दिवेआगार - हरिहरेश्वर : एक नितांतसुंदर विकांत

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
7 Jul 2009 - 10:19 am

काही दिवसांपुर्वी एका विकांताला दिवेआगार तसेच हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. निसर्गाच्या सान्निध्यात एक नितांतसुंदर विकांत घालवण्याचे सुख काही वेगळेच असते.
जाण्यापुर्वी इथुनच फोन करुन बुकिंग करुन ठेवले होते.

केळकरांच्या वाडीनेच मुळात वेड लावले. नाना तर्‍हेची फुले, माडाची उत्तुंग झाडे ....

दुपारी चारच्या दरम्यान समुद्रकिनारा गाठला. मनसोक्त समुद्रस्नान , किंबहुना समुद्राच्या कुशीत घातलेला धांगडधिंगा आणि नंतर तो देखणा सुर्यास्त !

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून हरिहरेश्वर गाठले. जगन्नियंत्याचे दर्शन घेवुन मग मोहरा वळवला हरिहरेश्वराच्या देखण्या सागराकडे....

शेवटचा थांबा होता, हरिहरेश्वर येथील विख्यात शुक्लतिर्थ !

पुणे तसेच मुंबईवरुन दिवे आगार जाण्यासाठी स्वतःचे वाहन असल्यास उत्तमच. नसेल तर हा पर्याय आहेच.

मग कधी जाणार दिवे आगार आणि हरिहरेश्वरला ?

विशाल

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Jul 2009 - 11:02 am | विसोबा खेचर

एकच शब्द - सु रे ख...!

विशालभौ, जियो...!

तात्या.

सहज's picture

7 Jul 2009 - 11:43 am | सहज

विशालभौ, केळकरांच्या निवासगृहाची देखील माहीती/फोटो द्या ना. त्यांचे संकेतस्थळ आहे का?

सही आहे.

विशाल कुलकर्णी's picture

7 Jul 2009 - 12:41 pm | विशाल कुलकर्णी

तात्या, सहजराव धन्स...

आणखी थोडी माहीती राहण्याच्या सोयीबद्दल..

केळकर यांचे भोजन व निवासगृह
मु.पो. दिवेआगार, हायस्कुलसमोर, (एकच हायस्कुल आहे तिथे)
ता. श्रीवर्धन, जि. रायगड - ४०२ ४०४.
दुरध्वनी : (९५२१४७) २२४२७९
भ्रमणध्वनी : ९४२३२३४१२८
संपर्क : सौ. अपुर्वा प्र. केळकर

सुवर्ण गणेशमंदीरापासुन त्याच रोडवर सरळ पाच मिनीटे पुढे गेले की लागते. केळकरांची छोटीशी वाडी आहे. तिथेच त्यांचे राहते घर आहे. शेजारीच त्यांनी एकात दोन अशा तीन खोल्या बांधलेल्या आहेत. (एकुण सहा) एका खोलीचे भाडे ४०० किंवा ५०० रुपये. (दोन्हीचे मिळुन साधारण ८०० होतात) स्नान व इतर विधींची ;-) चांगली सोय आहे. जेवणही उत्तम मिळते. केळकरकाकुंचे हातात न मावणारे उकडीचे मोदक तर अफलातुनच असतात. मांसाहारी जेवणासाठी इतरत्र सोय होवू शकते.

From vishal" alt="" />

केळकरांची राहती जागा .. इथे अंगणात मस्त झोपाळा आहे, आराम करण्यासाठी.

From vishal" alt="" />

पाहुण्यांसाठी खोल्या ...

From vishal

खादाडीची जागा ...

From vishal" alt="" />

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

पक्या's picture

7 Jul 2009 - 2:07 pm | पक्या

सुंदर फोटोज. हरिहरेश्वराचे तर खासच.
माहितीसाठी धन्यवाद. आताच साठवून (save) ठेवली आहे

दिपक's picture

7 Jul 2009 - 2:15 pm | दिपक

मस्त सफर घडवलीत विशालभाऊ :)

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jul 2009 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब ह र्‍या मालक __/\__

एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

किट्टु's picture

7 Jul 2009 - 6:02 pm | किट्टु

सुंदर फोटोज. मस्त आहे हरिहरेश्वर.

क्रान्ति's picture

7 Jul 2009 - 7:35 pm | क्रान्ति

फोटो खासच आहेत. माहिती पण आवडली.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

चतुरंग's picture

7 Jul 2009 - 8:34 pm | चतुरंग

तुम्ही बरेच भटके आहात तर!
फोटू सुरेखच! आणि संपर्कमाहिती आवडली, धन्यवाद.
वर्णनही आणखी जास्त टाकत चला राव, प्रवास कसा घडला, काय काय बघितलं...
(खुद के साथ बातां : ह्म्म..आता समजलं ह्या विशालला सारख्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या भयकथा कशा सुचत असतील ते! :? )

(सूर्यास्तात हरवलेला)चतुरंग

समिधा's picture

8 Jul 2009 - 12:41 am | समिधा

खरचं राहण्याची खुप छान व्यवस्था असते केळकरांकडे.
आम्ही पण तिथेच राहीलो आहोत. आणी केळकरांकडचा शाही उकडीचा मोदक तर विसरुच शकत नाही एवढा सुरेख बनवला होता.
तुमचे सगळेच फोटो सुंदर आले आहेत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

अंतु बर्वा's picture

8 Jul 2009 - 1:33 am | अंतु बर्वा

आजतागायत तीन खेपा झाल्या दिवे आगार आणी हरिहरेश्वरच्या... पण प्रत्येक वेळी तिथे जाउन आलं की मन आणी शरीर... दोन्ही हलकं होउन जातं... आणी मुख्य म्हणजे अजुन पर्यटनापासून untouched असल्यामुळे किनारे स्वच्छ आहेत... मी आणी माझे मित्र गमतीने या जागेला भारतातलं न्युझीलंड म्हणतो... बाकी सुर्यास्ताचा फोटो झकासच...

नंदन's picture

8 Jul 2009 - 3:21 am | नंदन

सचित्र माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. वाचनखूण म्हणून साठवणार होतो, पण त्याचा दुवा कुठे दिसत नाही?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी