हॅले कॉमेट

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
11 Jul 2009 - 10:50 am

मी : मग ? जोरात दिसतात हल्ली तुमचे ते....
मित्र : "तुमचे" ! हाहाहा.. का रे बाबा ?
मी : अजून तू त्याना किंवा त्यांनी तुला डिच नाही केले म्हणून "तुमचे".
मित्र : ह्म्म ... म्हणजे अन्य कुणाच्या बाबतीत डिचिंग अन् डिसोनिंग झालेय तर....
मी : डोंबलाचे डिसोनिंग. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे "मिसळपाव" जणु , गुतला तो संपला.
मित्र : हाहा .... हे बाकी खराय.
मी : दर ७६ वर्षानी येतो तो. आला की आपली मजा. लोक दुर्बिणी घेऊन धावताहेत. येईल नि जाईल.
मित्र : हाहा ..अंतू बर्व्यासारखा बोलतो आहेस ! "अहो कसला न्हेरु ! त्या रत्नांग्रीत भाषणे कसला देत फिरतोस ! तांदूळ दे म्हणावं."
मी : फार बोलू नकोस , आण्णू गोगट्या करेन तुझा !
मित्र : नाही , म्हणजे इतका कडवटपणा बरा नाई. आता दिसतोय आकाशात तर दर्शन घे ! पुन्हा ७६ वर्षे काय फिरकेल न फिरकेल.
मी : अहो , तो आकाशात पाजळतो आहे तेच ठीक. लोकांनी काय आपले फायरवर्क्स पाहून टाळ्या वाजवाव्यात. आम्ही बरे आमच्या खोपटात.
मित्र : का रे ? ये की बाहेर जरा. वाजव तूपण टाळ्या.
मी : तोच तर साला प्रॉब्लेम आहे आपला. साला कधीममधी होणार्‍या घटकाभरच्या रोषणाईच्या चूषपणाला आम्ही लांबवर वाट दाखवणारी मशाल समजतो !
मित्र : हाहाहा .... तुम्ही म्हणजे .... कुणी शिवाजी म्हाराज की म्हण्टले की "जय" म्हणायला मोकळे. चल , बोअर करू नकोस मी फायरवर्क्स ला चाललो ... तुम्ही बसा तिच्यायला कुढत !

(सन्माननीय सदस्य सहजरावना सादर अर्पण. )

मौजमजा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

11 Jul 2009 - 11:11 am | विनायक प्रभू

गंमतच हाय की.

अवलिया's picture

11 Jul 2009 - 11:11 am | अवलिया

(हा प्रतिसाद अनोळखी लोकांनी वाचु नये)

मुसुशेट, लै दिवसांनी ... चला तुम्हाला पण सुरुसुरी आलीच तर तळपण्याची !

चालु द्या !! :)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

सहज's picture

11 Jul 2009 - 11:14 am | सहज

काका तुम्ही सुद्धा...हा हा हा =))

सगळे काका लोक्स म्हणजे नो लिसनिंग.

बनी दिसली नाही ती कुठे गेलीय सध्या?

अवलिया's picture

11 Jul 2009 - 11:18 am | अवलिया

(हा प्रतिसाद सहजराव सोडुन कुणीही वाचु नये)

सहजकाका, तुम्ही पण घ्या हात धुवुन...
येवु द्या काहीतरी पेश्शल तुमच्याकडुन... :)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

दशानन's picture

11 Jul 2009 - 11:16 am | दशानन

हाणतिच्या मायला =))
डायरेक्ट धुमकेतू च उतरला कि मिपा वर !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

Nile's picture

11 Jul 2009 - 11:20 am | Nile

हा हा हा! चालुद्या! =)) =))

ऋषिकेश's picture

11 Jul 2009 - 11:20 am | ऋषिकेश

आज चंद्र बघायचा राहिला तरी चालतो.. तो उद्या येईलच.. हॅलेचे तसे नसते.. तुम्ही नाहि बघितलात तर ७६ वर्षे हळहळावे लागते

[हॅलेच्या होणार्‍या आतिषबाजीला बघायला मोक्याची जागा पटकावून बसलेला] ऋषिकेश (सर्किठॅलेकर)
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सुनील's picture

11 Jul 2009 - 11:32 am | सुनील

लगे रहो मुसुराव!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2009 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

फायरवर्क भारीच बर का !!

'सहजपोर्णीमा' वगैरे साजरी करणे चालु आहे का सध्या ? रोज कोण ना कोण काय अर्पण करतय म्हणुन शंका आली ;)

(हा प्रतिसाद सहजकाकांना अर्पण)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

सहज's picture

11 Jul 2009 - 11:48 am | सहज

'सहजपोर्णीमा' =)) =)) =))

लाईन ऑफ फायर आपलं आताषबाजी मधे उभे करतायत, दुसर काय..

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 11:43 am | श्रावण मोडक

एकच राहिलं. हा सारा संवाद दोन झाल्यानंतरचा की त्याआधीचा?
संवाद वाचल्यावर वाटतंय की आधीचा नक्कीच नसावा. ;)
बनी कुठंय?

मिसळभोक्ता's picture

11 Jul 2009 - 12:16 pm | मिसळभोक्ता

जुन्या आणि नव्यांतला फरक लगेच दिसून येतो.

(मुसुशेठचा नवा मित्र. मात्र प्रतिसाद सहजशेठला अर्पण.)

-- मिसळभोक्ता

नंदन's picture

11 Jul 2009 - 1:15 pm | नंदन

बाकी शूमाकर-लेवीपेक्षा हॅले कधीही उत्तम :)

[हा प्रतिसाद सहजकाकांना सादर अर्पण]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2009 - 4:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदनशी सहमत. ह्याकुटा़के आणि शूमाकर-लेव्हीपेक्षा हॅलीचा धूमकेतू चांगलाच. पॉझिटीव्ह थिकिंग करा की हो जरा!

(हा प्रतिसादाही सहजरावांना सादर समर्पण)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jul 2009 - 1:39 pm | बिपिन कार्यकर्ते

लै भारी!!! आता मज्जा येणार. :)

अवांतर: मी सगळ्यांनाच ओळखून आहे म्हणून सगळेच प्रतिसाद वाचले. ;)

बिपिन कार्यकर्ते