काळजी नको करु, कुर्‍हाड यायला लाकुड्तोड्या यायला हवा ना आधी?
मित्रः तो कधी येईल?
मी: चपला सापडल्या की येईल. आणि आल्यावर चपला घ्यायला तुझ्यापुढे बरेच जण आहेत रांगेत, घाबरु नकोस.

मित्रः कसला गोंधळ चाललाय रे तिकडं? थांब बघुन येतो. ..

(सन्माननीय सहजरावांना अर्पण...)

मौजमजा

प्रतिक्रिया

दशानन's picture

11 Jul 2009 - 2:59 pm | दशानन

=))

लै भारी !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2009 - 3:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =))

मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास?

नाईलशेट, लगे रहो!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jul 2009 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) नाईलभाऊ, जोरात आहे.

अवांतर: च्यायला, एक श्वापद काय आलं परत.... आख्खं जंगलच डहुळलं की... पावरबाज आहे हां श्वापद!!! ;)

बिपिन कार्यकर्ते

मिसळभोक्ता's picture

12 Jul 2009 - 7:22 am | मिसळभोक्ता

संपादक बिर्किट महोदय,

लवकरच तुम्हाला कार्यबाहुल्याची व्याधी जडो, आणि आदरणीय तात्याश्री (भाग्यचोटाचे मित्र) तुम्हाला संपादकपदावरून खारीज करो, ही शुभेच्छा.

पण "डहुळलं" हा शब्दप्रयोग आवडला. तुमच्या उंटीणीला शुभेच्छा.

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

12 Jul 2009 - 7:57 am | टारझन

=)) =)) =))
=)) =))
=))
फोकाचे वळ ! मिळते फळ !!

- आंबेचोख्ता
अधिक माहिती साठी पराला भेटा.

सहज's picture

11 Jul 2009 - 4:15 pm | सहज

अरे याऽऽऽहू करत कोणी आले तर इकडे जंगलात लगेच, चाहे कोई मुझे जंगली कहे म्हणत सगळे गाउ लागले !!!

चालु द्या,पालथे धंदे जोरात!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2009 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

लगे रहो नाईलभाई !!

आणि हो "चपला सापडल्या की येईल. आणि आल्यावर चपला घ्यायला तुझ्यापुढे बरेच जण आहेत रांगेत, घाबरु नकोस. " हे वाक्य काळजाल भिडले.

©º°¨¨°º© पर्किट ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

=))

लगे रहो.... :)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

टारझन's picture

11 Jul 2009 - 9:15 pm | टारझन

(सन्माननीय सहजरावांना अर्पण...)

आयच्यान .. हे वाक्य काळजाला भिडलं रे नाईल भावा !!

बाकी =)) =)) =))

प्रतिसाद सौजन्य : प-टा-आ

-- टार्किट घासुद्दिण

नंदन's picture

11 Jul 2009 - 10:46 pm | नंदन

भारी लेख निलेशभाऊ.

[हा प्रतिसाद पुरोगामी, व्यनिसम्राट सहजकाकांना सादर अर्पण] :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी